Climate Change पर्यावरणात वारंवार होणारे बदल अर्थव्यवस्थेसाठी गंभीर संकट निर्माण करणारे ठरत आहेत. एखाद्या राष्ट्रावर ओढवलेले संकट हे संपूर्ण जगाच्या चिंता वाढवणारे ठरू शकते. त्यामुळेच जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हवामान बदल हे काळजीचे प्रमुख कारण ठरताना दिसते. ही स्थिती रोखण्यासाठी जागतिक स्तरावर कठोर उपाययोजना करण्याची नितांत गरजेच्या!
Read More
Muzaffarnagar उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरचे नाव बदलण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. हिंदू युवा वाहिनीच्या सदस्यांनी शहरात सर्वत्र पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्समध्ये मुझफ्फरनगरचे नाव बदलण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. हिंदू युवा वाहिनीच्या सदस्यांनी शहरात सर्वत्र पोस्टर्स लावण्यात आले आहेत. शनिवारी रेल्वेस्थानक आणि मुख्य रस्त्यांवर मुझफ्फरनगरऐवजी लक्ष्मीनगर नाव लिहिलेले बॅनर दिसू लागले आहेत.
( Organizational Change in Aap party ) आदमी पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या (पीएसी) बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. बैठकीत अनेक मोठ्या नेत्यांना मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. पक्षाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पंजाबचे प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. तर, गोपाळ राय यांना गुजरातचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
हवामान बदलासाठी भारत हा जगातील सातवा सर्वांत असुरक्षित देश असल्याचे आर्थिक सर्वेक्षणातील अहवालात नुकतेच नमूद करण्यात आले. त्यामुळे हवामान बदलाची कारणमीमांसा पाश्चिमात्त्यांच्या निकषांनुसार, नियमांनुसार न करता, भारतकेंद्रित दृष्टिकोनातूनच या समस्यांवर शाश्वत समाधान शोधणे हीच काळाची गरज...
एखाद्या व्यक्तीने त्याच्या हयातीत कमविलेल्या चल-अचल संपत्तीचे त्याच्या पश्चात योग्य पद्धतीने वाटप होण्याकरिता, संपत्ती नियोजन प्रत्येकाने त्याच्या हयातीतच म्हणजे, तो जीवंत असतानाच करावे. यासाठी नामांकन (नॉमिनेशन) ( Nomination Rules ) आणि इच्छापत्र (व्हिल) हे दोन प्रमुख पर्याय आहेत. भारतीयांमध्ये इच्छापत्राबाबत अजूनही पुरेशी जागरुकता असल्याचे दिसून येत नाही. इच्छापत्र करणार्यांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. बर्याच जणांना याबाबत पुरेशी माहितीही नसते. या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन करणे सहज आणि सोपा पर्याय आहे. त्
भारतातील कुंभमेळ्याला ( Prayagraj Maha Kumbh ) प्राचीन इतिहास आहे. या कुंभमेळ्याने जगभरामध्ये भारताला एक वेगळीच ओळख प्राप्त करून दिली आहे. २०१९ मध्ये झालेला कुंभमेळा हा देखील विशेष असाच होता. त्या कुंभमेळ्याच्या आयोजनातूनच दुणावलेल्या विश्वासाच्या आधारावर महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनाचा घेतलेला हा आढावा...
अभिनेता अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा २' चित्रपटाने २०२४ हे वर्ष विशेष गाजवलं. एकीकडे बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या या चित्रपटाला एका महिलेच्या मृत्यूमुळे गालबोट देखील लागलं होतं. आता असाच प्रकार अभिनेता रामचरण याच्या आगामी 'गेम चेंजर' या चित्रपटाबाबत घडलं आहे. राम चरणच्या ‘गेम चेंजर’ चित्रपटाच्या एका इव्हेंटनंतर अशीच दुर्दैवी घटना घडली, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
अभिनेत्री किआरा अडवाणी अभिनेता रामचरण सोबत आगामी दाक्षिणात्य चित्रपट 'गेम चेंजर' मध्ये झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. देशभरातून ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सध्या याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रामचरण आणि किआरा बऱ्याच ठिकाणी फिरत असून अचानक तिची तब्येत बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. पण नेमकं काय झालं आहे कियाराला जाणून घेऊयात...
मुंबई : जगातील गजबजलेल्या शहरांपैकी एक असलेल्या मुंबईची हवा ( Mumbai Air ) बिघडली आहे. येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १५९ वर पोहोचण्यासह धुलिकणांचे प्रमाणही वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. काही भागांतील हवा ही सातत्याने ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ श्रेणीतच नोंदली जात आहे. यामध्ये कुर्ला, कलिना, भायखळा, वरळी, माझगाव या परिसराचा समावेश आहे. बोरिवलीमध्ये गेल्या एका महिन्यातील साधारण दहा ते १५ दिवस ‘वाईट’ हवेची नोंद झाली तर, काही दिवस सलग ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली आहे. येथील हवा निर्देशांक हा नोव्हेंबर महिन्यापास
मुंबई : कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज ( Climate Change ) वर्तविण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग; २७ डिसेंबर रोजी खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी; आणि २८ डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे), आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.
मुंबई : हवामानबदलाशी ( Climate Change ) झगडण्याकरिता चांगल्या उपाययोजना करणार्या ६५ देशांच्या यादीत भारताला दहाव्या स्थानावर नामांकित करण्यात आले आहे. जर्मनवॉच, न्यूक्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट अॅक्शन नेटवर्कने प्रकाशित केलेल्या ’क्लायमेट चेंज पर्फोमन्स इन्डेक्स’ या अहवालात भारताला दहावे स्थान देण्यात आले आहे. पहिल्या दहा क्रमाकांमध्ये ’जी-२०’ देशांमधील केवळ भारत आणि इंग्लंड या देशांचा समावेश आहे. याच अहवालात भारत गेल्यावर्षी सातव्या क्रमांकावर होता.
मुंबई : वेगाने होणार्या हवामान बदलाच्या परिस्थितीचा लहान मुलांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होणार असल्याचे ‘युनिसेफ’ने ( Unicef ) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणाचा होणारा परिणाम टाळण्यासाठी तत्काळ कृती करण्याची आवश्यकतादेखील त्या अहवालाने नमूद केली आहे.
हवामान बदलाचे संकट केवळ एका देशाचे नसून, जागतिक पातळीवर त्याची तीव्रता लक्षणीय वाढली आहे. हवामान बदलाच्या घटना वारंवार घडून लागल्याने, विशेषतः विकसनशील राष्ट्रांमधील नागरिकांचे अस्तित्वच धोक्यात आले असून, भारताने तेच नेमकेपणाने विकसित राष्ट्रांना ‘कॉप-२९’ परिषदेत ठणकावून सांगितले, ते योग्यच!
प्रतिनिधी दादरच्या शिवाजी पार्क येथे आज होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी मंगळवार दि.१२ रोजी वाहतूक निर्बंध आणि वळवण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह १४ नोव्हेंबरला दादरच्या शिवाजी पार्कवर आयोजित महायुतीच्या जाहीर सभेत मोठ्या संख्येने समर्थक जमू शकतात.
निवडणुका जाहीर झाल्या की, संविधान बदलाची आरोळी ठोकली जाते. २०१४, २०१९ आणि आता २०२४च्या निवडणुकांदरम्यानही तीच परिस्थिती. मोदी सरकार सत्तेत आले की संविधान बदल हा अटळ आहे, अशा आशयाचा अपप्रचार शिगेला पोहोचतो. यंदाही परिस्थिती काही वेगळी नाही. काँग्रेसचे युवराज राहुल गांधी आणि अख्ख्या पक्षाकडूनच संविधान बदलाचा बागुलबुवा उभा केलेला दिसतो.
