( protests in Nepal ) नेपाळमध्ये जनता राजेशाहीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली असून त्यामुळे देशात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read More
पूर्वी जगातील एकमेव हिंदूराष्ट्र असलेले नेपाळ, आता पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या बुलंद आवाजाने दुमदुमून गेले आहे. नेपाळी नागरिक मोठ्या संख्येने राजेशाही आणि हिंदूराष्ट्राच्या पुनर्प्रस्थापनेसाठी ओली सरकारविरोधात एकवटले आहेत. त्यानिमित्ताने नेपाळचा हिंदूराष्ट्र ते सेक्युलर राष्ट्र हा धार्मिक, राजकीय, सामाजिक इतिहास विशद करणारा हा लेख...
( Yogi Adityanath ) नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही प्रस्थापित करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली आहे. विशेष म्हणजे आंदोलनामध्ये समर्थकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही छायाचित्र झळकविले आहे.
देश प्रगतीच्या दिशेने पुढे जात असताना, काही जण मात्र जनतेला जुन्या चौकटीतच अडकवण्याचा कट रचत आहेत. ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ हे भारतीय शिक्षण प्रणालीला आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणारे धोरण आहे. मात्र, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या धोरणाला विरोध करत विद्यार्थ्यांचे भविष्यच अंधारात ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
‘बीआरआय’ प्रकल्पाबाबत चीन आणि नेपाळमध्ये नुकताच एक करार झाला असून, नेपाळने चीनवर विश्वास ठेवण्याचे नको ते धाडस केले आहे. या करारामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक आणि राजनैतिक संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास नेपाळने व्यक्त केला असला, तरी ते कितपत शक्य आहे, याबाबत साशंकताच!
विद्यार्थी हेच राष्ट्राचे खरे आधारस्तंभ असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मिळणारी विद्याच देशाचे भविष्य घडवत असते. भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून, नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्यामाध्यमातून राष्ट्रासाठी समर्पित असणारी पिढी निर्माण करण्याचे कार्य शैक्षणिक संस्थांना पूर्ण करायचे आहे.
पाळ येथील बस अपघातात २७ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झालेत. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेण्यासाठी मंत्री रक्षा खडसे नेपाळमध्ये दाखल झाल्या आ
नेपाळमधील कोसी भागात गोहत्येचे प्रकरण समोर आले आहे. सुनसरी जिल्ह्यात एका मुस्लिम व्यक्तीवर म्हशीच्या मांस सांगून गायीचे मांस विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. फेकू महंमद मियाँ असे आरोपीचे नाव आहे. गोहत्येचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या पत्रकारावरही खुकरीने हल्ला करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून महंमद मियाँला अटक केली आहे. ही घटना रविवार, दि. २६ मे २०२४ घडली.
भारत आणि चीन यांच्यातील स्पर्धेत सोयीनुसार दोघांशी सलगी करून त्याची किंमत वसूल करण्याचे धोरण नेपाळने अवलंबले आहे. कधी भारताची शिडी चढायची आणि चीनच्या सापावरून घसरत खाली यायचे आणि कधी चीनची शिडी चढायची, असे केल्यामुळे सत्तेवर राहण्यात प्रचंड यांना यश मिळाले असले, तरी त्यामुळे नेपाळचे नुकसानच झाले आहे.
