उत्पादन क्षेत्राला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन योजना आणली आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी ती अत्यंत महत्त्वाची अशीच असून, आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचे काम त्यातून होत आहे. विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात त्यातून आकर्षित होत असून, रोजगारवाढीचे कामही ती करत आहे.
Read More
स्मार्टफोन प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य भाग. याच स्मार्टफोनच्या क्षेत्रात भारत दिवसेंदिवस भरारी घेण्याच्या तयारीत आहे. गेल्या आठवड्याभरात स्मार्टफोन्सच्या निर्यातीने आर्थिक वर्ष २०२४ या वर्षात, १.३१ लाख कोटींचा टप्पा ओलांडला. त्यामुळे भविष्यात या क्षेत्रातील आव्हाने आणि संधी काय असू शकतील, याचेच हे आकलन...
अॅपलच्या आयफोन उत्पादनाच्या निर्यातीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आयफोनच्या उत्पादनापैकी ८५ टक्के उत्पादन निर्यात झाली असून पीएलआय योजनेचे लक्ष्य पूर्ण केले आहे.
बांधकाम, पायाभूत सुविधा, वाहन उद्योग, अभियांत्रिकी आणि संरक्षण इ. देशातील अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये पोलाद क्षेत्राची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. गेल्या काही वर्षांत देशातल्या पोलाद उद्योगाने लक्षणीय प्रगती केली आहे. त्यामुळे भारताने पोलाद उद्योगात एक ‘जागतिक शक्ती’ म्हणून नावलौकिक मिळवला असून जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा कच्च्या पोलादाची निर्मिती करणारा देश ठरला आहे.
मोदी सरकारच्या उद्योगाभिमुख धोरणामुळेच निर्यात व ‘जीडीपी’तील वृद्धी शक्य झाली असून आताच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील ‘पीएलआय योजने’मुळे त्यात आणखी भरीव वाढ होईल, हे नक्की.