दिल्ली-एनसीआर आणि उत्तर प्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.6 इतकी मोजली गेली आहे.तीन दिवसांत भूकंपाचे धक्के बसण्याची ही दुसरी वेळ आहे. दि.३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचे केंद्र नेपाळ होते आणि त्याचे हादरे दिल्लीपर्यंत जाणवले.
Read More
बिहारमधील सीमांचलमधील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे बुधवारी पहाटे ५.३० वाजता धक्के जाणवले. सहरसा, मधेपुरा, कटिहार, किशनगंज, पूर्णिया, अररिया येथे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ इतकी मोजण्यात आली आहे. ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी’नुसार भूकंपाचा केंद्रबिंदू राणीगंज आणि बनमनखी दरम्यान होता. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.