२०२४ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ‘पद्मश्री’ रमेश पतंगे लिखित ‘दि गेम चेंजर : नरेंद्र मोदी’ हे पुस्तक दि. २० फेब्रुवारीला ‘विवेक प्रकाशन’तर्फे प्रकाशित होत आहे. देशात झालेले वैचारिक परिवर्तन म्हणजेच मोदींनी केलेला हा ‘गेम चेंज’ आहे. तो समजून घेण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना विषय मांडणीसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.त्यानिमित्ताने या पुस्तकात काय मांडले आहे, हे समजण्यासाठी पुस्तकाच्या भूमिकेचा संक्षिप्त भाग येथे देत आहोत.
दक्षिण श्रीलंकेतील मतारा जिल्ह्यातील अकुरेसा येथील टी इस्टेटमध्ये (चहाच्या मळ्यात) पक्षी, खारी, ससे आणि साप आढळून येतात. परंतु, गेल्या आठवड्यात तिथे एक १५ फूट लांबीची मगर आढळून आली होती.
हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर देश-विदेशातील पक्ष्यांचे भारतात तसेच मध्य आशियात स्थलांतर सुरू आहे. मात्र, हवामान आणि वातावरण बदलांमुळे पक्ष्यांच्या स्थलांतरावर कोणते परिणाम आणि बदल झाले आहेत या विषयावर सदर परिषदेत चर्चा झाली.
हवामान बदलाच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी विकसनशील देशांना मदत म्हणून निधी उभारण्यावर जगातील सर्व देशांचे एकमत झाले असून, दुबई येथील ‘कॉप २८’ हवामान परिषदेत त्याची घोषणा करण्यात आली. ‘युरोपीय महासंघा’सह अमेरिकेने यासाठी निधी देण्याची हमी दिली. भारतानेही त्याचे स्वागत केले आहे.
ठाण्यातील कासारवडवली भागात मेट्रो मार्गिकेवर गर्डर बसविण्याच्या कामासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून वाहतुक बदल लागू करण्यात आले असून यानुसार या रस्त्यावरील पर्यायी मार्गिकेवर वाहतूक वळविण्यात आली आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत हे वाहतुक बदल लागू असणार आहेत, असे वाहतुक पोलिसांनी स्पष्ट केले.
वैश्विक युद्ध, मंदी व अर्थव्यवस्थेतील अडचणीच्या कालावधीत देखील काल रूपयाचा भाव वधारला असल्याने काल सोने चांदीच्या किंमतीत कपात झाली असली तरी दसरा सणाच्या निमित्ताने वाढलेली सोन्या चांदीची मागणी याचा एकत्रित परिणाम म्हणून आज पुन्हा एकदा भाव वाढले आहेत. MCX मध्ये मेटलची देखील भाववाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
आफ्रिकेतील सिंहांच्या वर्तनावर हवामान बदलाचा परिणाम झाल्याचे अलीकडील काळात झालेल्या अभ्यासात समोर आले आहे. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाच्या अभ्यासात हे वास्तव नमूद करण्यात आले आहे. नुकतेच या विषयीचे संशोधन जर्नल ‘कम्युनिकेशन्स बायोलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले. सिंह हे मानवी वस्तीपासून दूर राहणेच पसंत करतात, असे या अभ्यासात समोर आले. सिंहांच्या अधिवासाचे विभागीकरण झाल्यामुळे त्यांना अन्नाच्या शोधात, त्यांचा अधिवास सोडावा लागतो आणि मानवी वस्तीजवळ यावे लागते. या निष्कर्षातून असे समोर येते की, सिंहांचे अधिवा
भारताच्या ‘जी२०’ अध्यक्षपदाच्या सक्रिय भूमिकेद्वारे इतिहासात प्रथमच ग्लोबल साऊथमधील देशांना एकत्रित करण्यात आले आहे. याद्वारे नवी सत्ताकेंद्रे उदयास येत असल्याचे रशियास दिसून येत आहे. हितसंबंधांच्या स्पष्ट व न्याय्य समतोलासाठीसाठी प्रयत्न करण्याच्या मुद्द्याच्या समावेशामुळे नवी दिल्ली घोषणापत्र हे ‘माईलस्टोन’ ठरले आहे, असे प्रतिपादन रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह यांनी केले.
