अयोध्येतेच प्रभू श्रीरामांचा जन्म झाला आणि तिथे आता रामलल्लाचे भव्य मंदिर उभारण्यात आलेले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही मंदिर अस्तित्वात असल्याचा उल्लेख आपल्या निर्णयात केला आहे. आता एनसीईआरटीनेही त्यानुसार अभ्यासक्रमात बदलला आहे. बाबरीचे वर्णन आता 'मशीद' ऐवजी 'तीन घुमट असलेला ढाचा' असे करण्यात आले आहे. बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात हा बदल करण्यात आला आहे.
Read More
जगात कुराण शरीफपेक्षा मोठा ग्रंथ नाही. त्यामुळे एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश करावा, असे उत्तर प्रदेशातील संभल येथील समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी म्हटले आहे. शालेय अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारताचा समावेश करण्याला विरोध करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
लवकरच शाळेत विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारताचे धडे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एनसीईआरटीच्या सामाजिक शास्त्र समितीने ही शिफारस केली आहे. तसेच शाळेतील वर्गखोल्यांमध्ये भिंतीवर राज्यघटनेची प्रस्तावना लिहिण्याचीही शिफारस समितीकडून करण्यात आली आहे.
पौराणिक महाकाव्य रामायण-महाभारत शाळांमध्ये शिकविण्यासाठी नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात 'एनसीईआरटी'कडून प्रयत्न सुरू असल्याचे सुतोवाच मिळत आहेत. यासंदर्भात एनसीईआरटीच्या पॅनेलकडून सुचविण्यात येत आहे. एनसीईआरटीच्या मते, रामायण-महाभारत यांसारख्या महाकाव्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा यासाठी हालचाली सुरू आहेत.
रामायण-महाभारत या दोन महान आर्ष महाकाव्यांचा समावेश इतिहासाच्या अभ्यासक्रमात करावा, अशी शिफारस नुकतीच ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या (एनसीईआरटी) समितीने केली. जीवनमूल्ये, नैतिकतेचे महत्त्व देणारे हे ग्रंथ. धर्म आणि कर्म यांचे महत्त्व अधोरेखित करणारी ही महाकाव्ये न्याय तसेच शांततेची शिकवणही देतात. एक आदर्श नागरिक म्हणून विद्यार्थ्यांना घडवण्यात, त्यांची मोलाची भूमिका असेल, म्हणून ही शिफारस महत्त्वाची ठरावी.
’एनसीईआरटी’ अर्थात ‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग’ने आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ असा उल्लेख करण्याचा प्रस्ताव दिला आहे. भावी पिढीला भारताचे नाव समजावे आणि ते जाणून घेता यावे, या भावनेने अशी शिफारस करण्यात आली आहे.
पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ओळखपत्र तयार करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला असून, ‘अपार आयडी’ या नावाने हे ओळखपत्र ओळखले जाईल. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कामगिरीचे संपूर्ण डिजिटल रेकॉर्ड यात संग्रहित केले जाईल. असा हा शैक्षणिक आणि राष्ट्रीय एकात्मतेला चालना देणारा निर्णय सर्वस्वी कौतुकास्पदच!
‘जी 20’ शिखर परिषदेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक नेत्यांसमोर ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असाच आपल्या मातृभूमीचा केलेला उल्लेख सर्वस्वी सुखावणारा होताच. आता पाठ्यपुस्तकांतूनही ‘भारत’ हेच नाव वापरण्यात यावे, अशी शिफारस ‘एनसीईआरटी’च्या समितीने केली आहे. वसाहतवादी मानसिकतेचे हे ओझे आजच्या आणि पुढील पिढीच्या खांद्यावर न देण्यासाठी केलेली ही शिफारस सर्वस्वी कौतुकास्पदच!
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) त्यांच्या पुढील पुस्तकांच्या संचामध्ये 'INDIA' ऐवजी 'भारत' छापणार आहे. पॅनेलचा हा प्रस्ताव सदस्यांनी एकमताने मान्य केला आहे. यासोबतच इतिहासाच्या पुस्तकांमध्ये ‘हिंदू विजया'ला प्राधान्य देण्याची शिफारस समितीने केली आहे.एनसीईआरटीच्या नवीन पुस्तकांच्या नावात बदल केला जाईल, असे पॅनेल सदस्यांपैकी एक सीआय इस्साक यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता आणि आता तो मान्य करण्यात आल्याचे इस्साक यांनी सांगितले.
