नालासोपार्यात जिहाद्यांकडून पाकिस्तानचे समर्थन केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवणार्या हिंदूंना या देशद्रोही गुंडांनी अडवत धमक्या दिल्या. तसेच, पाकिस्तानचा झेंडा निदर्शकांकडून खेचून घेण्यात आला
Read More
नालासोपाऱ्यात जिहाद्यांकडून पाकिस्तानचे समर्थन केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवणाऱ्या हिंदूंना या देशद्रोही गुंडांनी अडवत धमक्या दिल्या. तसेच पाकिस्तानचा झेंडा निदर्शकांकडून खेचून घेण्यात आला.
नालासोपारा मतदार संघातील बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर यांचा पराभव झाला असून भारतीय जनता पक्षाचे राजन नाईक यांचा दणदणीत विजय झाला आहे. निवडणुकीच्या काही दिवसांआधी घडलेल्या नाट्यपूर्ण घटनांमुळे विजय कुणाचा होईल यावर साशंकता निर्माण झाली होती.
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे एका सोसायटीत कट्टरपंथींनी नवरात्रौत्सवाला विरोध दर्शवला आहे. ऑरेंज सोसायटी असे त्या सोसायटीचे नाव असून त्यांनी हिंदू सणाला विरोध दर्शवला आहे. या सोसायटीत हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजाचे नागरिक आहेत. या सोसायटीच्या आवारात मुस्लिम सामाजाच्या लोकांनी अवैध मशीद बांधण्याचे काम केले. याला हिंदूंनी विरोध केला आहे. ते म्हणाले की, अवैध मशीद सोसायटीच्या आवारात चालते मग आमचे सण आणि देवदेवतांच्या पूजेला विरोध का दर्शवता?
लोकप्रिय कार्यक्रम 'द कपिल शर्मा' शो मध्ये काम मिळवून देतो असं खोटं सांगून एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नालासोपाऱ्यात ही घटना घडली असून तुळींज पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे मनोरंजनसृष्टी हादरली आहे. सध्या नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर द कपिल शर्मा शो सुरु असून यात अनेक हिंदीतील कलाकार येत असतात.
देशाच्या संविधानाचा पाया कुणालाही मुळीच बदलता येणार नाही, याबद्दल दुमत नाही आणि बदलाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु विरोधक याचा अपप्रचार करीत आहेत आणि बऱ्यापैकी ते लोकांमध्ये भ्रम निर्माण करीत आहेत. यासाठी आम्ही लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहोत, हा विरोधकांचा विखारी प्रचार सुरू आहे असे वक्तव्य राज्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. रवींद्र चव्हाण यांनी आज मंगळवार १४ मे रोजी दुपारी रिजन्सी बँक्वेट हॉल, नालासोपारा (पूर्व) येथे पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणा
भाजपाच्या प्रवासात ओबीसींसह इतर जाती व आदिवासी समाजाने मोठी साथ दिली. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपती पदापर्यंत पोहचू शकली आहे. काही लोक आदिवासी व ओबीसींना आपसात भिडविण्याचा व संभ्रम निर्माण प्रयत्न करीत आहेत. असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
ठाणे युनिटच्या दहशतवाद विरोधी पथकाने रविवारी पहाटे धानवी, रामनगर नालासोपारा येथील एका चाळीवर छापा टाकला. यामध्ये कारु हुलाश यादव या नक्षलवाद्याला ताब्यात घेतले. अत्यंत महत्वाचा नक्षलवादी असलेल्या कारूवर झारखंड पोलिसांकडून तब्बल १५ लाखांचे इनाम जाहीर करण्यात आले होते
: नालासोपारा येथून शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवणारे तसेच मुंबई पोलीस दलात एकेकाळी ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ अशी ख्याती असलेले मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने गुरुवार, दि. १७ जून रोजी लोणावळ्यातून अटक केली.
राज्यात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असताना आता हृदय पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नालासोपाऱ्यातील एका खासगी रुग्णालयात ऑक्सिजन न मिळाल्याने एकूण १० जणांचा दिवसभरात मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कोरोनावर उपचार घेणाऱ्या या रुग्णांना दिवसभर ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाल्याने आता या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आरोप झाल्याने नव्या वादात सापडलेले शिवसेनेचा माजी नगरसेवक आणि माजी जिल्हा उपाध्यक्ष धनंजय गावडे याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वोच न्यायालयाने १५ दिवसांत पोलिसांसमोर हजर रहावे आणि जामिनासाठी नव्याने अर्ज करावा, असा आदेश दिला आहे, त्यामुळे गावडेला पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे.
'महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड'कडून (महावितरण) कडून नालासोपारामध्ये गिरणी चालवणाऱ्या ८० वर्षीय गणपत नाईक यांना तब्बल ८० कोटी रुपयांचे वीजबिल मिळाले. त्यानंतर अचानक त्यांचा रक्तदाब वाढला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
राज्यातील ज्या काही चुरशीच्या आणि चर्चेतीललढती ज्या मतदारसंघात होणार आहेत, त्यापैकी एक मतदारसंघ म्हणजे नालासोपारा. माजी ‘चकमक’फेम अधिकारी प्रदीप शर्मा यांनी राजकारणात प्रवेश करून थेट नालासोपारा मतदारसंघातून अर्ज भरला आहे. त्यांची लढत ही दिग्गज हितेंद्र ठाकूर यांच्या कुटुंबीयांशी होणार आहे. त्यामुळे या लढतीबाबत चुरस निर्माण झालेली आहे.
नालासोपारा येथील नागरिकांनी बंद पळून व रेलरोको करून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. यामुळे नालासोपारा ते विरार या मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे
नालासोपाऱ्याच्या पश्चिमेला असलेल्या राजोडीच्या समुद्रात डॉल्फिन दिसल्याचे वृत्त आहे.
गणेशोत्सव मंडळाची मिरवणुक नालासोपाऱ्यातील गावदेवी परिसारातून जात असताना टँकरची धडक लागून एका तरुणाचा मृत्यु झाला आहे.
नालासोपारा स्फोटक प्रकरणी एटीएसने जळगावमधील साकळी गावातून दोघांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली.
नालासोपाऱ्यातून आठ देशी बॉम्ब हस्तगत
मुंबई येथे पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे सामान्यांचे जनजीवन विस्खळित झाले आहे. लोकलच्या ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल तर उशीराने धावत आहेतच मात्र मुंबईच्या नालासोपारा आणि विरार यामध्ये वडोदरा एक्सप्रेस अडकल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. ट्रॅकवर पाणी तुडुंब भरल्यामुळे ही गाडी थांबली आहे. यामधील प्रवाशांच्या सुटकेसाठी एनडीआरएफची मदत घेण्यात येत आहे.
प्रबोधन हा जरी उत्तम आणि बिनसंघर्षाचा मार्ग असला तरी भारतात प्रबोधनाला प्रतिसाद देण्याची लोकांची वृत्ती अत्यंत कमी आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून समेळपाडा या ठिकाणी असलेल्या वैकुंठभूमीची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.