म्युच्युअल फंडमध्ये आज बरेच ‘सेक्टोरल’ आणि ‘थिमॅटिक फंड’ही गुंतवणूकदारांसाठी ( Investors ) उपलब्ध आहेत. तेव्हा, या दोन्ही म्युच्युअल फंडचे स्वरुप, विविध प्रकार यांसंबंधी मार्गदर्शन करणारा हा लेख...
Read More
Mutual Funds भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाची व्यवस्थापनाखालील निव्वळ मालमत्ता ऑगस्टमध्ये प्रथमच ६५ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेल्याचे ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया’च्याआकडेवारीवरून नुकतेच स्पष्ट झाले आहे. असा हा उद्योग देशात केवळ सामान्यांना बचतीची सवय लावणाराच नाही, तर राष्ट्रविकासालाही चालना देणारा ठरला आहे.
‘जीडीपी’च्या टक्केवारीत भारतातील देशांतर्गत बचत २०१२-१३ साली जी ३३.९ टक्के होती, ती २०२१-२२ साली ३०.२ टक्क्यांवर आली व दहा वर्षांच्या सरासरीचा विचार करता, ती ३९.३ टक्के होती. २०००-२००१ च्या कालावधीत भारतातील देशांतर्गत बचत २३.४ टक्के होती. नंतरच्या काळात ती वाढली. २००७-२००८ मध्ये ती ३६.९ टक्क्यांवर पोहोचली. परंतु, पुढील काळात जागतिक मंदीमुळे यात तीन टक्के घट झाली. त्यानिमित्ताने बचतीचे अर्थशास्त्र समजून घेणे महत्त्वाचे ठरावे.
मागील काही वर्षांत भारतीय गुंतवणूकदारांचा कल हा म्युच्युअल फंडाकडे वाढलेला दिसतो. विविध अॅप्सच्या माध्यमातून अशाप्रकारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे तर अगदी सहजसोपे झाले आहे. म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करताना बरेचदा परदेशातील विविध फंडांमध्येही गुंतवणुकीचे अनेक आकर्षक पर्याय ऐकीवात येतात किंवा त्यांच्या जाहिरातीही पाहायला मिळतात. पण, खरंच अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय फंडांमध्ये गुंतवणूक कशी करावी? त्याचे नियम-अटी नेमक्या काय असतात? अशी गुंतवणूक कितपत सुरक्षित असते? यांसारख्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करणार
आर्थिक साक्षरता वाढीबरोबरच भारतीय आता निवृत्ती नंतरचे आयुष्य आर्थिक दृष्ट्या सुखकर जाण्यासाठी आर्थिक नियोजन करु लागले आहेत. अशी माहिती पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंड रिटायरमेंट रेडिनेस सर्व्हे २०२३ मधून समोर आली आहे. या सर्व्हेनुसार निवृत्ती नियोजन करण्याकडे भारतीयांचा कल वाढत आहे. २०२३ मध्ये ६७ टक्के भारतीय सेवानिवृत्ती नियोजनासाठी मानसिकरित्या तयार असल्याची आकडेवारी या सर्व्हेतून समोर आली आहे. २०२० मध्ये फक्त ४९ टक्के भारतीय सेवानिवृत्तीनंतरचे नियोजन करण्याविषयी विचार करत होते.
अजित मेनन, ‘सीईओ’, ‘पीजीआयएम इंडिया’, ‘म्युच्युअल फंड’ यांनी फंड हाऊसला मालमत्तेत विक्रमी वाढ होण्यास मदत करणार्या घटकांबद्दल आणि त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल खालील मुलाखतीतून दिलेली मार्गदर्शनपर माहिती...
