सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी मंदिर प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या विरोधात अंजुमन इंतेजामिया मशीद समितीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे.ज्ञानवापी संकुलातील मंदिराच्या नूतनीकरणाची मागणी करणाऱ्या 1991 च्या एका प्रकरणाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
Read More
ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षाला अलाहाबाद उच्च न्यायालयातून कोणताही दिलासा मिळाला नाही. ज्ञानवापी परिसरातील व्यास तळघरातील पूजेला स्थगिती देण्यात यावी, अशी याचिका मुस्लिम पक्षांकडून करण्यात आली होती. न्यायालयाने या याचिकेवर त्वरीत सुनावणी करण्यास नकार दिला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालय ६ फेब्रुवारीला या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.
ज्ञानवापी परिसराच्या मालकी हक्कावरुन अलाहाबाद उच्च न्यायालयाने दि. १९ डिसेंबर, मंगळवारी आपल्या आदेशातून मुस्लिम पक्षाला मोठा धक्का दिला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने १९९१ च्या खटल्याच्या सुनावणीस मान्यता दिली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षकारांची याचिका फेटाळून लावली. मुस्लिम पक्षकारांने बाजूच्या वतीने ज्ञानवापी प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयाऐवजी अन्य उच्च न्यायालयाकडे सोपवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मुस्लिम पक्षकारांची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
सुन्नी वक्फ बोर्डाला न्यायालयाचा झटका
एएसआय अहवालावर सुनावणी नाही
अयोध्येतील रामजन्मभूमी वादाप्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात ३०वी सुनावणी पार पडली. यावेळी मुस्लीम पक्षाच्या वतीने वकील राजीव धवन यांनी युक्तिवाद पूर्ण केला.