निसर्गात घडणार्या घडामोडींची पूर्वसूचना प्राणी-पक्ष्यांना मानवाच्या आधी मिळते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. हल्लीच्या ‘स्मार्ट’ युगातील तंत्रज्ञान जिथे अचूक माहिती देऊ शकत नाही, अशा ठिकाणीदेखील पशू-पक्ष्यांनी दिलेले संकेत तंतोतंत खरे ठरतात. पाऊस येणार असल्याचा संदेश घेऊन येणारा ‘पावशा’ पर्यावरण बदलामुळे रुसला की काय, असे सद्यःस्थितीवरून निदर्शनास येते. ‘पावशा’या पक्ष्याचे आणि पावसाचे घनिष्ट नाते. ’पाऊस आला’, ’पाऊस आला’ किंवा ’पेरते व्हा’, ’पेरते व्हा’ अशा आवाजाने पावसाच्या आगमनाची वार्ता हा पक्षी देत असतो.
हवामान बदलाच्या संकटाशी जर सामना करायचा असेल, तर जंगल क्षेत्र अबाधित राहिलं पाहिजे आणि त्याच वेळेस एकूणच झाडांचं आच्छादन वाढलं पाहिजे, याविषयी कोणाचंच दुमत असू शकत नाही आणि याच विचारातून बहुदा देशाच्या इतिहासातील सगळ्यात मोठी वृक्ष लागवड मोहीम आम्ही हाती घेतली होती. याच काळात मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा ‘आयआयटी मुंबई‘कडून आम्ही सविस्तर अभ्यास करून घेतला आणि त्यांच्याकडून एक अहवालदेखील करून घेतला. या अहवालात जे नमूद केलं आहे ते मुंबईकरांपर्यंत तर पोहोचलं पाहिजेच. पण, ते महाराष्ट्रातील जनतेलादेखील
तीव्र हवामान बदलामुळे आफ्रिकेत रोगांचे प्रमाण वाढत असल्याचे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. आफ्रिका खंडातील मलावी या देशामध्ये १९९८ पासून ‘कॉलरा’ची साथ कायम आहे. ‘कॉलरा’ म्हणजे ‘व्हिब्रिओ कोलेरी’ या जीवाणूने दूषित अन्नपाण्याने होणारा तीव्र अतिसाराचा आजार. या रोगाचा पहिला उद्रेक १९९८ साली नोंदवण्यात आला होता. ‘कॉलरा’चा संसर्ग मालावीतील दक्षिणेकडील पूरग्रस्त जिल्ह्यांपुरता मर्यादित असला तरी सध्या देशाची राजधानी लिलोंगवे ही ‘कॉलरा हॉटस्पॉट’ बनली आहे. गंभीर बाब अशी २०२१ मध्ये दोन वर आलेली रुग्ण संख्या गेल्या
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक बँकेच्या ‘मेकिंग इट पर्सनल: हाऊ बिहेविअरल चेंज कॅन टॅकल क्लायमेट चेंज’ या कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. या संकल्पनेशी आपला वैयक्तिक संबंध असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आणि ही एक जागतिक चळवळ बनत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
एकीकडे उच्चांकी तापमानाचे नवनवीन प्रस्थापित होणारे विक्रम आणि दुसरीकडे अवकाळी-गारपिटीचा जोरडार तडाखा, अशा या लहरी हवामान बदलामुळे जागतिक तापमानवाढीचा कहरही दिवसेंदिवस वाढताना दिसतो. केवळ भारतातच नाही, तर जगभरात कमी-अधिक प्रमाणात वातावरण बदलाचे हे विदारक परिणाम दृष्टिपथास पडतात. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाची कारणं, त्याचे परिणाम हे आता तसे सर्वश्रुत. याविषयी कित्येक जागतिक परिषदांमधून वारंवार चर्चाही झडल्या. सर्व देश आपापल्यापरीने कार्बन उत्सर्जनाचे, प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्नशीलही दिसतात.
