नागपुर सभेत बोलत असताना ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका त्यांची जीभ घसरली. 'कलंक' शब्दाचा वापर केला. उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भाजप नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. ठाकरेंच्या सभेनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नितेश राणे, आमदार राम कदम आणि इतर नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत उद्धव ठाकरेंना लक्ष केले आहे.
Read More
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आ. नितेश राणेंचा आरोप ; कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा
शिवसेनेच्या भ्रष्टाचाराला साजेल, अशी पूरक पद्धती अवलंबू नका, असे खरमरीत पत्र आमदार नीतेश राणे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना लिहीले आहे. मुंबई महापालिकेतील एकूण १२३ प्रलंबित प्रस्तावांबद्दल अवैधता आढळत असेल तर संपूर्णपणे प्रक्रीया रद्द करावी, अशी मागणी राणे यांनी पत्राद्वारे केली आहे.
मुंबई महापालिकेच्या कारभारावर आ. नितेश राणेंचे आरोप
भाजप आमदार नितेश राणे यांना ९ फेब्रुवारी रोजी जामीन मंजूर झाला. त्यानंतर त्यांना कोल्हापुरच्या राजर्षी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. गुरुवार, दि. १० फेब्रुवारी रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी बोलताना, 'मला अटक झालीच नव्हती', असं म्हणत राजकारणात खळबळउडवून दिली आहे.
आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्ल्याप्रकरणात न्यायालयिन कोठडी सुनवण्यात आली होती. यासंदर्बात सिंधुदुर्ग उच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. बुधवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी त्यांना अखेर जामीन मंजूर झाला. त्यांचे बंधू निलेश राणे यांनी 'सत्य परेशान हो सकता है, पराजित नही' असे म्हणत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे बुधवार, दि. २ फेब्रुवारी रोजी न्यायालयाला शरण गेले. नितेश राणे हे स्वतःहून शरण आल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.
संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे बुधवार, दि. २ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयास शरण गेले होते. यामुळे न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीही सुनावली होती. मात्र सुरुवातीला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतरही त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला. दोन्ही बाजूने युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने नितेश राणेंना दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली असल्याचे वकील संग्राम देसाई यांनी सांगितले.