PAN Aadhar Link

कला आणि समाजसेवेची सांगड घालत हर्षोल्हासात साजरा झाला रंगतदार 'चिरायू' २०२५’ सोहळा!

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या 'गुढीपाडवा' या आपल्या हिंदू नववर्ष दिवसाचे औचित्य साधत, 'शेलार मामा फाउंडेशन' आयोजित 'चिरायू' हा कलाकारांच्या सन्मानाचा आणि नात्याच्या उत्सवांचा सोहळा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा झाला. यंदाचं हे १८ वर्ष असून ९०च्या दशकातील ज्येष्ठ कलाकारांनी 'चिरायू' ची मुहूर्तमेढ रोवली होती. कालांतराने खंडित झालेल्या या परंपरेला पुन्हा एकदा झळाळी आणली ती म्हणजे लोकप्रिय कलाकार सुशांत अरुण शेलार यांनी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. २००६ पासून 'शेलार मामा फाउंडेशन'द्वारा आयोजित 'चिरा

Read More

Khel Ratna Awards:मनू भाकर, डी गुकेश सह "या" अनमोल रत्नांचा सन्मान!

: क्रिडाक्षेत्रात भारताची मान उंचावणाऱ्या खेळाडूंचा १७ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात सन्मान करण्यात आला. शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरास्कार सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर आणि जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय भारतीय पुरूष हॉकी संघाचे कर्णधार हरमनप्रीत सिंह यांना सुद्धा खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत

Read More

हॉलिवूड संकटात.. कलाकारांची घरं आगीत जळून खाक, ऑस्कर सोहळाही पुढे ढकलला!

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे हॉलिवूड चित्रपटसृष्टी धोक्यात आली आहे. लॉस एंजेलिसमध्ये अनेक कलाकारांची घरं असून मोठ्या संख्येने ती जळून खाक झाली आहेत. दरम्यान, या आगीमुळे २ लाखांहून अधिक लोकांना घरे सोडण्याचे आदेश देण्यात आले असून तेथे आणीबाणी जाहिर करण्यात आली आहेलॉस एंजेलिस हे दक्षिण कॅलिफोर्नियातील सर्वात मोठे शहर आहे. हे अमेरिकेतील चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. या आगीचा फटका ऑस्कर पुरस्कार सोहळ्यालाही बसला असून १७ जानेवारी २०२५ रोजी होणारा नामांकनाचा सोहळा पुढे

Read More

वसंतराव डावखरे स्मृती पुरस्कारासह कोकणातील शिक्षक, संस्थाचालकांचा सन्मान

ठाणे : कोकणातील दुर्गम भागासह विविध शाळांमध्ये नवनवीन शैक्षणिक प्रयोग व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी कार्य करणारे १५१ आदर्श शिक्षक, ३० शिक्षकेतर कर्मचारी आणि ११ आदर्श संस्थाचालकांना आज सन्मानित करण्यात आले. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे ( Vasantrao Davkhare ) यांच्या स्मृत्यर्थ आमदार निरंजन डावखरे व भाजपा शिक्षक आघाडी-कोकण विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या पुरस्कारातून गुणवंत शिक्षकांच्या कार्याचा सन्मान झाला असल्याची भावना शैक्षणिक वर्तुळातून

Read More

ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना ’गदिमा’ पुरस्कार

पुणे : गदिमा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘गदिमा पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे ( Asha Kale ) यांना जाहीर झाला आहे. सोबतच गदिमांच्या पत्नी विद्याताई माडगूळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘गृहिणी सखी सचिव पुरस्कार’ दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांना, तर ‘चैत्रबन पुरस्कार’ प्रसिद्ध कथा, पटकथा, संवादलेखक, गीतकार क्षितीज पटवर्धन, ‘विद्या प्रज्ञा पुरस्कार’ प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर

Read More

२६ नोव्हेंबरला ‘मृदगंध पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन

महाराष्ट्राला लोकसंस्कृतीचा मोठा वारसा लाभला आहे. त्यातीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजे महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप. महाराष्ट्राचा पहाडी आवाज असं बिरुद मिळालेले लोकशाहीर विठ्ठल उमप आज आपल्यात नसले तरी त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. विठ्ठल उमप आज आपल्यात नाहीत, पण त्यांची गाणी,नाटकं व आठवणी आजही मराठी रसिक मनावर रुंजी घालत आहेत. लोकशाहीर, लोकगायक, गीतकार, असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शाहीर विठ्ठल उमप यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त १४ वा लोकशाह

Read More

ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर

नाटक, मालिका आणि चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विजय गोखले यांनी आजवर मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीतही महत्वपुर्ण भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, गंधार पुरस्कार सोहळा १४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ यांनी दिली. तसेच, २०२३पासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू केला असून यंदाचा पुरस्कार स्पृह

Read More

रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान

(Karde)महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली होती. पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक स्वप्निल कापडणीस, सरपंच सचिन तोडणकर, उपसरपंच दत्ताराम भुवड, कृषी अधिकारी सुनील खरात यांनी हा पुरस्कार दिल्ली येथे स्वीकारला. या स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल पर्यटनमंत्री गिरीश महाजन, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ.बी. एन. पाटील यांनी

Read More

“मी अभिनय केलेल्या संपूर्ण चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळणं म्हणजे..”, सुबोध भावेंनी व्यक्त केल्या

७० व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यात मराठी चित्रपटाने विशेष बाजी मारली असून मधुगंधा कुलकर्णी निर्मित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला आहे. याच निमित्ताने चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणारे अभिनेते सुबोध भावे यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. १२ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित झालेला ‘वाळवी’ हा चित्रपट दोन लग्न झालेल्या जोडप्यांच्या आयुष्याभोवती फिरणारा आहे.

Read More

राज्यातील शेतकरी बांधवांना 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार' समर्पित : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

१५ व्या कृषी नेतृत्व समिती २०२४ आणि एग्रीकल्चर टुडे या मासिकाच्या वतीने देण्यात येणारा 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार' महाराष्ट्राला जाहीर झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवार, १० जुलै रोजी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, एग्रीकल्चर टुडे समूहाचे अध्यक्ष डॉ.एम.जे.खान, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121