विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. इथे नांदणारी प्रत्येक संस्कृती एकमेकांपासून वेगळी आहे. तरीही इथल्या प्रत्येक संस्कृतीला रामनामाने जोडले आहे. इथल्या प्रत्येक संस्कृतीची स्वत:ची एक रामकथा आहे. या कथेत फरक आहे. तिथल्या चालीरीती परंपरा यांचा प्रभाव या रामकथेवर आहे. भारताचा अविभाज्य अंग असणार्या ईशान्य भारतातल्या रामकथेबाबत या लेखात जाणून घेऊया.....
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ईशान्य दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी अरुणाचल प्रदेशला पोहोचले. येथे त्यांनी हजारो कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यापैकी, सर्वात महत्वाचा होता, जगातील सर्वात जास्त उंचीवर (१३००० फूट) बांधलेला सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, बहुप्रतिक्षित आणि सर्वात लांब बोगदा सेला पास. हे बोगदे पूर्णपणे स्वदेशी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधण्यात आले आहेत. बर्फवृष्टीचा बोगद्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनी ईशान्य भारतातील समस्यांचे निराकरण होत आहे
उत्तर प्रदेशात निर्माण झालेला राजकीय तिढा सोडविण्यासाठी भाजप नेतृत्व ईशान्येकडे मोठ्या आशेने पाहात असताना ईशान्येत उत्तर प्रदेशपेक्षा मोठा तिढा निर्माण झालेला दिसत होता. बांगलादेशातील निर्वासित हिंदूंच्या वाट्याला आलेल्या नरकयातनांशी, देशावर फाळणी लादणाऱ्या काँग्रेसला काही देणेघेणे असण्याची शक्यता नव्हतीच, परंतु राजकीय नुकसान सोसूनही हा विषय धसास लावण्याचा भाजपचा इरादा होता. भाजपच्या ईशान्येतील यशाकडे या पार्श्वभूमीवर पाहिले की, त्या यशाची झळाळी आपल्या लक्षात येईल.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आज पूर्वोत्तर राज्यं संपर्कतारुपी नौकेत स्वार झाली आहेत खरी. मात्र, ही नौका पैलतीरी लावण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती, चिकाटी, मेहनत आणि प्रचंड संसाधनांची गरज आहे. येथे आपल्याला राजकीय औदासिन्य, प्रशासनिक अडखळे, खडतर भौगोलिक परिस्थिती आणि आर्थिक चणचण अशा चार आघाड्यांवर लढावं लागणार आहे. वाहतूक, व्यापार, पर्यटन आणि डिजिटल संपर्कता या सर्वाचं अंतिम ध्येय मानवी मनांमध्ये संपर्कता प्रस्थापित करणं हेच आहे आणि ते साध्य होईपर्यंत हे अभियान पूर्णत्वाला आलं असं म्हणता येणार नाही! अशी आ
चहाचे मळे म्हटले की, आपसुकच डोळ्यासमोर पहिले चित्र उभे राहते ते पारंपरिक वेशभूषेत चहाची नाजूक पानं अगदी खुबीने खुडणाऱ्या आणि पाठीला टांगलेल्या टोपीत अलगद जमा करणाऱ्या आसामी महिलांचे.
ईशान्य भारतातील दुर्गम आणि तीन दिशांनी बांगलादेशने वेढलेले एक राज्य म्हणजे त्रिपुरा. गेल्या वर्षी कम्युनिस्ट सरकारची ४० वर्षांची सत्ता उलथवून त्रिपुरात भाजपने स्पष्ट बहुमतासह सत्तारोहण केले आणि तरुण, तडफदार विप्लव कुमार देव त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मार्च महिन्यात त्रिपुरातील भाजप सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होईल. त्यानिमित्ताने त्रिपुरात झालेला सर्वांगीण विकास, राज्यातील समस्या आणि संधी याविषयी महाराष्ट्रातील काही निवडक पत्रकारांशी विप्लव कुमार देव यांनी मनमोकळेपणाने त्रिपुराची राजधा
ईशान्य भारतातील इस्लामिक घुसखोरांच्या समस्येचे गांभीर्य ओळखून त्याविरोधात परखड मतप्रदर्शन करणाऱ्या मेघालय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुदीप रंजन सेन यांच्या वक्तव्यावरून एकच गदारोळ माजला. पण, मेघालयाच्या या न्यायाधीशाने दिलेला इशारा दुलर्क्षित करुन चालणार नाही.