धारावीच्या इतिहासात पहिल्यांदाच बहुप्रतिक्षित धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. माटुंगा येथील ४६.१३ एकर रेल्वे जमिनीवर बांधकामाच्या पहिल्या टप्प्यातील कामांना सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण जागेपैकी ६.२४ एकर जागेत रेल्वेसाठी सुविधा निर्माण केल्या जातील. या महत्त्वपूर्ण हालचालीमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांसह सुमारे १५,००० ते २०,००० लोकांना राहण्याची सोय होईल.
Read More
प्रकल्पाला केवळ राजकीय विरोध; धारावीकरांचा प्रकल्पात उस्फुर्त सहभाग कुंभारवाडा आणि १३व्या कंपाऊंडमध्ये काही राजकीय लोकांचा विरोध
नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीआरपी विविध उपक्रमांच्या माध्यमातून धारावीकरांच्या स्वप्नातील धारावीचे चित्र समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून एनएमडीपीएलचा सामाजिक उपक्रम असणाऱ्या धारावी सोशल मिशनने शालेय तरुणींसाठी आणि शिक्षकांसाठी 'स्वप्नातील धारावी' या विषयावर निबंध लेखन स्पर्धा घेतली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दि.८ रोजी संपन्न झाला.
'धारावी बचाव आंदोलना'कडून धारावीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी यावेळी त्यांनी सभेच्या माध्यमातून अनेक मागण्या मांडल्या. मात्र या मागण्या पूर्वग्रहदूषित हेतूंवर आधारलेल्या असून त्यांच्या स्वतःच्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयांशी पूर्णतः विसंगत असल्याचे दिसून येते.
धारावीत साजरा झाला अनोखा प्रजासत्ताक दिन
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी धारावीतील झोपडपट्टी सर्वेक्षणाला वेग मिळत आहे. नागरिक स्वतःहून सर्वे करण्यास येण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे करत आहेत.
धारावीकरांचा संभ्रम दूर करण्यासाठीच नावात बदल : एनएमडीपीएल