महाकुंभने देशाच्या आर्थिक विकासाला चालना दिली असून, चौथ्या तिमाहीत भारताची वाढ ७.६ टक्के दराने होईल, असा विश्वास मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला आहे. त्याचवेळी, विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी येत्या काळात भारताची वाढ ७.८ टक्के दराने व्हावी लागेल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.
Read More
एस अँड पी ग्लोबल रेटिंगने आपल्या भाकितात भारताच्या जीडीपीबाबत मोठे विधान केले आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताचा जीडीपी ६.८ टक्क्यांवर राहू शकतो असे विधान संस्थेने केले आहे. आशिया पॅसिफिक खंडातील भाकीत मांडताना भारताचा जीडीपी आश्चर्यकारकरित्या ८.२ टक्के राहिल्याचे दिसून आल्याचे म्हटले आहे. आर्थिक वर्षातील ६.८ टक्क्यांवर आगामी वाढ ही प्रामुख्याने वाढत्या मागणीमुळे व वाढीव व्याजदराने होण्याची शक्यता वर्तवली आहे.
भारतातील किरकोळ महागाई (Retail Inflation) मध्ये आता स्थिरता येऊन नियंत्रणात आले आहे मात्र त्यातील चढउतार राहण्याची शक्यता अजूनही असल्याचे आरबीआयने आपल्या ' स्टेट ऑफ द इकॉनॉमी ' या बुलेटिनमध्ये म्हटले आहे. तसेच अन्नधान्याच्या महागाईत होणारी वाढ देखील चिंतेचा विषय असल्याचे यात म्हटले गेले आहे. मागच्या तिमाहीतील तुलनेत जीडीपीत वेगाने वाढ कायम असल्याचे सुतोवाच देखील यामध्ये करण्यात आले होते.
आज सरकारची जीडीपीची आकडेवारी समोर येणार असल्याने आर्थिक विश्वात उत्सुकता होती. अखेर सरकारच्या सांख्यिकी और कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाने सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) आकडेवारी जाहीर केली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील जीडीपी ७.८ टक्क्यांनी वाढला आहे. संपूर्ण वर्षासाठी हा आकडा ८.२ टक्क्यांवर पोहोचला आहे. भारताचा जीडीपी वर्षानुवर्षे आधारित (YoY) जानेवारी ते मार्च महिन्यात ८.२ टक्क्यांनी वाढला आहे. अनेक तज्ञांनी भारताचा जीडीपी दर ६.७ पर्यंत वाढेल असे अपेक्षित केले होते. मात्र अंदाजापेक्षा अधिक वेगाने भारताचा
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्डमन सचस या संस्थेने नवे जीडीपीची अनुमान घोषित केले आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये सकल देशांतर्गत उत्पादन (GDP)१० बेसिस पूर्णांकाने वाढून ६.७ टक्क्यांवर जाईल असे म्हटले आहे. चौथ्या तिमाहीत आरबीआय व्याजदरात कपात देखील करेल असे गोल्डमन सचस (Goldman Sachs) कंपनीने म्हटले आहे. जानेवारी ते एप्रिल ते मार्च महिन्यात महागाई दर ३.४ टक्क्यांवर राहू शकतो असे आरबीआयने म्हटले आहे.
भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) दर ६.१ ते ६.७ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो असे अनेक अर्थतज्ज्ञांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र तो ८ टक्यांच्या खाली राहू शकतो असा अंदाजही तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामध्ये म्हटल्याप्रमाणे हा ६.१ ते ६.७ पर्यंत राहू शकतो परंतु ८ टक्क्यांच्या खाली राहील' असे यामध्ये सांगितले गेले आहे.
OECD (Organisation for Economic Cooperation and Development) ने आपला नवीन अहवाल सादर केला आहे. या अहवालात म्हटल्याप्रमाणे, भारताचा जीडीपी ७.८ टक्क्यांनी वाढू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यापुढे दोन वर्षांत जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन) ६.६ टक्क्यांनी वाढू शकतो असे म्हटले आहे.मात्र काही वैश्विक आव्हानांचा सामना भारतीय अर्थव्यवस्थेला करावा लागेल असा अंदाज यात व्यक्त करण्यात येत आहे.
मॉर्गन स्टॅनली या आघाडीच्या जागतिक गुंतवणूक कंपनीने भारताच्या अर्थव्यवस्थेला आपल्या अहवालात दाद दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की, देशांतर्गत मागणीत मोठी वाढ झाल्याने आज भारतीय अर्थव्यवस्था विकासात वाढ होत आहे. कंपनी अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक असून आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारत ६.८ टक्क्यांनी व आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जीडीपी ६.५ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज मॉर्गन स्टॅनलीने व्यक्त केला आहे.
भारताच्या विकासगाथेला एशियन डेव्हलपमेंट बँकेची मान्यता मिळाली आहे. बँकेने भारताच्या अपेक्षित ६.७ टक्क्यांच्या तुलनेत ७ टक्के जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन) राहील असे अनुमान मांडले आहे. एडीबी (Asian Development Bank) भारतातील खाजगी व पब्लिक सेक्टरमधील होत असलेल्या मोठ्या वाढीला दाद देत पुढील भाकीत केले आहे.
