आपल्या मालकीचं घर, जमीनजुमला, दागदागिने, रोख रक्कम, गुंतविलेले पैसे हे ज्याचे आहेत, त्याच्या पश्चात कोणाकडे जावेत, यासाठी नामांकन अवश्य करावे. बर्याच गुंतवणूक पर्यायाच्या फॉर्मवर ‘नॉमिनेशन’ची माहिती भरण्यास सांगितलेली असते, ती अवश्य भरावी. तो फॉर्म कोरा ठेवू नये. जर नामांकन केलेले असेल, तर तुमची संपत्ती सहजतेने ‘नॉमिनी’ला मिळू शकेल. जर नामांकन केलेले नसेल, तर संबंधित वारसाला पैसे मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.
Read More
हल्लीच्या सोसायटीच्या जमान्यात सोसायटी शेअर सर्टिफिकेट हस्तांतरणाकरिता नॉमिनेशन केले की आपल्या पश्चात मालमत्तेची व्यवस्था लावण्याचे काम पूर्ण झाले, आता काहीही करायची आवश्यकता नाही असा बहुतांश लोकांचा आजही गैरसमज आहे.
आयुष्य क्षणभंगुर आहेच, पण कोरोनामुळे ते जास्तच अशाश्वत झालेले आहे. त्यामुळे प्रत्येकाने विशेषत: वरिष्ठ नागरिकांनी आपल्या सर्व संपत्तीत मग ती स्थिर असो की अस्थिर ‘नॉमिनी’ नेमायला हवा. ‘नॉमिनेशन’ (नामांकन) करावयास हवे. त्याविषयी आज सविस्तर जाणून घेऊया...
ऑनलाईन विल करण्याकरिता बरेच प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. ही सेवा देणारी पोर्टल्स रेडी टू यूज फॉरमॅट देतात. काही पोर्टल्सवर तुम्हाला कायदेशीर सल्लाही मिळू शकतो.