‘एमबीएस’ हा ‘दूध का धुला हुवा’ आहे, असा माझा गैरसमज अजिबात नाही. पण, त्याने जो प्रकल्प हाती घेतला आहे, तो जवळपास अशक्यप्राय आहे.
Read More
सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद-बिन-सलमान यांनी एक मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखला आहे. व्यापारीदृष्ट्या अतिशय मोक्याच्या, महत्त्वाच्या ठिकाणी ‘न्योम’ या नावाचे नवीन बंदर वसवायचे, अशी भव्य कल्पना मोहम्मद-बिन-सलमान यांनी मांडली आहे, नव्हे, काम सुरूच केले आहे.
सौदी अरेबियाने ‘द लाईन’ या नावाने जादुई शहर उभारण्याचा प्रकल्प आता हाती घेतला आहे. जगात सध्या उपलब्ध असलेल्या प्रत्येक तंत्रज्ञानाचा वापर या शहरामध्ये केला आहे. काही महिन्यांपूर्वीच युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी १७० किमी लांबीच्या परिसरामध्ये या अत्याधुनिक शहराची निर्मिती करण्याची घोषणा केली असून, दहा लाख लोकसंख्या तेथे वसविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, जगभरातील लोकांना या शहरामध्ये राहण्यासाठी आकर्षित करण्यात येणार आहे.