‘डीप क्लीन ड्राईव्ह’ अभियानांतर्गत मुंबईतील लहानसहान रस्ते, गल्लीबोळांची स्वच्छता केल्यानंतर शासकीय, महानगरपालिका व खासगी रूग्णालये, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग, मैदाने, शाळा आदींच्या स्वच्छतेसाठी पालिकेकडून विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. त्यानंतर आता पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून मुंबईतील धार्मिक स्थळांची स्वच्छता केली जाणार आहे.
Read More
मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीसमोर असलेल्या महानगरपालिका क्रीडाभवन जागेचा पुनर्विकास करून याठिकाणी विविध वैशिष्ट्यांनी नटलेली ’टाऊनहॉल जिमखाना’ वास्तू उभारण्यात येणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
वृक्षांची खिळे ठोकून हानी करणा-यांवर तसेच वृक्षांवर विद्युत रोषणाई करून त्यांना इजा पोहचविणा-या व्यक्ती – संस्था यांना अशा प्रकारचे पर्यावरण विरोधी कृत्य न करण्याबाबत नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने वारंवार जाहीर आवाहन करण्यात येत असते व रोजीही आवाहन करण्यात आले होते
मुंबई महानगरपालिका आणि केंद्र सरकार पुरस्कृत दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत स्थापन 'नारी शहर समूह-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान' आणि 'टीव्हीएस' यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील ५० महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रवासी रिक्षा वाटप करण्यात आल्या. आमदार मंगेश कुडाळकर, दिव्याज फाऊंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ.प्राची जांभेकर आदींसह महिला बचत गटाच्या सदस्यांच्या उपस्थितीत या रिक्षांचे वाटप करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेकडून यासाठी महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रश
Mumbai passenger rickshaw तील बचत गटाच्या महिला आता प्रवासी रिक्षा चालविणार आहेत. मुंबई पालिका, ‘नारी शहर समूह-राष्ट्रीय नागरी उपजीविका’ अभियान आणि टीव्हीएस यांच्या संयुक्त विद्यमाने ५० महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रवासी रिक्षा वाटप करण्यात आल्या. मुंबई पालिकेकडून यासाठी महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण आणि सर्व प्रकारचे परवाने मोफत देण्यात आले आहेत.
(Matoshree Ramabai Ambedkar Maternity Hospital) मुंबईतील चेंबूर पूर्व येथे असणाऱ्या मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसुतीगृहाची तज्ञांच्या समितीमार्फत पाहणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, एक वर्ष उलटूनही अद्याप कोणतीही पाहणी झालेली नाही. यासंदर्भात माजी नगरसेविका आणि सुधारणा समितीच्या सदस्या आशा मराठे यांनी आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पत्र लिहून तातडीने पाहणी करुन अहवाल उच्च न्यायालयाला सादर करण्याची विनंती केली आहे.
दक्षिण मुंबईत निसर्गाच्या सान्निध्यात भ्रमंती करण्याचा पर्याय एलिव्हेटेड नेचर ट्रेलच्या माध्यमातून मुंबईकरांसह पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. दक्षिण मुंबईत कमला नेहरू उद्यान आणि फिरोजशाहा मेहता उद्यान येथे वृक्षराजीच्या सान्निध्यात रपेट (ट्री वॉक) करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. मुंबईतील पहिल्याच अशा या उन्नत मार्गाच्या माध्यमातून स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) लगतच्या समुद्राचे सौंदर्यही पाहता येणार आहे.
अतिरिक्त मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडून पाहणी
मुंबई महानगरपालिकेने बांधलेल्या धर्मवीर,स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड (दक्षिण) प्रकल्पाला हाजी अली येथील पुलावर मास्टिकचे अतिरिक्त आवरण केल्याची दृश्ये आणि छायाचित्रे सोशलमिडीयावर प्रसारित झाली. त्यावरुन प्रकल्पाच्या बांधकामात दोष असल्याचे आरोपही झाले. मात्र, या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. हा प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित असून, या रस्त्यावर कोणतेही तडे अथवा खड्डे नाहीत.
मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला असून आयुक्त भूषण गगराणी यांनी पत्रकार परिषद घेत या अर्थसंकल्पाबाबत विस्तृत माहिती दिली.
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) नरिमन पॉंईंटकडून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधत लोकार्पण करण्यात आले. राज्याचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर दि.२७ जानेवारीपासून सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा मार्ग मुंबईकरांसाठी खुला झाला.
ठाणे : मुंबई महापालिकेच्या कोट्यातून ठाणे महापालिकेला अतिरिक्त ५० एमएलडी पाणी मिळावे यासाठी आमदार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांनी आज दोन्ही महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची मुंबईत संयुक्त बैठक घेतली. यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकाऱ्यांना तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
मुंबई : पोपटाचा जीव पिंजर्यात असतो, तसा उद्धव ठाकरेंचा ( Uddhav Thackeray ) मुंबई महापालिकेत. त्यामुळे पालिकेची सत्ता हातून जाऊ नये, यासाठी त्यांनी ना-ना तर्हेचे प्रयत्न सुरू केले आहेत. हिंदू धर्माशी प्रतारणा केल्यापासून देवा-धर्माला घातलेले साकडे पूर्ण होत नसल्यामुळेच की, काय त्यांनी आता ‘अजमेर शरीफ’कडे मन्नत मागण्यास सुरुवात केली आहे. या दर्ग्यावर चढवायची चादर मंगळवार, दि. २४ डिसेंबर रोजी उद्धव ठाकरेंच्या हस्ते ‘मातोश्री’हून रवाना झाली.
कुर्ल्यात बेस्ट बस अपघातानंतरही मुंबई महानगरपालिकेडून अतिक्रमणे हटविण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांकडून रोष व्यक्त होतो आहे. कुर्ला (प) स्थानक ते स.गो. बर्वे मार्ग- रॉयल हॉटेल पर्यंत तसेच कुर्ला (प)हॅप्पी होम ते श्रीकृष्ण चौक आणि सेंट जोसेफ हायस्कुल ते मार्केट पर्यंतचे सर्व फुटपाथवरील अतिक्रमण तातडीने कायमस्वरुपी हटविणेबाबत भाजप जिल्हा सचिव व्यंकट बोद्दुल यांनी मुंबई महानगरपालिका एस विभाग आणि कुर्ला वाहतूक पोलिसांना पत्र लिहिले आहे. तसेच ही अतिक्रमणे न हटविल्यास शुक्रवार, दि.२० रोजी महापालिका कार्या
मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणा-या १५४ वर्ष जुन्या कर्नाक पुलाची मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्बांधणी सुरू आहे. या प्रकल्प अंतर्गत ५१६ मेट्रिक टन वजनाचा दक्षिण बाजुचा गर्डर रेल्वे भागावर स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. आता, दुस-या बाजुच्या गर्डरचे ४२८ मेट्रिक टन सुटे भाग प्रकल्पस्थळावर दाखल झाले आहेत. तर, उर्वरित सुटे भाग दिनांक २० डिसेंबरपर्यंत प्रकल्पस्थळी दाखल होणे अपेक्षित आहे. अपेक्षित कार्यवाही पूर्ण झाल्यास दि.५ जून २०२५पर्यंत कर्नाक पूल
मुंबई पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी २५ वर्षांत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा दावा भाजप नेते आणि पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा ( Ravi Raja ) यांनी केला.
उद्धव ठाकरे ( Uddhav Thacheray ) जे स्वतः महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेत ते स्वतः मुंबईतील प्रत्येक वॉर्डात जातीनं लक्ष घालत आहेत. यावेळी उद्धव ठाकरे कुठल्याही मित्रपक्षांना सोबत घेण्याच्या मूड मध्ये दिसत नाहीत. नेमकी रणनिती कशी आखली जात आहे?