देशभरात श्रीरामनवमीनिमित्त विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. काही ठिकाणी या शोभायात्रांवर दगडफेक झाल्याच्या घटना समोर आल्या. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये तर याचे प्रमाण अधिक होते. ममतांची कोणतीही ममता नसलेले पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत राहिले. भारतासोबत शेजारी देश नेपाळमध्येही मोठ्या उत्साहात श्रीरामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, नेपाळमध्ये श्रीरामनवमीच्या दिवशी शोभायात्रेवर दगडफेक झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील ९०चा काळ आपल्या सौंदर्याने गाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्रिती झिंटा (Preity Zinta). डिंपल गर्ल अशी ओळख असणाऱ्या प्रिती झिंटा (Preity Zinta) हिने एक महत्वाचे वक्तव्य केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टी म्हटलं की नेपोटीझम हा विषय फार चर्चेत असतो. याव्यतिरिक्त इंडस्ट्रीशी कोणताही संबंध नसलेले कलाकार जेव्हा अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावू पाहतात त्याबद्दल प्रितीने मोठं विधान करत बॉलिवूड मुलींसाठी सुरक्षित नसल्याचं देखील तिने म्हटले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील ब्युटी विथ ब्रेन असणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन (Vidya Balan). आपल्या अभिनयाचा जोरावर अढळ स्थान निर्माण करणारी विद्या आपल्या परखड मतांनी चाहत्यांची मने जिंकत असते. नुकतंच तिने हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमवर विधान केले आहे. ही इंडस्ट्री कुणाच्या बापाची नाही असे तिने (Vidya Balan) म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातून लव्ह जिहादचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. नेपाळमधील एका मुलीने अब्दुल सलामवर हिंदू असल्याचे भासवून तिच्याशी लग्न केल्याचा आणि नंतर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. तिला जबरदस्तीने मांस खाऊ घातल्याचा आरोपही पीडितेने केला आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या ATS पथकाने दि. ३ एप्रिल रोजी नेपाळ सीमेवरून हिजबुल मुजाहिद्दीनच्या ३ दहशतवाद्यांना अटक केली होती. यातील मोहम्मद अल्ताफ आणि सय्यद गझनफर हे पाकिस्तानचे आहेत तर तिसरा दहशतवादी नासिर अली काश्मीरचा आहे. चौकशीदरम्यान त्याने काश्मीरचे पाकिस्तानमध्ये विलीनीकरण करण्याचा मनसूबा स्पष्टपणे सांगितला. काश्मिरी दहशतवादी नसीरने स्वत:ला कारगिल युद्धानंतर दहशतवादी झाल्याचे सांगितले. त्यांच्याकडून अनेक भारतीय बँकांनी जारी केलेली डेबिट आणि क्रेडिट कार्डेही जप्त करण्यात आली आहेत.
'परत या, राजा देश वाचवा. आमचे प्रिय राजा अमर राहोत, आम्हाला राजेशाही हवी’ असे म्हणत हजारो लोक रस्त्यावर उतरले. त्यांना जगातून जवळजवळ हद्दपार झालेली राजेशाही पुन्हा हवी आहे. देशातील लोकशाही घालवून, पुन्हा राजेशाही आणण्यासाठी, येथील लोक उत्सुक आहेत. इतकेच नव्हे, तर हे लाखो लोक देशाचा राजधर्म हिंदू करा, अशीही मागणी करत आहेत. कुठे घडतंय हे सगळं? तर हे घडतंय आपला शेजारी देश नेपाळमध्ये. तसेही काही वर्षांपूर्वी नेपाळ हे राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्याही घोषित असे एकमेव हिंदू राष्ट्र होते. मात्र, नेपाळ कम्युनिस्
शेकडो बुद्ध भिक्षू गुडघ्यावर बसून शांतपणे सहकार्य मागत होते. मात्र, त्याबदल्यात त्यांच्यावर पाण्याचा मारा, पेपर स्प्रे आणि टेसरचा मारा केला गेला. त्या शेकडो भिक्षूंना तुरुंगात डांबले गेले. शांततापूर्ण मार्गाने मागणी करणारे हे भिक्षू आहेत. चीनच्या अधिपत्याततील गार्जे तिब्बती स्वायत्त प्रांतातील डेगे काउंटी येथील वांगबुडिंग टाऊनशीपमध्ये राहणारे. चीनमध्ये ड्रिचू नदीवर २ हजार, २४० मेगावॅटच्या गंगटुओ जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती होत आहे. हा परिसर यांगत्से नदीच्या वरच्या भागात. मात्र, या प्रकल्पाला तेथील स्थानिक
अयोध्या येथे नुकताच रामललाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला असून अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्षाचे फलित मिळाले आहे. यानिमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण असताना जगभरातही अनेक देशांनी हा दिवस साजरा केला आहे. तेथील मंदिरांची सजावट करुन विविध प्रकारे हा उत्सव साजरा करण्यात येत आहे.
दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील भव्य राम मंदिरात भगवान रामललाचा अभिषेक केला जाणार आहे. त्यापूर्वी सरयूच्या तीरावर ‘राम नाम महायज्ञ’ सुरू होईल. यात सहभागी होण्यासाठी नेपाळमधून २१ हजार पुजारी येत आहेत. आत्मानंद दास महात्यागी उर्फ नेपाळी बाबा यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या यज्ञादरम्यान सरयूच्या तीरावर १००८ नर्मदेश्वर शिवलिंगाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी सरयूच्या काठावर १०० एकरांवर टेंट सिटी उभारण्यात आली आहे. त्यात १००८ तंबू लावण्यात आले आहेत. महायज्ञासाठी यज्ञमंडपही बांधण्यात आला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टी सध्या बायोपिक, सिक्वेल किंवा प्रिक्वेल यावरच तग धरुन आहे. विविध आशय किंवा विषय हाताळण्याचे कसब कुठेतरी हिंदीतील दिग्दर्शक किंवा कलाकारांच्या हातून निसटत चालल्याचे दिसून येत आहेत. याशिवाय हिंदीत नेपोटिझम मोठ्या प्रमाणात होत चालले आहे असेही दिसून येते. आपल्या मुलीला किंवा मुलाला अभिनयाचा किंवा दिग्दर्शनाचा गंध नसला तरीही त्यांना चित्रपटांतून संधी दिल्या जात आहेत. परंतु, मराठीत नेपोटिझमचे चित्र दिसून येते का? असा प्रश्न अभिनेते विजय पाटकर यांना विचारला असता त्यांनी ‘मराठीत नेपोटिझम येऊच शकत
पाच दिवसांचा रशिया दौरा आटपून, भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर दि. ४ ते ५ जानेवारीदरम्यान दोन दिवसांच्या नेपाळ दौर्यावर गेले. या दौर्यात त्यांनी नेपाळसोबतचे द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच परराष्ट्र मंत्री नेपाळमधील चीनच्या प्रभावाला रोखण्यातसुद्धा यशस्वी झाले. नेपाळसोबत भारताचे ’रोटी-बेटी’चे नातं आहे. पण, डाव्यांची सत्ता आल्यापासून, नेपाळमध्ये चीनचा प्रभाव वाढलेला आहे. त्यामुळे सामारिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या, नेपाळमधील चिनी कुरापती बंद करणे, भारतासाठी क्रमप्राप्
व्हिएतनाममधील एका राजाने रामायणाच्या रचनाकारांचे मंदिर उभारले आहे. कंबोडियात इ.स बाराव्या शतकात रामायणाचा अभ्यास सुरु झाला होता. रामायणाची सगळ्यात जुनी प्रत नेपाळमध्ये आहे. मला वाटतं ह्यातील काही गोष्टी आपल्याला माहिती असतील आणि काही नाही. पण अयोध्या , रामायण आणि रामकथा हा भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय. पण रामकथा आणि अयोध्या दोन्ही जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये पोहचल्या आहे. खरतर भारतीय व्यापारी, प्रवासी, तत्त्वज्ञान प्रसारक यांच्यामुळे रामकथा आणि अयोध्या हा विषय जगात दूरवर पोहचला. भारताबाहेर एवढ्या व्यापक
लखनौ : अयोध्येतील राम मंदीराचे २२ जानेवारीला उद्धाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थीतीत रामललांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे, तर पहिल्या मजल्यावर बांधकाम सुरू आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात रामललला ज्या पाण्याने अभिषेक केला जाईल ते पाणी नेपाळच्या पवित्र नद्यांमधून आणण्यात आले आहे.
‘विद्यापीठ अनुदान आयोग’ (युजीसी)ने देशात सुरू असणार्या, ‘एम.फील’ अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आदेश नुकतेच दिल्याने, देशभरातील या संशोधन अभ्यासक्रमाला टाळे लागणार, हे आता स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी असे प्रवेश देणार्या महाविद्यालयांना देखील आयोगाने सुनावले आहे. अर्थात, काही विद्यापीठांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केली असल्याने, प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे काय होणार, हा प्रश्न आहे. त्यानिमित्ताने ‘युजीसी’च्या निर्णयाची कारणमीमांसा करणारा हा लेख...
सध्या न्यू इयर सेलिब्रेशनचा मूड सगळीकडे सुरूयं. आजच माझ्या मित्रानं पण मला एक रिल पाठवली. कारण कुठे फिरायला जायचंयं हे हल्ली रिल्सपाहून मित्रमंडळी ठरवतात. कमी खर्चात नेपाळ फिरायचयं? चला तर मग आमच्या ट्रॅव्हल कंपनीशी त्वरित संपर्क करा. डीएम करा, अशा रिल्सचा सध्या महापूर आलायं. पण समजा त्यांचं ऐकून आपण नेपाळला गेलो आणि तिथेच अडकलो तर? तुम्ही म्हणाल आम्ही नेपाळमध्ये का अडकू? तर आज तुम्हाला मी अशीच नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ५८ पर्यटकांसोबत घडलेला थरारक अनुभव सांगणार आहे. हे प्रवासी सध्या सुखरुप घरी पर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या एका फोनवर नेपाळ मध्ये अडकलेल्या ५८ मुंबईतील नागरीकांना सुखरुप परत आणले आहे. पनवेल तालुक्यातील कामोठे येथील हे नागरीक नेपाळ मध्ये तीर्थयात्रेसाठी गेले असता त्यांना तीथे काही लोकांकडून डांबून ठेवण्यात आले या प्रसंगी त्यांना या संकटातून सोडवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले.