आजही आपल्या देशात सोन्याचे दागिने खरेदी करणे, ही परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे. भारतीय समाजात आजही सोन्याकडे स्त्रीधन आणि गुंतवणुकीचे एक प्रमुख साधन म्हणून बघितले जात आले आहे. अडचणीच्या काळात सोने हे उपयुक्त ‘असेट’ म्हणून उपयोगी ठरते. मधल्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय समोर आले आहे. जसे की, शेअर्स, म्युच्युअल फंड इत्यादी. पण, कोरोना काळात सोने सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून अधोरेखितझाला, हे पण आपण पाहिले.
इन्सानियत असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन दत्ताजी मेघे यांच्या संकल्पनेतून साकारलेले आर्थिक साक्षरता शिबीर मंगळवार दि. १५ मार्च रोजी वरळीतील जांबोरी मैदान येथीलअंबामाता सभागृहात पार पडले
अगदी बरोबर वाचलत शेअर बाजाराची भीती असणे आवश्यकच आहे.कित्येक लोक आपण बघतो की आपल्या अनलिसिस वरती किंवा आपल्या स्ट्रॅटेजीवर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवतात एखादी रणनिती समजा दोन चार महिने काय जरा व्यवस्थित चालली की लेगच ते स्वतःला देवच समजू लागतात आणि वाट्टेल ती आवश्वसने देऊ लागतात काही लोक कोर्सेस चालू करतात तर काही लोक पोर्टफोलिओ मॅनेज करायला सुरुवात करतात.
हलगर्जीपणे गुंतवणूक करणे हा सर्वात मोठा धोका व जोखीम मानली जाते. मुद्दल व व्याज हे दोन्ही गमावण्याची भीती यात असते. अनेक कंपन्या, खासगी वित्तीय संस्था या कमी दिवसांत जादा व्याज दराची प्रलोभने दाखवितात. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना जाहीर करतात. याला गुंतवणूकदार भरीस पडतो. परिणामी त्याचे पैसे अडकतात, बुडतात. मार्केटचा व्याजाचा जो ‘ट्रेण्ड’ आहे, त्यातून जर अधिक व्याज देणारी योजना असेल, तर त्यात धोका आहे. हे समजून अशा योजनांमध्ये गुंतवणूक करू नये. अशा योजनांमध्ये बुडालेले पैसे मिळण्यासाठी न्य
लॉकडाऊन संपल्यावर व्याज दरात मोठी कपात अपेक्षित आहे. परंतु रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर श्री.शक्तिकांत दास यांनी रोकड सुलभता राहावी म्हणून परवा अजून २५ बेसिसने रेपो दरात कपात घोषित केली. त्यामुळे सध्याच्या व्याजदरांत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल. बँका आणि एनबीएफसी यांनी अलीकडेच रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीस प्रतिसाद देत ठेवींच्या दरांत कपात केली. वर्ष अखेरीमुळे रोखून धरलेली ठेवींच्या दरांत कपातही होऊ शकेल. मुदत ठेवीचे पर्याय शोधत असलेल्या गुंतवणूकदार आणि ज्येष्ठांनी लॉकडाऊन संपण्यापूर्वी आपली बचत विद्यम
गृहकर्ज घेतल्यानंतर पहिला तणाव म्हणजे, आपल्याला काही झाल्यास कर्जाचे हप्ते कसे फेडले जातील, गृहनिर्माण कर्ज कंपनी घराचा ताबा घेऊन आपल्या कुटुंबावर आपत्ती ओढवेल का ही भीती निर्माण होते. भीती घालवण्याकरिता ताबडतोब गृहकर्जरकमेच्या साधारण दुपटीपेक्षा जास्त रकमेचा मुदतीचा विमा घ्यावा.
मानसशास्त्रात FOBO(Fear Of Better Option) नावाची एक संकल्पना आहे. याचा अर्थ मला अजून काही चांगला पर्याय मिळेल का? या शोधात सर्वजण असतात. प्रत्येकाच्या बाबतीत लागू पडेल असं उदाहरण म्हणजे मोबाईल फोन, साऊंड, कॅमेरा, टच, वजन, बॅटरी बॅकअप अशा कितीतरी गोष्टींची तुलना नवीन फोन घेण्यापूर्वी करून पाहत असतो. शेवटी ब्रँड आणि किंमत याच्यापाशी घेणारा अडखळतो आणि निर्णय लांबणीवर पडतो. अशीच गत कपडे, लग्नाचा जोडीदार, मुलांची शाळा, जेवणासाठी हॉटेल आणि आर्थिक आघाडीवर देखील घडत असते.
