प्रत्येक स्वराला वर्ण का असतो? याचेही एक शास्त्र आहे. काचेच्या भिंगातून सूर्यकिरणे धाडल्यास पीशंग वर्ण आतल्या बाजूला तर जांभळा वर्ण पट्टीच्या बाह्यांगाकडे धाव घेतो. दीर्घ कंपन लहरींचे स्वर बाह्यांगाकडे तर लघुकंपनलहरीचे स्वर अंतरंगाकडे वळतात. पीशंग वर्णाचा स्वर षड्जाला लागून तर नीलवर्णी धैवत षड्जाचे दूर आहे. व्यक्तातून अव्यक्ताकडे धाव घेणारा निषाद भगवान श्रीकृष्णाच्या जांभळ्या वर्णासारखा श्यामल वर्णाचा आहे. शुभ्रातून भासमान होणार्या षड्जाची गती श्यामवर्णाच्या निषादात होते. निषादानंतर पुन्हा षड्ज जन्म घेतो.
Read More
नुकताच स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचा जन्मदिन संपन्न झाला. ज्येष्ठ गायिका म्हणून त्यांनी संगीतक्षेत्रात अढळ स्थान प्राप्त केले आहे. त्यांच्या संगीतक्षेत्रातील योगदान शब्दातीत. त्यांच्या संगीतसाधनेला माझे नमन!