मुंबई: ग्लोबल रेटिंग एजन्सी' मूडीज' भारताच्या जीडीपी अनुमानात नवीन माहिती समोर आली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या ६.१ टंक्याच्या तुलनेत आर्थिक वर्ष २२०४ मध्ये ही वाढ ६.८ टक्क्यांवर पोहोचणार असल्याचे जागतिक पातळीवरील आर्थिक रेटिंग एजन्सी 'मूडीज' ने म्हटले आहे. भारतातील उद्योग क्षेत्रातील मोठ्या घौडदौडीमुळे व औद्योगिक क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे ही वाढ होऊन आगामी काळातील आव्हानांना भारताची अर्थव्यवस्था तोंड देऊ शकते असे भाकीत मूडीज संस्थेने केले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)ने भारताच्या आर्थिक विकासदर वाढीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. देशाच्या आर्थिक विकासाचा दर वेगाने वाढत असताना आयएमएफकडून यासंदर्भात सकारात्मक अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, 'आयएमएफ'ने आर्थिक वर्ष २०२४ करिता विकासदर ६.३ टक्क्यांवरून ६.७ टक्के इतका राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच, जागतिक विकासदरात देखील वृध्दि होण्याचा अंदाज आयएमएफकडून व्यक्त करण्यात आला आहे.
दिवाळीच्या निमित्ताने देशभरातील किरकोळ विक्रीने विक्रमी ३.७५ लाख कोटी रुपयांची नोंद केली. किरकोळ विक्रेते तसेच उत्पादनांसाठी ही दिवाळी त्यांच्या चेहर्यावर हसू आणणारी ठरली. ‘व्होकल ऑर लोकल’ या पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ या योजनेला ग्राहकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, असे म्हणता येते.
जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला भारत २०३० पर्यंत ७.३ ट्रिलियन डॉलरच्या जीडीपीसह जपानला मागे टाकून जगातील क्रमांक २ ची अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सने पीएमआयच्या आपल्या अंकात व्यक्त केली आहे.2021 आणि 2022 या दोन वर्षांच्या वेगवान आर्थिक वाढीनंतर, भारतीय अर्थव्यवस्थेने 2023 कॅलेंडर वर्षात सातत्यपूर्ण मजबूत वाढ दर्शविली आहे.
भारतीय ई-कॉमर्स क्षेत्राची वाढ २७ टक्के चक्रवाढ दराने होत असून, २०२६ पर्यंत यातील उलाढाल २०० अब्ज डॉलर इतकी झालेली असेल, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. देशाच्या जीडीपीत २०२५ पर्यंत या क्षेत्राचे योगदान ११.५ टक्के इतके असेल. कर महसूलात वाढ करणारे क्षेत्र, असाही त्याचा लौकिक झाला आहे. त्यानिमित्ताने...
भारतीय अर्थव्यवस्थेला अनेक अंशी सुगीचे दिवस आलेले असतानाच देशाची 'ब्रेन' संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निती आयोग सदस्य अरविंद विरमानी यांनी मोठे विधान केले आहे.क्रुड तेलाच्या चढे भाव, ' क्लायमेट चेंज ' सारख्या अस्थिरतेच्या परिस्थितीतही भारत ६.५ टक्के विकासदराने भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष २४ मध्ये पुढे जाईल असे भाकीत विरमानी यांनी गुरुवारी केले आहे.
प्रसिद्ध क्रेडिट रेटिंग एजन्सी 'मूडीज ' ने 'ग्लोबल मायक्रो आऊटलूक ' या संभाव्य परिस्थितीचा आढावा घेतलेल्या डॉक्युमेंट मध्ये नमूद केल्याप्रमाणे २०२३ या आर्थिक वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेत ६.७ % दराने विकासदर राहील असे म्हटले गेले आहे.
‘मूडीज’ या आंतरराष्ट्रीय भारताबद्दलचा आपला स्थिर दृष्टिकोन कायम ठेवला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची सर्वाधिक वेगाने होणारी वाढ त्यासाठी कारणीभूत ठरली आहे. मणिपूरप्रश्नी अविश्वास ठराव दाखल झाल्यामुळे देशात राजकीय अस्थिरता असल्याचा चुकीचा संदेश जगभरात गेला. याचा विपरित परिणाम मानांकनावर झाला आहे.
:संपूर्ण जगात आर्थिक मंदीचे वातावरण तयार झालेले असताना भारतीय अर्थव्यवस्था दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे. २०२३ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था तब्बल ७ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांनी व्यक्त केला आहे. याहीपलीकडे जाऊन आपण ८ टक्क्यांचा आर्थिक वृद्धी दर गाठू असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला. या एवढ्या विकासदराने भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरणार आहे
वर्ल्ड बँकेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या आपल्या अहवालामध्ये याविषयी माहिती जाहीर केली असून भारत सरकारच्या या दोन निर्णयांचा भारतीय अर्थव्यवस्थेला खूप मोठा फायदा झाला आहे, असे देखील वर्ल्ड बँकेने जाहीर केले आहे.