‘चला एकत्र कल्पना करू या’ अर्थातच ही कल्पनाच सुचली चार वर्षांपूर्वी. गरीब गरजू विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, कोणत्याही कारणाने त्यांनी शाळा सोडू नये, यासाठी या कल्पनेनुसार ‘लेटस इमॅजिन टुगेदर फाऊंडेशन’ काम करते. गरजू गरीब विद्यार्थ्यांसाठी सहकार्य करायला हवे, असे वाटणारे अनेक समविचारी लोक संस्थेशी जोडली गेली. संस्थेच्या या संकल्पना कार्याचा मागोवा इथे मांडला आहे.
राममंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी नेपाळ विविध प्रकारची स्मृतीचिन्हे पाठवणार आहे. ज्यामध्ये विविध प्रकारचे दागिने, भांडी, कपडे आणि मिठाई यांचा समावेश आहे. माय रिपब्लिका या नेपाळी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ही स्मृतिचिन्हे जनकपूरधाम ते अयोध्याधाम असा प्रवास करणार आहेत. हा प्रवास जलेश्वर नाथ, मलंगवा, सिमरौनगड, गधीमाई, बीरगंज ते बेतिया, कुशीनगर, सिद्धार्थनगर गोरखपूर मार्गे केला जाणार आहे.
हिंदी मनोरंजनसृष्टीत नेपोटिझम अर्थात घराणेशाहीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जाते असा आरोप केला जातो. यासाठी दिग्दर्शक करण जोहर याचे नाव अग्रगणी असून आजवर त्याने साकारलेल्या चित्रपटांमध्ये त्याने स्टार कलाकारांच्याच मुलांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले. आता याच नेपोटिझमच्या मुद्द्यावर करण जोहर वेब मालिका घेऊन येत आहे. 'शोटाईम' या त्याच्या आगामी वेब मालिकेत अभिनेता इमरान हाश्मी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
केंद्राने ‘निपुण भारत अभियाना’ची अंमलबजावणी करत २०२६-२७ पर्यंत तिसरीच्या वर्गापर्यंत भाषा आणि गणिताच्या क्षमता प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट राखले आहे. राज्यात राज्य सरकारनेही त्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. अभियानाचे ध्येय साक्षरतेच्या पलीकडे जात व्यापक ठेवण्यात आले आहे. ते साध्य करण्याचे मोठे शिवधनुष्य आहे. ती साध्य झाली, तरच भविष्यात शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचा, समाजाचा आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास करणे शक्य आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत गेली काही वर्षं घराणेशाहीची (नेपॉटिझम) परंपरा अगदी पद्धतशीरपणे राबविली जात असल्याची ओरड अधूनमधून होत असते. याला अगदी हातावर मोजण्याइतकेच कलाकार हेच काय ते अपवाद. असेच एक सिनेघराणे म्हणजे कपूर कुटुंब. खरंतर या कुटुंबातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्याच कुटुंबातील एक अभिनेता म्हणजे रणबीर कपूर. २००७ साली ‘सावरिया’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणार्या रणबीरने आजवर सोज्ज्वळ, विनोदी किंवा तुलनेने कमी हाणामारी असलेल्या भूमिका साकारल्या. ‘संजू’ चित्रपट
हिंदी चित्रपटसृष्टीत नेपोटिझम हा विषय कायमच चर्चेत असतो. यावर अनेक कलाकारांनी आपली मते मांडली आहेच. नेपोटिझमच्या या विषयावर आता सध्याची हिंदीतील आघाडीतील अभिनेत्री दीपिका पडूकोण हिने आपले मत व्यक्त केले आहे. एका मुलाखतीत तिला याबद्दल विचारले असता, “नेपोटिझमसारखी गोष्ट कधीच संपणार नाही”, असे वक्तव्य तिने केले आहे.
राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे क्रिती सेनॉनॉ. मनोरंजनसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, आपल्या अभिनयाच्या जोरावर क्रितीने हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी झेंडा रोवला आहे. सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा नेपोटिझमचा मुद्दा वर आला असून यावर आता क्रितीने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. "प्रेक्षक स्टार किड्सपेक्षा टॅलेंटेड कलाकारांना बघणं पसंत करतात”, असे क्रिती म्हणाली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणनंतर आता नेपोटिझमबद्दल क्रितीच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
भारत आणि अफगाणिस्ताननंतर आता नेपाळ सरकारनेही चिनी शॉर्ट व्हिडिओ ॲप 'टिकटॉक' (TikTok) वर बंदी आणली आहे. टिकटॉक अॅप नेपाळमधील सामाजिक ऐक्य आणि सौहार्दाला हानी पोहोचवत असल्याचे नेपाळ सरकारने म्हटले आहे.
दिल्ली-एनसीआर आणि उत्तर प्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.6 इतकी मोजली गेली आहे.तीन दिवसांत भूकंपाचे धक्के बसण्याची ही दुसरी वेळ आहे. दि.३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचे केंद्र नेपाळ होते आणि त्याचे हादरे दिल्लीपर्यंत जाणवले.
’एनसीईआरटी’ अर्थात ‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग’ने आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ असा उल्लेख करण्याचा प्रस्ताव दिला आहे. भावी पिढीला भारताचे नाव समजावे आणि ते जाणून घेता यावे, या भावनेने अशी शिफारस करण्यात आली आहे.
पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ओळखपत्र तयार करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला असून, ‘अपार आयडी’ या नावाने हे ओळखपत्र ओळखले जाईल. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कामगिरीचे संपूर्ण डिजिटल रेकॉर्ड यात संग्रहित केले जाईल. असा हा शैक्षणिक आणि राष्ट्रीय एकात्मतेला चालना देणारा निर्णय सर्वस्वी कौतुकास्पदच!
आपल्या संस्कृतीच्या जगभर पसरलेल्या पाऊलखुणा वाचणे, ही एक आनंदाची पर्वणी! ही संस्कृती बहरली ती तिला लोकांनी आपलीशी केली, शाश्वत (time tested) होती म्हणून. जिथे-जिथे भारतीयांनी प्रवास केला, तिथे-तिथे तिनेही प्रवास केला आणि तेथील लोकांनी ती आत्मसात केली. म्हणूनच तिच्या पाऊलखुणा आजही जगभरात सर्वत्र दिसतात. या पाऊलखुणा विध्वंसक नाहीत, तर जगाच्या सौंदर्यात भर टाकणार्या, रचनात्मक आहेत. त्या जीवनातील सृजनशीलतेला, आयुष्याच्या रसरशीतपणाला वाढवणार्या आणि त्या सर्वेश्वर जगतव्यापी, परमोच्च शक्तीबरोबर सर्वांना एकरूप कर
इस्त्रायलवर पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने हल्ला केल्यानंतर अनेक निष्पाप लोकांचे जीव जात आहेत. दरम्यान, या हल्ल्यात जवळपास १० नेपाळी विद्यार्थी ठार झाले असून अन्य चार जण जखमी झाले आहेत. त्यामुळे इस्त्रायलमधील भारतीय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नेपाली समाज सेवा संस्थात देखील गणरायाचे आगमन झाले आहे. नेपाली समाज सेवा संस्थाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे २६वे वर्ष आहे.
मणक्याचा आजार, बोलण्यातील शारीरिक व्यंग अशा अनंत अडचणींवर मात करीत त्यांनी जगण्यातला आनंद शोधला आणि इतरांनाही दिला. जाणून घेऊया गिर्यारोहक आनंद बनसोडे यांच्याविषयी...
राज्यातील दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती.
‘बीएड’ पात्रताधारक उमेदवार हे प्राथमिक शाळेत शिकवण्यासाठी पात्र ठरत नसल्याचा निकाल देऊन सर्वोच्च न्यायालयाने देशातील प्राथमिक व माध्यमिक स्तरासाठीच्या व्यावसायिक पात्रता भिन्नच राहतील, यावर नुकतेच शिक्कामोर्तब केले आहे. यापूर्वी ‘राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदे’च्यावतीने २०१८ मध्ये प्राथमिक स्तरावर ‘डीएड’ पदविकेसोबत ‘बीएड’ उमेदवार शिक्षक म्हणून निवडले जाऊ शकतात, अशी अधिसूचना जारी केली होती.