छत्रपती संभाजीनगर नामकरण समर्थनात दि.१९ मार्च रोजी काढलेल्या सकल हिंदू समाजाच्या मोर्च्यात लाखोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले. दरम्यान छत्रपती संभाजीनगर हेच नाव कायम राहील ते आता कोणीही बदलू शकणार नाही. छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी हे अखिल हिंदुस्तानचे प्रेरणास्थान आहेत. या नामकरणास विरोध व्हायला नको होता. परंतु काही स्वार्थी आणि जातीयवादी राजकारण करणाऱ्यांनी आपले खरे रूप दाखवले आहे. छ्त्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम होते असे सांगितले जाते, तसे खरंच असते तर छत्रपती संभाजी या नावाला विरोध केला नसता
जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ श्कोल्झ नुकतेच दोन दिवसीय भारत दौर्यावर होते. यावेळी दोन्ही देशांमधील व्यापार, संरक्षण क्षेत्रातील सहकार्य, रशिया-युक्रेन युद्ध यांसारख्या मुद्द्यांवर त्यांची पंतप्रधान मोदींशी सविस्तर चर्चा झाली. श्कोल्झ यांनी आपल्या दौर्यात भारतीय ‘आयटीयन्स’ना जर्मनीत नोकरीसाठी चक्क ‘रेड कॉर्पेट’च अंथरले. त्याविषयी...
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला अंटार्क्टिक समुद्रावरीलबर्फाचे प्रमाण १.९१ दशलक्ष चौरस किलोमीटर (७,३७,००० चौरस मैल) इतके कमी झाले. ही नोंद दि. २५फेब्रुवारी, २०२२ रोजी नोंदवलेल्या १.९२ दशलक्ष चौरस किलोमीटर (७,४१,००० चौरस मैल) चा विक्रमी नोंदींपेक्षा कमी असून, नवीन विक्रमी किमान प्रमाण या दिवशी नोंदवले गेले. अंटार्क्टिकेतल्या समुद्री बर्फाचा विस्तार २.० दशलक्ष चौरस किलोमीटर (७,७२,००० चौरस मैल) च्या खाली गेल्याचे हे नोंदवलेल्या इतिहासातले फक्त दुसरे वर्ष. जाणून घेऊया अंटार्क्टिकाभोवतीचा समुद्रातील बर्फाविषयी...
हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीबाबत क्वचितच आपल्याला चांगली बातमी मिळते. वाईट बातम्यांच्या या ओघात, सकारात्मक राहणे कठीणच! परंतु, या दुष्टचक्रातून वाट काढत, मानवाने पर्यावरण सुधारणांच्या दृष्टीने केलेल्या सकारात्मक कामांकडेदेखील लक्ष दिले गेले पाहिजे. याचाच एक भाग म्हणजे, गेल्या महिन्यात वातावरणातील ओझोन थर पुन्हा भरून निघत असल्याचे वृत्त समोर आले. अनेक दशकांच्या ‘रासायनिक ‘फेजआउट्स’ आणि जागतिक सामूहिक कृतीनंतर, 2040 पर्यंत बहुतेक ओझोन थर पूर्णपणे पुनरुज्जीवित होण्याची अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करण्यात आ
डोंबिवली : समाजात स्त्रियांना सन्मानाने वागावले जावे हा बदल घडण्यासाठी अजून खूप वेळ जाणार आहे. समाजात बदल अपेक्षित असेल तर मुलांची जडणघडण करतानाच त्यांना स्त्रियांना सन्मानाने वागावले पाहिजे हे शिकविण्याची गरज आहे. समाजात बदल घडेल तेव्हा मालिकामधून सोशिक स्त्री दाखविणे बंद होईल, असे मत अभिनेत्री अनिता दाते-केळकर यांनी व्यक्त केले.
गेल्या सहा दशकांनंतरच्या सर्वात मोठ्या दुष्काळाचा सामना सध्या चीन करत आहे. दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेली उष्णतेची लाट कायम राहिल्याने चीनमध्ये दि. १९ ऑगस्टला राष्ट्रीय दुष्काळ घोषित करण्यात आला
रोजगारातील महिलांसाठी कामाची संकरीत प्रणाली, वापरून स्त्रियांची आर्थिक गळचेपी थांबवली पाहिजे. महिलांच्या या ‘न्यू नॉर्मल’मध्ये त्यांची आरोग्याची काळजी, आर्थिक सक्षमता आणि मानसिक आधार या गोष्टींचा व्यवस्थित विचार झाला पाहिजे. घरात त्यांचे शोषण होत नाही, त्या घरी आणि कामाच्या ठिकाणी हिंसेला बळी पडत नाहीत, यादृष्टीने त्यांच्या कष्टांचे नियोजन केले पाहिजे.