एनसीईआरटीने शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’चे ‘भारत’ करावे अशी शिफारस केली आहे. मात्र, यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी एनसीईआरटी आपल्या अभ्यासक्रमात बदल करत आहे. त्याअंतर्गत अभ्यासक्रमात अनेक सुधारणाही केल्या जात आहेत. अभ्यासक्रमातील बदलांबाबत १९ सदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली होती. या समितीने पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’ ऐवज ‘भारत’ असा शब्दप्रयोग करण्याची शिफारस केली आहे. समितीमध्ये आयसीएचआरचे अध्यक्ष रघुवेंद्र तंवर, जेएनयूमधील प्राध्
‘चांद्रयान’ मोहिमेची महती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तिकेत देवी-देवतांच्या रथापासून रावणाच्या पुष्पक विमानापर्यंतचा उल्लेख करण्यात आला आहे. वेद आणि विज्ञान यांना एकत्र करण्याचा हा प्रयत्न स्वागतार्ह असाच आहे. भारतीय शिक्षण आणि संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
पुढच्या काळातल्या घरोघरच्या बनूंना असा प्रश्न पडू नये आणि त्यांच्या भावांना त्याचं उत्तर देत बसावं लागू नये म्हणून ‘नॅशनल काऊंसिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग’ उर्फ ’एनसीईआरटी’ने राष्ट्रीय युद्धस्मारक म्हणजे काय नि ते कसं, कुठे, केव्हा उभारलं गेलं, या सगळ्या गोष्टींचा समावेश इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमातच करून टाकला आहे.
‘विज्ञान भारती’ हे एक अखिल भारतीय संघटन एक स्वदेशी विज्ञान आंदोलन आहे. आपल्या देशातील प्राचीन ते अर्वाचीन विज्ञानाबद्दल जागृती निर्माण करून आपल्या देशाच्या उन्नतीसाठी वैज्ञानिकांना एकत्र आणून नवनवीन क्षेत्रात काम उभे करणे या उद्देशाने हे आंदोलन गेली ३१ वर्षे चालू आहे. विज्ञान भारतीच्या ‘विद्यार्थी विज्ञान मंथन’ या उपक्रमाचा या लेखात मागोवा घेण्यात आला आहे.
असे म्हणतात की, शत्रूबद्दलचे अज्ञान किंवा अर्धवट ज्ञान नेहमीच घातक असते; म्हणूनच आपण महाराष्ट्रभूमीचाच नव्हे, तर आमच्या मातृभूमीचा शत्रू असणार्या औरंगजेबाचा खरा चेहरा ओळखण्याची गरज आहे. सध्या महाराष्ट्रात मराठ्यांचा इतिहास बिघडवण्याचे मोठे षड्यंत्र सुरू आहे. वेगवेगळ्या गोंडस नावाखाली औरंगजेबाचा उदो उदो करण्याचा डाव मांडला जात आहे. त्यानिमित्ताने क्रूरकर्मा औरंगजेबाचा खुन्शी चेहरा आणि औरंग्याचे समर्थन करुन बुद्धिभ्रम निर्माण करणार्या नेतेमंडळींचाही बुरखा फाडण्यासाठीचा हा लेखप्रपंच...
एनसीईआरटी अभ्यासक्रमास लक्ष्य करून त्याद्वारे नव्या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या कामात अडथळे आणले जात आहेत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याविषयी अपमानजनक टिप्पणी केल्यामुळे नॅशनल हेराल्डच्या संपादिका चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य लूटमार करणारे होते आणि ते महिलांचा बलात्कार करायचे अशी टिप्पणी सुजाता आनंदन यांनी ट्विटरवरून केली होती. त्यांच्या या ट्विटची दखल घेत भाजप आमदार नितेश राणे यांनी या विरोधात पोलीस एफआयआर दाखल करण्याची विनंती केली आहे. यावरून सांताक्रुज पोलिसांनी राणेंच्या तक्रारीची दखल घेत सुजाता आनंदन आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक