महाराणी ताराबाईंच्या येण्याने रमा – माधवच्या नात्यात कोणते बदल होतील ?
Read More
शहरी नातेसंबंधांभोवती गुंफण्यात आलेल्या ‘मीडियम स्पाइसी’ या रोमांचक चित्रपटाच्या निमित्ताने अनेक प्रतिभावंत कलाकार एकत्र आले आहेत. ललित प्रभाकर, सई ताम्हणकर आणि पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिकांसह सागर देशमुख, ज्येष्ठ कलाकार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी यांच्या सहायक भूमिका असलेला हा चित्रपट या वर्षीचा कलाकारांची मांदियाळी असणारा चित्रपट ठरणार आहे.
आई-मुलाचे, प्रियकर-प्रेयसीचे प्रेम अधोरेखित करणारा, एक कौटुंबिक संदेश देणारा आणि स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला श्राबणी देवधर दिग्दर्शित'मोगरा फुलला' हा चित्रपट १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. तीन दिवसांत या चित्रपटाने एकुण १ कोटी ४५ लाखांचा गल्ला जमवला होता.
स्वप्नील जोशीचा चित्रपट म्हणूनही ‘मोगरा फुलला’ बद्दल रसिकांमध्ये खूप उत्सुकता आहे. या चित्रपटाचे नुकतेच प्रदर्शित झालेले ट्रेलर, टीझर आणि पोस्टर्सना रसिकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हे नाव विचित्र वाटतं ना ऐकायला ? मात्र इंग्रजीच्या "कडल" या शब्दाचा वापर करुन बनवण्यात आलेला शब्द म्हणजे कडली. एका छोट्या बाळासाठी सर्व सुविधायुक्त असलेला झोपाळा, ज्याला कुठेही घेऊन जाता येईल, असा हा कडली. कडल करणं म्हणजेच लाडावणं, कुरवाळणं, तर जो झोपाळा बाळाला आई सारखं कुरवाळेल ते म्हणजे कडली. सतत हे सांगण्याचे कारण म्हणजे आजचा लघुपट याच विषयावर आहे.