कुर्ल्यातील बेस्ट बस दुर्घटनेमुळे अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि वाहतूक नियोजनाची आवश्यकता असे अनेक मुद्दे चर्चेत आले आहे. मुंबईचे वाहतूक नियोजन आखताना महानगरपालिका, एमएमआरडीए, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील समन्वयाची आवश्यकता याविषयी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्याशी दैनिक मुंबई तरुण भारतने साधलेला संवाद.
मुंबई महानगरपालिकेच्या 'ए'विभाग अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकालगतच्या भूयारी मार्गामध्ये हवा खेळती राहण्यासाठी नव्या तंत्रज्ञानासह अद्ययावत वायूविजन (व्हेंटिलेशन) प्रणाली बसविण्यात आली आहे. यामुळे भूयारी मार्गातील हवा खेळती राहण्यासोबतच तापमान कमी होण्यासाठी मदत होणार आहे. परिणामी, भूयारी मार्गाच्या ठिकाणी गर्दी असताना होणारी अस्वस्थतता कमी होण्यास मदत होईल. त्यासोबतच भूयारी मार्गातील गरम हवा बाहेर टाकण्याचे काम या मध्यवर्ती यंत्रणेमार्फत करण्यात येईल.
प्रशासनाच्या मदतीला विविध संस्था, संघटनांचा पुढाकार. मतदात्याना खरेदी, खानपान आणि मनोरंजनात मिळणार सवलत
( Navi Mumbai ) उद्यानातील पाण्याच्या टाकीत पडून सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नवी मुंबईतील वाशी परिसरात घडली आहे. वाशी सेक्टर १४ येथील गोरक्षनाथ पालवे उद्यानात शनिवार दि. २ नोव्हेंबर रोजी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यादरम्यान उद्यानातील सुरक्षारक्षक घटनास्थळी उपस्थित नसल्याची बाबदेखील उघडकीस आली आहे. ऐन दिवाळसणामध्ये या चिमुकल्याचा असा दुर्देवी अंत झाल्यामुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तेव्हापासून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात निष्कासन कार्यवाही जोमाने सुरू केली आहे. महानगरपालिकेने आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून ४८ तासांत म्हणजेच दिनांक १५ ते १७ ऑक्टोबर याकालावधीत संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मिळून एकूण ७ हजार ३८९ इतके भित्तीपत्रके, फलक, बॅनर्स, झेंडे हटविले आहेत.
(Navi Mumbai Municipal Corporation) नवी मुंबई महापालिकेत कायम स्वरुपी कर्मचाऱ्यांसाठी ३३ हजार रुपये तर करार पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना २७ हजार रुपये दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे घेतला आहे.
(Dharavi) "मुंबई महानगरपालिकेला लेखी आश्वासन दिल्याप्रमाणे पुढील २-३ दिवसांत अनधिकृत बांधकाम संबंधित लोक स्वतः काढतील. हे आश्वासन मिळताच बीएमसीची टीम याठिकाणांहून निघाली. कोणत्या परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करून कोणीही अडथळा निर्माण करेल तर ते योग्य होणार नाही.", अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यंमत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूर येथे फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत धारावीतील कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली.
पाकिस्तान आणि स्वीडन या देशात ‘मंकीपॉक्स’ या संसर्गजन्य आजाराने बाधित रूग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आणि राज्यसरकारकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबई महानगरात विदेशातून येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता अधिक सावधगिरी बाळगण्यात येत आहे. यामुळेच महापालिका संचलित सेव्हन हिल्स रुग्णालयात १४ रुग्णशय्या असलेला कक्ष आरक्षित करण्यात आला आहे. तसेच गरजेनुसार ही संख्या वाढवण्याचीही रूग्णालय प्रशासनाने तयारी ठेवली आहे. महापालिका क्षेत्रात 'मंकीपॉक्स' संसर्गाचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. त
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये यंदा चांगल्या पावसामुळे ९३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तरीही काही निवडक ठिकाणांहून पाणी पुरवठयाबाबतच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळेच लोकप्रतिनिधींनी पाणीपुरवठ्याबाबत केलेल्या तक्रारींचे त्वरित निराकरण करावे, पाणीविषयक सर्वच तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांचा निपटारा योग्य वेळेतच करावा. तसेच बेकायदेशीर मोटार पंप, अनधिकृत नळजोडण्या यांना आळा बसावा म्हणून पथके गठीत करावेत. अनधिकृत प्रकार आढळल्यास मोटारपंप जप्त करावेत, तसेच दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश महापा
बेस्ट बससेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे मुंबईच्या कानाकोपऱ्यात बेस्टची अत्यावश्यक सेवा अल्पदरात नियमितपणे सुरु राहणे ही प्रवासी आणि मुंबई शहराची मूलभूत गरज आहे. मात्र ७ ऑगस्ट या बेस्ट बससेवा दिनाच्या दिवशी सुद्धा 'बेस्ट बचाव अभियान' राबवावे लागणे, हे मुंबईकरांसाठी दुर्देवी आहे. त्यामुळे बेस्ट दिन म्हणावा की दीन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळेच अभियानाकडून मुंबईतील सर्व आमदारांना दि. ७ ऑगस्ट ते १० ऑगस्ट दरम्यान बेस्टसंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे.
कोल्हापूर येथे मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीनंतर तेथील महापालिकेला स्वच्छतेसाठी दोन सक्शन कम जेटिंग विथ रिसायकलर यंत्राची आवश्यकता होती. दरम्यान कोल्हापूर शहरातील पर्जन्य जलवाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे. पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे स्वच्छतेसाठी मुंबईहून कोल्हापुरात दाखल झालेल्या चमुमार्फत कार्यवाहीला सुरूवात झाली आहे. यामध्ये वाहन चालक, तंत्रज्ञ, कामगार यासारख्या मनुष्यबळाचा समावेश आहे. याठिकाणी परिस्थिती पूर्ववत करण्याच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेने
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी महत्त्वाचा असणारा पवई तलाव दि. ८ जुलै रोजी पहाटे ४.४५ वाजेच्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी फक्च औद्योगिक कारणांसाठी वापरले जाते. पावसादरम्यान ओव्हर फ्लो होणारा हा मुंबईतील पहिला तलाव आहे.
मुंबईतील जुन्या आणि प्रदुषणकारी गाड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन भंगार यार्ड (स्क्रॅप यार्ड) विकसित करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यासाठी ऐरोलीतील जकात नाक्याजवळील जागा पालिकेने जवळपास निश्चित केल्याची माहिती आहे. पालिकेने एक ते दीड महिन्यात इच्छुक कंपन्यांकडून 'रुची प्रस्ताव' मागवण्यात आल्याचे कळते. दरवर्षी अंदाजे ५० हजार वाहने या नवीन भंगार यार्डमध्ये मोडित काढता येतील. महाराष्ट्रातील हे पहिलेच मोठे भंगार यार्ड असेल.
हवामान खात्याने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला असून राज्य आपत्ती नियंत्रण विभाग, मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासन एकत्रितपणे काम करून मुंबईकरांना दिलासा देण्याचं काम करत आहेत. मुंबई दि. ७ जुलैच्या रात्रीपासून २६७ ते ३०० मिलिमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. दरम्यान नागरिकांच्या मदतीला सर्वेाच्च प्राधान्य दिले जात असून, सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. ८ जुलै रोजी दिली. मुंबईतील सुमारे ५ हजार ठिकाणांवर मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येत
टी २० क्रिकेट विश्वचषक- २०२४ विजेत्या भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात दि. ४ जुलै २०२४ रोजी रात्री उशिरापर्यंत लाखोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. स्वागत सोहळा आटोपून ही गर्दी ओसरल्यानंतर महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसरात रात्रभर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या भागात सकाळी चालण्यासाठी नित्यनेमाने येणाऱ्या मुंबईकरांसाठी हा सर्व परिसर स्वच्छ करून उपल्बध करून देण्यात आला.
हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या १११ व्या जयंती दिनानिमित्ताने मुंबई महानगरपालिका, केसूला बंजारा सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने तसेच केईएम रुग्णालयाच्या सहकार्याने दि. १ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १८० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
मुंबई महानगरात सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. मुंबईतील नागरिकांना खड्डेमुक्त रस्त्यावरून प्रवास करता यावा, यासाठी पालिकेने सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. या कामामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी प्रत्येक रस्त्याच्या कामाची 'कोअर टेस्ट' (सामर्थ्य चाचणी) केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. मुंबई उपनगरात दोन ठिकाणी दि. १ जुलैला या चाचणीला सुरूवात झाली आहे. मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार ही चाचणी केली जात आहे.
निवडणुक कर्तव्यावर असताना पालिका कर्मचाऱ्याचा किंवा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना आता १५ लाख सानुग्रह अनुदान मिळणार आहे. यापूर्वी ही रक्कम १० लाख रुपये एवढी होती. दरम्यान आता सानुग्रह अनुदानात ५ लाख रुपयांची वाढ झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपत्कालीन कक्षाची उभारणी, विविध संसाधने, आपत्कालीन परिस्थितीवेळी करावयाच्या विविध उपाययोजना यासंबंधी माहिती घेण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला दि. २ जुलै २०२४ रोजी भेट दिली.
अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेली कारवाई आता अधिक तीव्र करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या विविध विभाग कार्यालयांने दि. २८ जून ते दि.३० जून दरम्यान केलेल्या कारवाईत ५३८ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यासाठी पालिकेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुंबई उच्च न्यायालय, चर्चगेट ते मुंबई उच्च न्यायालय, कुलाबा कॉजवे, मोहम्मद अली मार्ग, लोकमान्य टिळक मार्ग, लालबागचा राजा परिसर, दादर रेल्वे स्थानक (पश्चिम, जोड (लिंक) मार्ग, हिल मार्ग, अंधेरी रेल्वे स्थानक (पश्चिम), मथुरादास मार्ग,
मुंबई महापालिका, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई) आणि एसएनडीटी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यामाने दि. २६ जून रोजी विद्यापीठाच्या जुहू कॅम्पसमधील जागेवर मियावाकी पद्धतीने २५ प्रजातींच्या १६०० वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण दिनानिमित्त या वृक्षांच्या लागवडीचे काम पुर्ण झाले होते. तरी एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्जवला चक्रदेव, सीएसएमआयएचे वरिष्ठ अधिकारी आणि पालिका उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाने हा प्रकल्प राबवण्यात आला.
मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसरात गेल्या सहा-सात महिन्यापासून महापालिका आणि एएसआयकडून पुनरुज्जीवनाचे काम सुरु आहे. १५ दिवसापुर्वी बाणगंगा तलाव परिसराची पाहणी केली असता काम व्यवस्थित होत नसल्याचे संबधित अधिकाऱ्यांना कळवले होते. पण काल बाणगंगा तलावातील गाळ काढण्याचे काम देण्यात आलेल्या कॅन्ट्रक्टरने पैसे वाचवण्यासाठी एक्सकेंव्हेटर संयंत्र उतरवून तलावांच्या पायऱ्यांची हानी केली. यामुळे ऐतिहासिक आणि अध्यात्मिक महत्व असलेल्या या स्थळाचे नुकसान झाले, असे विधान कॅबिनेट मंत्री आणि स्थानिक आमदार मंगल प्रभात लो
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित असणा-या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती महानगरपालिकेद्वारे नियमितपणे करण्यात येत आहे. या अंतर्गत पश्चिम द्रुतगती मार्गावर गुंदवली उन्नत मेट्रो स्थानका खालील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे 'जिओ पॉलिमर' तंत्रज्ञान वापरून काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. जिओ-पॉलिमर काँक्रिट हे नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणास फायदेशीर बांधकाम साहित्य आहे.
एकीकडे वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेले असताना आता मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट कोसळणार आहे. कारण मुंबईला पाणीसाठा करणाऱ्या धरणात एकूण ५.३८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांच्या साठवण क्षमतेत घट झालेली आहे.
मुंबईतील नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही गैरसोयींना सामोरे जावे लागू नये म्हणून खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट ठेवून महापालिका प्रशासन अविरत कार्यरत आहे. पालिकेच्या अखत्यारितील सर्व रस्ते वाहतूकयोग्य आणि सुरक्षित स्थितीत ठेवण्यासाठी बारकाईने नियोजन करण्यात आले आहे. रस्ते डागडुजी, खड्डे भरण्याची कामे प्रगतिपथावर आहेत.
म्हाडा आणि मुंबई महानगरपालिकेने संयुक्त कारवाईत करत जुहू येथील शुभ जीवन सहकारी गृहनिर्माण संस्थेतील एक अनाधिकृत होर्डिंग हटवले आहे. घाटकोपरच्या घटनेनंतर पालिका प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अनाधिकृत होर्डिंग हटवण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ च्या पहिल्या दिवशी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले गेले. ठिकठिकाणी शाळेच्या प्रवेशद्वारावर रांगोळी काढून, वर्गखोल्यांच्या बाहेर सजावट करण्यात आली होती. तसेच ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे औक्षण करून विद्यार्थी प्रवेश सोहळा पार पडला. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या शालेय वस्तुंचे वाटप ही यावेळी करण्यात आले.
पावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालल्याने लेप्टोसारखा रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे साचलेल्या पाण्यातून चालणे टाळावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने नागरिकांना केले आहे. गेल्या वर्षी महापालिका क्षेत्रात लेप्टोच्या रुग्णसंख्येत वाढ झाली होती. त्यामुळे यावेळी महापालिकेने पावसाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच सोशल मीडिया पेजवर पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
वाशीनाका येथे जलद्वार बसविण्याची कामे
सुमारे वीस वर्षांहून अधिक काळ राजे एडवर्ड स्मारक अर्थात केईएम रुग्णालयात तंबाखू बंद क्लिनिक द्वारे तंबाखू व्यसनाधीन रुग्णांवर उपचार आणि समुपदेशन केले जात आहे. हे क्लिनिक आता अद्ययावत करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशन यांच्याशी सामंजस्य करार केला आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यापासून समुद्रात मोठी भरती येणार असून साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. ५ ते ८ जूनदरम्यान दररोज समुद्रात मोठी भरती येणार आहे. पावसाळ्यातील चार महिन्यांत एकूण २२ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. सगळ्यात मोठी भरती २० सप्टेंबर रोजी येणार असून यावेळी ४.८० मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. पालिकेने येत्या पावसाळ्यासाठी भरती-ओहोटीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात सलग चार दिवस मोठी भरती येणार आहे.
पावसामुळे रस्त्यांवर तयार होणाऱ्या खड्ड्यांच्या तक्रारींचा निपटारा शक्यतो २४ तासांमध्ये करणे ही यंत्रणा म्हणून जबाबदारी घ्यावी. पावसाळा कालावधीत मुंबईतील खड्डेमुक्त रस्त्यांसाठी रस्ते विभाग आणि इतर सर्व संबंधित यंत्रणा सक्षमपणे आणि एकसंघपणे कार्यरत आहे, याचा अनुभव नागरिकांना आला पाहिजे. त्यासाठी सर्व संयंत्रे आणि साहित्याची उपलब्धतता राहील याची खातरजमा करा. रस्त्यांची सर्व कामे दिनांक १० जूनपर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.
मुंबई महानगरपालिकेकडून उद्या बुधवार, दि. २९ मे ते गुरुवार, ३० मे दरम्यान बी. डी. पाटील मार्ग, वाशी नाका येथे ४५० मिलीमीटर व ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील काही भागांना बुधवार, दि. २९ मे रोजी सकाळी १०.०० वाजेपासून गुरुवार, दि. ३० मे सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.