तीन वर्षांपूर्वी देशभरात लागू केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यास केरळ आणि प. बंगालनंतर आता कर्नाटक सरकारने नकार दिला आहे. शिक्षणाला राजकीय चष्म्यातून पाहिल्यावर यापेक्षा वेगळे काही अपेक्षित नव्हते. पण, शिक्षण क्षेत्रात दर काही वर्षांनी पूर्ण फेरफार होणे आवश्यक आहे.
कार्यक्षम सीमापार व्यापार सुरळीत व्हावा, यासाठी ‘एलडीबी’ने आता नेपाळ आणि बांगलादेशच्या सीमेपर्यंत आपल्या सेवांचा विस्तार केला आहे आणि एवढेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बंदराच्या पहिल्या टप्प्यापर्यंत भारताच्या ‘एक्झिम कंटेनर’ अर्थात आयात आणि निर्यात करणार्या कंटेनरचा मागोवा घेण्यासाठी सागरी ट्रॅकिंग प्रणालीदेखील वापरली जात आहे.
सीमा हैदरच्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. प्रत्यक्षात दहशतवाद्यांना निधी पुरवण्यासाठी कुख्यात असलेल्या पाकिस्तानच्या हबीब बँकेशी सीमाचे संबध असल्याचे समोर आले आहे. नेपाळमधील हबीब बँकेच्या माध्यमातून सीमाशी संपर्क साधला जात होता. तसेच त्या बँकेच्या माध्यमातून सीमाला मदत ही केली जात असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानची हबीब बँक आणि नेपाळची हिमालयन बँक यांचा परस्पर करार झाला आहे. यामुळे पाकिस्तानी हबीब बँकेने हिमालय बँकेच्या सहकार्याने नेपाळमध्ये आपल्या शाखा उघडल्या. अमेरिकेत हबीब बँकेवर अल कायदासारख्या मो
सीमा हैदर हिने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अर्ज पाठवला आहे. त्या अर्जात भारताचे नागरिकत्व देण्याची विनंती केली आहे. त्याचवेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तिने तुरुंगात आयुष्य घालवणार, पण पाकिस्तानात जाणार नसल्याचे सांगितले आहे. सचिन माझं आयुष्य असल्याचे सांगत.सीमा म्हणाली की, तिचा एकच गुन्हा आहे की ती नेपाळमार्गे भारतात आली. दरम्यान, सचिनसोबतच्या तिच्या लग्नाचे काही फोटोही व्हायरल होत आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईतील विविध भागांत आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभाग घेत नागरिकांना संबोधित केले. दरम्यान, वरळी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी मुंबईच्या स्वच्छतेची काळजी घेणाऱ्या सफाई कामगारांचा सत्कार केला आणि नागरिकांना छत्र्यांचे वाटप केले.
सीमा हैदर आणि सचिन अचानक गायब झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या ३६ तासांपासून सीमा आणि सचिन मीणा गायब आहेत. पब्जी खेळताना सचिनवर प्रेम झाल्यानंतर सीमा पाकिस्तानच्या कराचीतून आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात आली होती, असा दावा तिने केला होता.त्यानंतर तिने सचिन मीनासोबत हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले.यानंतर त्यांचे व्हि़डिओ व्हायरल झाले आहेत. ग्रेटर नोएडा या ठिकाणी ते राहत होते.
महाराष्ट्राचा अभिमान असलेली कोकण रेल्वे आता दोन देशांमध्ये रेल्वे लिंक जोडण्याचे काम करणार आहे. भारत-नेपाळदरम्यान रेल्वे लिंक तयार करण्याची एक मोठी जबाबदारी कोकण रेल्वेवर सोपवण्यात आली होती. भारत-नेपाळमधील दळणवळण यंत्रणा सक्षम करून व्यापार आणि वाणिज्य व्यवहार वाढवण्यासाठी रेल्वे लिंक तयार करण्याची जबाबदारी कोकण रेल्वेला देण्यात आली.
मलेरिया हा जगभरात सर्वाधिक आढळणार्या संक्रामक आजारांपैकी एक आहे आणि बहुतेक विकसनशील देशांच्या सार्वजनिक आरोग्यव्यवस्थांपुढील सर्वांत लक्षणीय आव्हानांपैकी हे एक आव्हान आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’ने (डब्ल्यूएचओ) अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या ‘वर्ल्ड मलेरिया रिपोर्ट’मधील आकडेवारीनुसार, २०२० मधील २४५ दशलक्ष (२४ कोटी, ५० लाख) एवढी असलेली मलेरियाची रुग्णसंख्या, २०२१ मध्ये २४७ दशलक्ष (२४ कोटी, ७० लाख) झाली आहे.