भारतात वस्तूंची कमी झालेली मागणी आणि त्याच वेळी शेअर बाजाराची आगेकूच हे परस्परविरोधी वाटत असले, तरी त्याचा आणि नव्या आर्थिक बदलांचा जवळचा संबंध आहे. काही मोठ्या कंपन्या याच काळात अतिशय चांगला महसूल मिळवित आहेत, तर छोट्या कंपन्या अडचणीत आहेत. या परिस्थितीत एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे?
श्रीगणेशाची स्थापना करण्याची एक विधिवत पद्धती आपल्याकडे परंपरेनुसार चालत आली आहे. त्यासाठीची संहिता प्रत्येक घरात पाळण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या घरात अनुभवी ज्येष्ठ असतील तिथे त्रुटी राहत नाही. परंतु नवतर मंडळी असतील तर बहुतेकदा सोपस्कार पार पाडले जातात. असंच काहीसं म्युच्युअल फंड व त्यातील विविध पर्यायांची कार्यपद्धती माहित न करून घेता जाहिरात बघून कमिशन वाचणार म्हणून डायरेक्ट गुंतवणूकदार बनतात. मग पदरी मोदकाचा प्रसाद येण्याऐवजी खिरापत सांभाळण्याची वेळ येते.
मागच्या पंधरवाडयात आर्थिक तसेच राजकीय पटलावर अनेक घडामोडी झाल्या. सिसीडीचे प्रवर्तक सिद्धार्थ यांचा गूढपणे झालेला मृत्यू. त्याबद्दल समाज माध्यमांवरून आलेल्या सरकारी धोरणांवर सूचना वजा टीका पासून आयुष्यात मित्र किती महत्वाचे असतात इथपर्यंत.
गेल्या आठवड्यात बाजाराने अजिबात उसंत न घेता रोजच आपटी खाल्ली. आपल्याकडे श्रावण 'पाळण्या'ची संस्कारी शिकवण आहे. बाजार श्रावणात निर्देशांकांची हिरवळ दाखवेल की श्रावणसरी बाजाराची स्वच्छता करतील येत्या काळात हे अनुभवायला मिळेलच.
१ एप्रिल, २०१९ पासून २०१९-२०२० हे आर्थिक वर्ष सुरू झाले. वर्षाच्या सुरुवातीलाच गुंतवणुकीचे नियोजन करणे नेहमी चांगले असते. वर्षाच्या सुरुवातीलाच ‘इक्विटी लिन्कड सेव्हिंगज स्कीम’ (ईएलएसएस) म्हणजेच ‘इक्विटी संलग्न बचत योजनां’त गुंतवणूक करणे चांगले. ‘इक्विटी’ म्हणजे कंपनीचे शेअर भागभांडवल यांच्याशी ही गुंतवणूक योजना संलग्न आहे. ही गुंतवणूक म्युच्युअल फंड प्रकारात मोडते. प्राप्तीकर वाचविण्यासाठी यामध्ये तरतूद आहे.
भांडवली बाजारात मोठे उतारचढाव असतानाही गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूकीवर विश्वास दाखवत ३ लाख कोटींची गुंतवणूक केली आहे.
आज गुंतवणुकीचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत, पण त्यामधील नेमकं कशात गुंतवणूक करायची या बाबत संभ्रम असतोच. त्यातही 'म्युचुअल फंड' हा विषय अजूनही सामान्यांच्या थोडा आवाक्याबाहेरचं असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळेच या लेखातून म्युचुअल फंड अगदी सोप्या शब्दात मांडण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे....