'सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(सेबी)' मध्ये नवीन भरती केली जाणार आहे. सेबीकडून या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. देशभरात डि-मॅट अकाउंटमध्ये वाढ झाल्यानंतर सेबीकडून नवनवीन निर्णय नव गुंतवणूकदारांसाठी घेण्यात आले आहेत. त्यानंतर आता याच सेबीमध्ये काम करण्याची चांगली संधी तरुणांना मिळणार आहे. सेबीकडून रिक्त जागांकरिता अधिसूचना जारी करण्यात आली असून या अंतर्गत एकूण ९७ रिक्त जागांकरिता भरती केली जाणार आहे.
Read More
तेराव्या इंटरनॅशनल कन्व्हेशन ऑफ असोसिएशन ऑफ नॅशनल एक्सचेंज मेंबर ऑफ इंडियामध्ये सेबीचे अधिकारी कमलेश चंद्र वर्शनी यांनी बोलताना सेबीकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू करण्यात आल्याचा दुजोरा प्रसारमाध्यमांना दिला आहे. याप्रसंगी बोलताना आर्थिक गैरव्यवहार,घोटाळे,आर्थिक अनियमितता आढळल्यास यावर सेबी ए आय माध्यमातून माहिती मिळवणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. एआयचा वाढता वापर व उपयुक्तता लक्षात घेता आर्थिक व्यवस्थापनात ए आयचा शिरकाव याबद्दलची नांदी आहे.
आठ अब्ज ते चार ट्रिलियन डॉलर बाजार भांडवल असा भारतीय शेअर बाजाराने गाठलेला विक्रमी पल्ला केवळ अचंबित करणाराच! त्याचबरोबर देशातील डिमॅट खात्यांची वाढती संख्याही भारतीय अर्थव्यवस्थेचे आश्वासक चित्र दर्शविणारी. तेव्हा, एकूणच वाढती डिमॅट खाती आणि वधारणारी शेअर बाजारातील गुंतवणूक, हे भारतीयांच्या पैशाचे अनौपचारिक अर्थव्यवस्थेकडून (इन्फॉर्मल) औपचारिक (फॉर्मल इकोनॉमी) अर्थव्यवस्थेकडील स्थित्यंतराचे द्योतकच म्हणावे लागेल.
एशिया सिक्युरिटीज फोरम कॉन्व्हेनची २८ वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आज मुंबईत पार पडली आहे. यावर्षी या कार्यक्रमाचे यजमानपद बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ब्रोकर्स फोरम ( BBF) यांना मिळाले होते. हा कार्यक्रम २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत पार पडणार आहे. आशिया सिक्युरिटी फोरम ( ASF) या संस्थेच्या अनुषंगाने आर्थिक जगतातील विविध प्रश्न मांडून यावर तोडगा काढण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुख्यतः शेअर मार्केट, सिक्युरिटीज, कॅपिटल , बाँड मार्केटशी संबंधित विविध विषयांवर आर्थिक तज्ज्ञ मंडळी आपापसात चर्चा करतात. या
दसरा मुहूर्तावर क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये नवचैतन्य दिसले आहे. त्यातच बिटकॉइन चलनात में २०२२ नंतर प्रथमच ३५००० डॉलर हून अधिक चलनाची ट्रेडिंग पार पडली आहे. १८ महिन्यातील आकड्यांचे हे सर्वात जास्त भावाची नोंदणी बिटकॉइनने केली आहे. मार्केटमध्ये अमेरिका बिटकॉइन ला व्यापार चलनाचा दर्जा देऊ शकते अशी वावटळ बाजारात उठली आहे. तसे झाल्यास या दरात अजून देखील तेजी येऊ शकते.
क्विक हील या सायबरसिक्युरिटी सोल्यूशन्समधील जागतिक अग्रणी कंपनीने ग्राहक डिजिटल सुरक्षिततेमध्ये नवीन बेंचमार्क स्थापित करत व्हर्जन २४ (v24) लाँच केले आहे. हे प्रगत सिक्युरिटी सोल्यूशन सायबरसिक्युरिटीमधील गुंतागूंतींना सुलभ करते. यामध्ये पहिल्यांदाच ऑन-द-गो क्लाऊड-आधारित सुरक्षितता व्यासपीठ मेटाप्रोटेक्टसह सिक्युरिटी अॅण्ड प्रायव्हसी स्कोअर्स व यूट्यूब कन्टेन्ट कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे सुलभता व सुरक्षिततेचा शोध घेत असलेल्या वापरकर्त्यांसाठी हे अल्टिमेट सोल्यूशन आहे.
