Navghar

सैफुल्लाहनंतर पाकिस्तानात आणखी एका दहशतवाद्यावर अज्ञातांकडून हल्ला!

(Lashkar-e-Taiba co-founder Amir Hamza) दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा सह-संस्थापक दहशतवादी आमिर हमजावर लाहोरमध्ये अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्यात हमजा गंभीर जखमी झाला आहे. यानंतर त्याला उपचारांसाठी पाकिस्तानच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' राबवून १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अशातच आता अज्ञातांच्या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आमिर हमजा जखमी झाल्याची बातमी समोर आ

Read More

पाकिस्तानात भीषण अन्नटंचाई! १.१ कोटी जनतेवर उपासमारीची वेळ, संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याची घंटा

(11 million stare at starvation in Pakistan) पाकिस्तानातील १.१ कोटी जनता तीव्र अन्नटंचाईच्या समस्येला तोंड देत आहेत, त्यापैकी अनेक जण उपासमारीच्या थेट उंबरठ्यावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (FAO) शुक्रवार, दि. १६ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘जागतिक अन्न संकट २०२५’ या अहवालातून ही धोकादायक स्थिती समोर आली आहे. या अहवालातून पाकिस्तानमध्ये विशेषतः बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा सारख्या संघर्षग्रस्त आणि उपेक्षित भागांमध्ये अन्नटंचाईची भीषण परिस्थिती ओढवल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read More

पाकविरोधात आणखी एक मोठे पाऊल! 'या' स्टेडियममधील ‘वॉल ऑफ ग्लोरी’ वरून हटवले पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो

(Jaipur's Sawai Mansingh Stadium removed Photos of Pakistani Cricketers) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेला भारत-पाकिस्तान मधील तणाव आता हळूहळू निवळत आहे. मात्र या तणावाचा थेट परिणाम भारतीय क्रिडाविश्वावर झाल्याचे दिसून आले. या संवेदनशील काळात दोन्ही देशांकडून आपापल्या क्रिकेट लीग्स पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तर या पार्श्वभूमीवर आता राजस्थान क्रिकेट असोसिएशनकडून (आरसीए) आणखी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. जयपूरमधील सवाई मान सिंग स्टेडियममधील 'वॉल ऑफ ग्लोरी' वरून पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकण्या

Read More

सध्या तरी युद्धविराम, मात्र आगळिकीस कठोर प्रत्युत्तर मिळेल

( India-Pakistan Tensions ) “भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघन न करण्याच्या निर्णयानंतर आज हा युद्धविराम संपणार असून पुन्हा दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल,” अशा प्रकारच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. याबाबत भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले की, “दोन्ही देशांच्या ‘डीजीएमओं’ची कोणतीही नियोजित चर्चा होणार नाही. दि. १२ मे रोजी झालेल्या शेवटच्या चर्चेत युद्धबंदीचा नियम आणि त्याबद्दलच्या अटी-शर्थी ठरवण्यात आल्या होत्या. तीच भारत-पाकिस्तानच्या ‘डीजीएमओं’ची शेवटची चर्चा होती.

Read More

ऑपरेशन सिंदूर च्या यशानंतर खापरखेडा येथे तिरंगा सन्मान यात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती

पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ भारतीय सेनादलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेल्या महापराक्रमाच्या सन्मानार्थ नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा-चिचोली ग्रामपंचायत क्षेत्रात आज सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा काढण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर-अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे आणि सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली होती.

Read More

रशिया केंद्रित तटस्थता आणि स्वनेतृत्वाखालील महासत्ता

पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाच्या मुद्द्यावर जग भारताच्या बाजूने आहे, असा आभास निर्माण झाला. परंतु, ‘ऑपरेशन सिंदूर’ला सुरुवात झाल्यावर जेव्हा युद्धाचा प्रसंग आला, तेव्हा भारत-पाकिस्तानला एकाच तराजूतून मोजणारी परिस्थिती फारशी बदललेली नाही, असे आपल्या लक्षात आले. भारताच्या दृष्टीने हा पहिलाच अनुभव नव्हता. परंतु, गेल्या काही वर्षांत भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव वाढत आहे, असे आपण समजत होतो. तो आपला भ्रम होता व भारत आहे त्या स्थितीवरच पुन्हा परतला आहे, असे एखाद्याला वाटू शकते. परंतु ही वस्तुस्थ

Read More

कोण आहे ज्योती मल्होत्रा? जिने केली पाकिस्तानसाठी हेरगिरी?

ज्योती मल्होत्रा. भारतातील एक ट्रॅव्हल ब्लॉगर आणि युट्यूबर. सोशल मीडियावर ज्योतीचे लाखों फॉलोअर्स. मात्र, याच ज्योती मल्होत्रा हिला आता देशविरोधी कारवाया आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनांशी संबंध असल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आलीये. तिच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचाही आरोप आहे. एकीकडे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती असताना ज्योती मल्होत्रा या महिलेचे हे कृत्य उघडकीस आले आहे. मात्र, ही ज्योती मल्होत्रा नेमकी कोण आहे? ती पाकिस्तानच्या संपर्कात कशी आली? आणि ती

Read More

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या संरक्षण बजेटमध्ये झाली वाढ...

पाकिस्तानच्या कुरघोड्या, चीनची दहशतवादी देश असलेल्या पाकिस्तानला फूस, तुर्कीची पाकिस्तानशी वाढलेली जवळीक आणि भारताविरोधात या तिन्ही देशांची उघड झालेली आघाडी लक्षात घेतला केंद्र सरकारचे संरक्षण बजेट वाढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर प्रामुख्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्रासाठीचा एकूण निधी ७ लाख कोटींच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०२५-२६च्या अर्थसंकल्पात संरक्षण खात्यासाठी ६.८१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ही तरतूद मागील वर्षीच्या बजेटच्य

Read More

‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

विसाव्या शतकातील जागतिक संघर्षांच्या अनुभवातून शिकत, भारताने एकविसाव्या शतकात आपल्या संरक्षण धोरणात निर्णायक बदल केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे या परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी उदाहरण. ही मोहीम केवळ सैनिकी विजयावर सीमित राहिली नाही, तर भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक बनली. तसेच या मोहिमेने जगाला एक स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कोणत्याही शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या यशाने भारताच्या परराष्ट्र धोरणात एक नवा मानदंड स्थापित केला आणि जागतिक मंचावर आपल्या

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121