सदानंद फणसे यांनी आपल्या मनातले कल्याण ‘कल्याण नागरिक’ आणि ‘सा. वार्ता-सूत्र’ या माध्यमातून कागदावर उतरवले आहे. त्यांच्या लेखनातून त्यांच्या अगदी जवळच्या असलेल्या आठवणी तर आपल्याला वाचायला मिळतातच, पण कल्याण शहराशी निगडित आणि नंतर तिथून पुढे थोड्या फार आठवणी मुंबईतल्याही आहेतच.
Read More
या जाहिराती आपल्या घरी तेव्हा रोज लागायच्या. यामध्ये संदेश असायचा, यामध्ये लय ताल, आणि सुंदर शब्द असायचे. कारण या जाहिरातींचा उद्येश्य केवळ एखादी वस्तु विकणे नाही तर लोकांना त्यासोबत जोडणे हा ही असायचा. किती जाहिराती आल्या आणि गेल्या, कितीतरी उद्या येतील आणि जातील मात्र 90's किड्सच्या मनात असेलल्या या जाहिरातींच्या आठवणी नेहमी तशाच राहतील.
पुन्हा कधीतरी त्या मालिका येतील का? पुन्हा कधीतरी पोट दुखवून हसवणारा हम पाँच सारखा एखादा परिवार येईल का? कधीतरी तूतू मैंमैं सारख्या सास बहू भेटतील का? कधीतरी व्योमकेश बक्षी तसाच, त्याच स्वरूपात भेटायला येईल का? आज यूट्यूबवर सर्व काही आहे, मात्र त्याकाळचं वातावरण ते कुठून आणणार? पुन्हा एकदा आपल्याला 90'sच्या आपल्या जुन्या घराच्या जुन्या खोलीच्या जुन्या टी.व्ही. समोर बसून आपल्या त्याच जुन्या परिवारासोबत या मालिका जगता येतील का? पुन्हा... एकदा.... हो केवळ एकदाच?
आज रविवार. सकाळ जरा उशीराच उगवली. मात्र आता दूध पिऊन पटापट आंघोळ आटपून टी.व्ही. समोर बसायचंय. का? कारण... अरे माझं आवडतं मोगली लागणार आहे ना आता. सिंबा, मोगली, अंकल स्क्रूज माझी वाट बघत असतील... आई अगं ए आई कार्टून बघू दे ना जरा...
त्यामध्ये गाणी असतील, कार्टून्स असतील, मालिका असतील, जाहीराती असतील, गायक असतील, अभिनेते असतील, पुस्तकं असतील, कविता असतील, खेळ असतील, आणि खूप काही असेल. पुढच्या गुरुवार पासून दर आठवड्यात... चक्कर मारून येऊयात एकदा पुन्हा 90's च्या गावात...