अंटार्क्टिकाच्या गोठलेल्या टुंड्रा आणि थंडगार समुद्रात फिरणारा 'एम्परर' पेंग्विन, हवामान बदलामुळे पुढील ३० ते ४० वर्षांत नामशेष होण्याचा गंभीर धोका आहे, असा इशारा अर्जेंटिनाच्या अंटार्क्टिक संस्थेच्या (आय ए ए) तज्ज्ञाने दिला आहे.
पक्ष्यांवर होणाऱ्या हवामान बदलाचा गंभीर परिणाम एका अभ्यासाअंती समोर आला आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'स्टेट ऑफ द वर्ल्ड्स बर्ड्स' या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे हवामानात होणारे बदल हे उष्णकटिबंधीय तसेच पर्वतीय, ध्रुवीय आणि स्थलांतरित प्रजातींसाठी विशिष्ट चिंतेची बाब आहे.
कालानुरुप समुद्राच्या पातळीत होणारी वाढ ही भारतातील किनारपट्टीनजीकच्या शहरांच्या र्हासाला कारणीभूत ठरणार आहे. २०५०सालापर्यंत याचा प्रभाव जाणवणार असल्याची माहिती ‘आरएमएसआय’ या जागतिक संस्थेने दिली आहे
संयुक्त राष्ट्रांची हवामान संस्था असलेल्या 'इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज' (आयपीसीसी) ने नुकताच त्यांचा जागतिक हवामान बदलासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामध्ये 'आयपीसीसी'ने जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी फक्त तीनच वर्षं उरली असल्याचा इशारा दिला आहे. 'आयपीसीसी'च्या या अहवालात जागतिक तापमानवाढ थांबवण्यासाठी अनेकविध उपाययोजनाही सूचविल्या आहेत.
जमिनीखालच्या अंध लाल मुंग्या या कोकण किनारपट्टीवर जन्म घेणाऱ्या सागरी कासवांच्या पिल्लांच्या जीवावर उठल्या आहेत. ही बाब संशोधनाअंती समोर आली आहे. हवामान बदलामुळे तापमान वाढ झाल्याने कोकणातील सागरी कासवांच्या ( konkan sea turtle ) विणीच्या हंगामात बदल झाला आहे. परिणामी पिल्लांच्या जन्मावर त्याचा प्रभाव पडला असल्याचेही संशोधकांच्या निदर्शनास आले आहे. ( konkan sea turtle )
३१ मार्च हा International Transgender Day of Visibility. आजच्या दिवशी जगभरातील तृतीयपंथीयांवर होणाऱ्या भेदभावाबद्दल आणि समाजातील त्यांच्या योगदानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. ३१ मार्च २००९ रोजी पहिल्यांदा अमेरिकेत हा दिवस साजरा करण्यात आला आणि त्यानंतर २०१४ पासून संपूर्ण जगात हा दिवस साजरा करण्यात येतो. समाजाने आखलेल्या एका विशिष्ट चौकटीतून बाहेर येत काहीतरी करण्याची जिद्द बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणा देणारी ही एक छोटीशी गोष्ट....
कॅनडामध्ये हवामान बदलाचा पहिला रुग्ण सापडल्याच्या नुकत्याच समोर आलेल्या बातमीने एकच खळबळ उडाली. ‘हवामान बदलाचा रुग्ण’ म्हणजे नेमके काय, असा प्रश्न फक्त कॅनडामध्येच नाही, तर जगभरातील डॉक्टर आणि नागरिकांनाही पडला. हवामान बदलाचा पहिला रुग्ण ठरलेल्या त्या ७० वर्षीय महिलेला नेमके असे काय झाले की, तिची गणना या प्रकारात पहिल्यांदाच करण्यात आली, याविषयीदेखील अनेक चर्चा रंगू लागल्या.