‘क्रिप्टो’साठी सर्वांत मोठा ग्राहक आधार असलेलीअमेरिका सध्या ‘क्रिप्टो ऑपरेशन्सवर सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज कमिशन’ (एसईसी)च्या अथक कारवाईमुळे अनिश्चिततेशी झुंजत आहे. यामुळे नियामक घडामोडी, स्वीकारण्याचे वातावरण आणि व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेसाठी रोखीत रूपांतर करण्याची सुलभता प्रदान करण्यात वित्तीय संस्थांकडून मिळालेल्या मदतीच्या प्रगतीत लक्षणीयरित्या अडथळा निर्माण झाला आहे. तथापि, फिट कायद्याच्या रूपात क्षितिजावर एक आशेचा किरण आहे. ज्याचा उद्देश अमेरिकेला ज्यांनी ‘क्रिप्टो’नियमांची अंमलबजावणी केली आहे, अ
बदलती व्यावसायिक स्थिती, विभिन्न प्रकारची आव्हाने यावर मात करून स्थायी व दूरगामी स्वरुपात यशस्वी होण्यासाठी ’ईएसजी’ हा एक सार्थ व समर्थ पर्याय ठरू शकतो. यावर अधिकांश प्रतिसाद देणार्यांचे एकमत झाले आहे. कुठलाही नवा व्यवस्थापन पर्याय हा खर्चिक असतोच. मात्र, या वाढीव खर्चावर प्रगत तंत्रज्ञान, सुधारित कार्यपद्धती, गुणात्मक दर्जावृद्धी व व्यावसायिक कार्यक्षमता यांद्वारे मात केली जाऊ शकते.
आर्थिक अनियमितता झाल्याचा अनिल गलगलींचा आरोप
'डॉरमन्ट' म्हणजेच वापरात नसलेली बँक खाती. तेव्हा, अशाप्रकारे आपले खाते डॉरमन्ट होऊ नये म्हणून नेमकी काय काळजी घ्यावी? ते 'डॉरमन्ट' झाल्यास बँकेकडून आपल्या खात्यातील रक्कम कशाप्रकारे परत मिळविता येते, यासंबंधी मार्गदर्शन करणारा आजचा लेख...
गुंतवणुकीच्या बर्याचशा उपलब्ध पर्यायांपैकी फार मर्यादित पर्यायांची आपल्याला माहिती असते. त्यातही आपण गुंतवणूक सल्लागारांवर अवलंबून असतोच. अशावेळी पारंपरिक गुंतवणुकीच्या पर्यायांबरोबरच कंपन्यांच्या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करावी किंवा नाही, याबाबत अर्थवर्तुळातही मतमतांतरे दिसतात. तेव्हा, नेमके कंपनीचे कर्जरोखे म्हणजे काय? त्यामध्ये कशी आणि किती गुंतवणूक करावी? यांसारख्या विविध प्रश्नांची उकल करणारा हा लेख...
कंपन्या भागभांडवल शेअरच्या रूपाने जसे विक्रीस काढतात, तसेच कंपन्या, वित्तीय संस्था किंवा अन्य आस्थापने त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी जनतेसाठी कर्जरोखे सार्वजनिक विक्रीस काढतात. कर्जरोख्याचे विक्रीमूल्य निश्चित असते. गुंतवणुकीचा कालावधी निश्चित असतो. या गुंतवणुकीवर देण्यात येणारे व्याजाचे दर निश्चित असतात. गुंतविलेल्या रकमेवर वेळोवेळी व्याज दिले जाते, त्यांना ‘परिवर्तनीय कर्जरोखे’ म्हटले जाते व ज्या कर्जरोख्यांची गुंतविलेली पूर्ण रक्कम गुंतवणूकदारांना मूदतपूर्तीच्या वेळी परत केली जाते, अशा कर्जरोख्यांन