प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याला सलमान खान यांच्या होस्टिंग असलेल्या 'बिग बॉस' च्या आगामी सिजनसाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्याने ही ऑफर साफ नाकारत एक जोरदार टोला लगावला.
Read More
( Ratan Tata ) प्रसिद्घ उद्योगपती रतन टाटा यांचे दोन दिवसांपूर्वी बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी देहावसान झाले. त्यांच्या निधनामुळे साऱ्या उद्योगविश्वाला धक्का बसला. रतन टाटा हे मोठे उद्योजक जरी असले तरी इतर उद्योजकांपेक्षा ते वेगळे आहेत हे त्यांनी पदोपदी दाखवून दिले. त्यामुळेच जगभरातील अनेक दिग्गजांकडून त्यांच्या कार्यकर्तृत्वास आदरांजली वाहण्यात आली. अशातच एका मोठ्या उद्योजकाने केलेली सोशल मीडिया पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे. पेटीएम चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करणारी एक पोस
कलाकारांना सोशल मिडियावर कोणत्याही कारणाने ट्रोल करणं सुरुच असतं. कधी त्यांच्या राजकीय, सामाजिक मतांवरुन तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींवरुन त्यांना कायम टार्गेट केलं जातं. सध्या अभिनेते अविनाश नारकर यांना नेटकऱ्याने त्यांच्या डान्सवरुन ट्रोल केले आहे. अविनाश नारकर त्यांच्या पत्नी ऐश्वर्या नारकर सोबत सोशल मीडियावरील ट्रेण्ड फॉलो करताना दिसत असतात. नुकताच अविनाश यांनी एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता. ज्यावर एका नेटकऱ्याने असभ्य भाषेत प्रतिक्रिया दिली असून नारकरांनी सडेतोड उत्तर दिलं.
माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणच्या पत्नी बुरखा आणि हिजाब नसलेला व्हिडिओ समोर आल्यामुळे कट्टरपंथी संतप्त झाले आहेत. कट्टरपंथीयांनी इरफान पठाणच्या पत्नीबद्दल सोशल मीडियावर अशोभनीय टिप्पणी केली आणि तिला इस्लामचे धार्मिक नियम शिकवण्यास सुरूवात केली आहे. कुणी म्हटलं की इरफानची बायको काही दिवसांत कपड्यांशिवाय दिसणार आहे, तर कुणी म्हटलं की तीही भविष्यात बिकिनी घालायला सुरुवात करेल. काही लोकांनी तर इरफान खानच्या पत्नीला निर्लज्ज देखील म्हटलं.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता गौरव मोरे सध्या मराठीसह हिंदी मनोरजंनसृष्टीतही आपले नाव मोठे करत आहे. काही दिवसांपुर्वी गौरवने (Gaurav More) महाष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाला रामराम केला आणि मॅडनेस मचाएंगे या हिंदी रिअॅलिटी शोमध्ये एन्ट्री घेतली. मात्र, या कार्यक्रमात एक स्कीट सादर केल्यानंतर लोकांनी त्याला ट्रोल केलं असून त्याची तुलना राणू मंडलसोबत केली आहे. या ट्रोलर्सला आता गौरवने चांगलेच सडेतोड उत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी गौरव, कुशल आणि हेमांगी या तिघांच्या एका स्कीटचा व्हिडीओ शेअर कर
सध्या सोशल मिडियावर कलाकरांना ट्रोल करणं वाढलं आहे. त्यांच्या कोणत्याही वक्तव्यावर, मतांवर किंवा अन्य कोणत्याही बाबींवर ट्रोलिंग केलं जातं. पण आता या ट्रोलर्सना अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजकेर (Mahesh Manjarekar On Trolling) यांनी चांगलंच सुनावलं आहे. पुण्यात एका कार्यक्रमात सहभागी झाले असता त्यांनी ट्रोलिंगवर भाष्य केले असून ट्रोलर्सना (Mahesh Manjarekar On Trolling) तुरुंगाची हवा खायला लावली तरच ते बंद होईल असे मत त्यांनी बेधडकपणे मांडले आहे.
अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक अशा तीनही जबाबदाऱ्या लिलया पेलणारे चिन्मय मांडलकेर (Chinmay Mandalekar) यांनी आजवर ६ चित्रपटांतून साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर आहे. परंतु, सोशल मिडियावर चिन्मय यांच्या मुलाचे नाव जहांगीर का आहे? यावरुन झालेल्या ट्रोलिंगमुळे चिन्मय मांडलेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे ते छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नसल्याचा निर्णय त्यांनी घेतला असून त्यासंदर्भात स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ देखील त्यांनी (Chinmay Mandalekar) सोशल मिडियावर
अभिनेते चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांना त्यांच्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यामुळे त्यांनी मोठा निर्णय घेत यापुढे कधीच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही असे जाहिर केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतूनही त्यांचे समर्थन अनेकांकडून (Chinmay Mandalekar) केले जात आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांनी एक विशेष पोस्ट करत महाराष्ट्र सरकारकडे ट्रोलर्स विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अभिनेते नाना पाटेकर यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर धुमाकुळ घालत आहे. नाना पाटेकर यांनी सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका चाहत्याला डोक्यात चापट मारल्याबद्दल ट्रोल केले जात आहे. मात्र, आता नाना पाटेकरांनी या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. घडलेल्या संपुर्ण प्रकरणाचे स्पष्टीकरण नानांनी दिले आहे. मी असे कृत्य कधीच करत नाही. कोणालाच मी फोटो काढण्यासाठी मनाई करत नसल्याचे नानांनी म्हटले आहे. दिग्द्रशक अनिल शर्मा यांच्या आगामी 'जर्नी' चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी सध्या नाना पाटेकर वाराणसी येथे असून यावेळी ही घटना
अभिनेते नाना पाटेकर यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर धुमाकुळ घालत आहे. वाराणसीत एका चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान एक फॅन नाना पाटेकर यांच्याकडे सेल्फी काढण्यासाठी आला असता त्याला रागात नानांनी फटकारल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून त्यांच्या या वागणूकीमुळे त्यांना ट्रोल केले जात आहे.
पोलिसांनी धार्मिक भावना भडकवणे, दंगल भडकावणे अशा विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. जेव्हा हे गुन्हे दाखल झाले तेव्हा कर्नाटकात कुमारस्वामींचे सरकार होते.
आसारामबापूला जोधपुर न्यायालयाने बलात्कार प्रकरणी दोषी ठरवल्यानंतर कॉंग्रेस पक्षासह अनेक जण मोदींना ट्रोल करू पाहत आहेत.