(Mehul Choksi Arrested) पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी फरार असलेला आरोपी मेहुल चोक्सी याला बेल्जियम पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयच्या विनंतीवरून शनिवारी १२ एप्रिलला बेल्जियममध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. हिऱ्यांचा व्यापारी असणारा मेहुल चोक्सी कोट्यवधींचा कर्ज घोटाळा करुन तो पळाला होता. पंजाब नॅशनल बँकेत१३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीवर आहे.
Read More
देशातील कोट्यवधींचा गैरव्यवहार करून एंटीगुआ येथे राहत असलेला हिरेव्यापारी मेहुल चोक्सी याच्या प्रत्यार्पणात भारताला मोठे यश मिळाले आहे. एंटीगुआ येथील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहीतीनुसार, तेथील पंतप्रधान गॅस्टन ब्राउन यांनी चोक्सीचे नागरीकत्व रद्द करण्याला संमती दर्शवली आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सरकारी बँकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून इंग्लंडमध्ये फरार झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्या याला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात विजय माल्या याने दाखल केलेली याचिका इंग्लंडमधील न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
प्रसिद्ध हिरेव्यापारी नीरव मोदी यांनी पीएनबी बॅंकेत केलेल्या घोटाळ्याप्रकरणी त्याला बुधवारी अटक करम्यात आली आहे.