शेतकर्यावर उपकार म्हणून तुटपुंजी मदत देण्याचे प्रकार थांबणे फार आवश्यक आहे, तसेच शेतकर्यांना मदत म्हणजे त्याला उपयोगी ठरणार्या संस्था/व्यक्तींना मदत नव्हे हे लक्षात ठेवले पाहिजे. कर्जे माफ करण्याने शेतकर्यापेक्षा कर्जे देणार्या बँकांना मदत होते. तशीच परिस्थिती आता विमा कंपन्यांची होत आहे. कर्जे व विमा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण, त्यात शेतकर्यांना दिलासा मिळाला पाहिजे, असे धोरण आखणे गरजेचे आहे.
दुसरीकडे, ब्राझीलच्या काही भागांत पावसाअभावी दुष्काळी आणीबाणी जाहीर करावी लागली.चीन आणि बांगलादेशमध्ये जोरदार पाऊस झाला. जुलैच्या पावसाने जर्मनीतील शतकांचे विक्रम मोडले. जागतिक हवामान संघटनेचे सरचिटणीस पेटेरी तालास यांनी हे जगभरातील दृश्य पाहून सांगितले की, जगातील कोणताही देश हवामानबदलाच्या विनाशकारी परिणामांपासून वाचलेला दिसत नाही. याकुत्सकमध्ये घडलेली घटना ही समस्त मानव जातीसाठी वॉर्निंग बेल आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
‘जागतिक हवामानबदल’ ही आजघडीची सर्वात मोठी समस्या मानली जाते. त्यासाठी संयुक्त राष्ट्रासह अन्य जागतिक संघटनादेखील सातत्याने कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे विविध जागतिक आघाड्यांच्या बैठकांमध्ये अन्य मुद्द्यांसोबत हवामानबदल हा मुद्दा नेहमीच चर्चेला असतोच.
भारतामध्ये 1891 पासून चक्रीवादळांची नोंद सुरु झाली. देशाच्या पूर्वेकडील बंगालचा उपसागर हा सुरुवातीपासूनच चक्रीवादळांचा केंद्रबिंदू राहिला आहे. या उपसागरात दरवर्षी सामान्यपणे दोन किंवा तीन चक्रीवादळांची निर्मिती होत असते. या चक्रीवादळांच्या तडाख्याखाली पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू ही राज्य येत असतात. मात्र, आता चक्रीवादळांचा हा केंद्रबिंदू भारताच्या पश्चिम किनार्यावरील अरबी समुद्रामध्ये निर्माण होत आहे.
इंग्लंडमधील ग्लासगो येथे नोव्हेंबर महिन्यामध्ये आयोजित केलेल्या 'कॉन्फरन्स ऑफ पार्टीच'च्या (काॅप26) तयारीसाठी महाराष्ट्राने कंबर कसली आहे. या परिषदेमध्ये वातावरणातील बदलासंदर्भात ऊहापोह होणार आहे. तसेच २०५० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठी 'रेस टू झीरो' ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत महाराष्ट्रातील पाच शहरे सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्रात तापमानात होणारी वाढ आणि हवामानातील बदलामुळे भविष्यात अन्नधान्य उत्पादनावर गंभीर परिणाम होणार असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. प्रामुख्याने २०३३ सालानंतर राज्यातील हवामानात होणाऱ्या बदलांमुळे बहुतांश प्रदेशातील महत्वाचे पिकांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम अपेक्षित आहेत. या संशोधनानुसार २०५० पर्यंत राज्याच्या वार्षिक सरासरी तापमानामध्ये ०.५ ते २.५ अंश सेल्सिअस वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
२०२० मध्ये जगावर कोरोनाचे मोठे संकट घोंघावत होते. जगभरातील नागरिकांना कोरोनामुळे अनेकविध संकटांचा सामना करावा लागला. महामारी ही अचानक येत असते. तशी ती आलीदेखील. मात्र, मानवी जीवनात भविष्यातदेखील काही संकटे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी निर्णय