व्हॉट्सअप, टेलिग्राम आदी ‘ॲप’द्वारे जुगार खेळला जातो तेव्हा ‘ॲप’मध्ये शिरून कारवाईस मर्यादा येते. याविषयीच्या तक्रारी केंद्रशासनाकडेही प्राप्त झाल्या आहेत. सामाजिक प्रसारमाध्यमांचा ‘डेटा’ उपलब्ध झाल्यास अशा गुन्ह्यांवर नियंत्रण आणता येईल. त्यामुळे सामाजिक प्रसारमाध्यमांचा ‘डेटा शेअरींग’साठी केंद्रशासन कायदा करण्याच्या विचारात आहे. लवकरच याविषयीचा कायदा येईल, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. १४ डिसेंबर रोजी विधानसभेत दिली.
Read More
राज्याच्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी ऑनलाईन गेमिंग ॲपवर चर्चा पार पडली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भुमिका स्पष्ट केली. यावेळी ऑनलाईन गेमिंग प्रकरणी स्वतंत्र कायदा तयार करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
ऑनलाइन गेमींगला ‘कौशल्याचे गेम’ (गेम ऑफ स्किल) असे लेबल चिकटवून करचोरी करणाऱ्यांना आता चाप लागणार आहे. राज्य सरकारने या प्रकारांची गंभीर दखल घेतली असून; शुक्रवार, दि. ८ डिसेंबर रोजी जीएसटी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे ऑनलाइन गेमींग चालकांना यापुढे १८ ऐवजी २८ टक्के कर भरावा लागणार आहे.
काही कालावधीतच पुन्हा जीएसटी (गुड्स आणि सर्विस टॅक्स) काऊन्सिलची बैठक पार पडली.जीएसटीचे नवा मूल्यांकन विचार करण्यासाठी या आँनलाईन बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.आँनलाईन गेमिंग क्षेत्राच्या बेट्स उत्पन्नावर ऑक्टोबर पासून २८ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे असे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले आहे.चालू असलेल्या पार्लमेंटच सत्रात यासंबंधीची तरतूद करण्यात येईल असे बुधवारी अर्थमंत्र्यांकडून सांगण्यात आले.
ऑनलाईन गेमिंग, धर्मांतर प्रकरणं दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. रोज एक नवी घटना समोर येत आहे. शिवाय, मणिपूर प्रकरणावरही विरोधक आक्रमक भुमिका घेत आहेत. या सर्व विषयांवरुन आ. नितेश राणेंनी विरोधकांना आरसा दाखवला. मणिपूर प्रकरणावर राजकारण करणाऱ्यांना ही त्यांनी सुनावलं. मणिपूरच्या घटनेच्या संदर्भात घटना निषेधार्यच आहे, कोणच समर्थन करू शकत नाही. विरोधकांना महिलांच्या संदर्भात चिंता आपल्याला वाटते, पण ही खरंच प्रामाणिक भावना आहे का? असा थेट सवाल राणेंनी उपस्थित केला.
ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्याने पुण्यातील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे राहणारी गणेश कलंदाते नामक व्यक्तीने जंगली रमीमध्ये ऑनलाईन २० हजार रुपये गुंतवले होते, त्यात त्याला नुकसान सहन करावे लागल्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. गणेश कलंदाते हा एक कॅब चालक असून त्याला मद्यपानाचे व्यसन होते. स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये या आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.
ऑनलाईन धर्मांतरणाचा सूत्रधार शाहनवाज खान गाझियाबाद पोलिसांच्या ताब्यात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील पोलीस या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढतीलच. ‘लव्ह जिहाद’ व ‘लँण्ड जिहाद’ पेक्षाही ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मांतरण अधिक घातक आहे. हे रॅकेट थेट तुमच्या घरात घुसणार आहे. तेव्हा वेळीच सावध व्हा.
ठाणे : ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातुन ’मोबाईल जिहाद पुकारणारा आरोपी मुंब्य्रातील असल्याचे उघड झाल्यानंतर आता आणखी एका धर्मांतर प्रकरणातील आरोपीही मुंब्य्रातीलच असल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे. मुंब्रा धर्मांध कट्टरपंथीयांसाठी आश्रयस्थान ठरू लागले असल्याचे या घटनेमुळे स्पष्ट झाल्याचे म्हटले जात आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे ऑनलाइन गेमिंगद्वारे अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करण्याचे प्रकरण ताजे असतानाच आता नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्येही करिअर गाईडन्सच्या नावाखाली विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण तसेच धर्म परिवर्तनाचे धडे जात असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी घडला. याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र घटनास्थळी जात हा प्रकार हानून पाडला. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यास पोलिसांनी दिरंगाई केल्याने संतप्त पालकमंत्री दादा भुसे यांनी पोलीस स्थानकात दाखल होत पोलीस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
इस्लामच्या बाबतीत विचार करायचा तर ‘पब्जी’ खेळून एखाद्या पूजापद्धतीला प्रोत्साहन कसे मिळत असेल? ऑनलाईन गेम्समधील प्रत्येक गोष्ट त्यांनी इस्लामच्या तत्त्वांवर पडताळून पाहायला हवी. ‘पब्जी’ खेळावा की खेळू नये, याचेही उत्तर शोधण्याचा प्रयत्न अशा कट्टरपंथीयांणी केला पाहिजे.
एका महिलेने या कार्यक्रमात ऑनलाईन गेमिंगबद्दल प्रश्न विचारला असता, “तुमचा मुलगा पबजी खेळतो का? फ्रंटलाइनवाला आहे का?” असा प्रतिप्रश्न पंतप्रधान मोदींनी त्या महिलेला विचारला.