“सागरी महामंडळाच्या जागांचा व्यावसायिक वापर करून उत्पन्नवाढीवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे सागरी महामंडळाने त्यांच्या जागेच्या वापराबाबत सजग आणि कडक भूमिका घ्यावी. तसेच या जागांवर होर्डिंगची उभारणी, त्यावरील जाहिरात आणि जागांच्या व्यावसायिक वापराबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करावे,” असे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरेमंत्री नितेश राणे यांनी बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी दिले.
Read More
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनएचएसआरसीएल)ने सोमवारी सांगितले की, “महानगरातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकासाठी सुमारे ७५ टक्के उत्खनन काम पूर्ण झाले आहे.”
शहराच्या मध्यवर्ती भागातील १२५ वर्षे जुना एलफिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज अखेर काल रात्री शुक्रवार, दि.२४ रोजी रात्री ९ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये काही ठिकाणी वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. तर ७ मार्ग ‘नो पार्किंग’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
सागरी महामंडळाच्या जागांचा व्यावसायिक वापर करून उत्पन्न वाढीवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे सागरी महामंडळाने त्यांच्या जागेच्या वापराबाबत सजग आणि कडक भूमिका घ्यावी. तसेच या जागांवर होर्डिंगची उभारणी, त्यावरील जाहिरात आणि जागांच्या व्यावसायिक वापराबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी दिले.
मुंबईतील जुन्या ब्रिटिशकालीन पुलांचे आता १०० वर्षांहून अधिक आयुर्मान झाले आहे. त्यामुळे भविष्यकालीन वाहतूक व्यवस्था सामावून घेणार्या आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर राज्य सरकार लक्ष केंद्रित करत आहे. मागील लेखात आपण मुंबईच्या दादर, भायखळा, रे रोड आणि घाटकोपर येथील रेल्वेमार्गावरून जाणार्या पूल प्रकल्पांचा आढावा घेतला. याच लेखमालिकेच्या दुसर्या भागात आज आपण ‘एल्फिन्स्टन रोड आरओबी प्रकल्पा’चा आढावा घेऊया.
महिलांना सामान न्याय देण्यासाठी मह्तवपूर्ण निर्णय
(Mumbai Bike Taxi) मुंबईमध्ये बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मुंबईमधील रस्त्यांवर आता बाईक टॅक्सी धावणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा हा मोठा निर्णय मानला जात आहे. या निर्णयामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीतून मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
मुंबई, दि.१९: प्रतिनिधी मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वाढत्या प्रवासी संख्येमुळे सध्या असलेल्या परिवहन सेवेच्या विस्तारासह आगामी पाच परिवहन विभागांतर्गत ‘रोप वे’ या नवीन परिवहन सेवेचा अंतर्भाव करण्याच्यादृष्टीने राज्यातील रोपवेची कामे कार्यान्वित करण्यास बुधवार, दि.१८ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) विस्तार प्रकल्पाने नुकताच एक माईलस्टोन गाठत महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. एससीएलआर विस्तार टप्पा १मध्ये वाकोला फ्लायओव्हरवरील २१५ मीटर ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक (ओएसडी) स्पॅनच्या यशस्वी लाँचिंगसह एक महत्त्वाचा टप्पा पार केला.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी त्वरित सुरू होत असून एमएमआरडीएच्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील प्रकल्पांसाठी ही मार्गदर्शक तत्वे लागू आहेत. या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची जबाबदारी कार्यकारी अभियंत्यांवर असून, त्यांनी या संदर्भातील नोंदी ठेवून प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाचा (MUTP-III)भाग असलेला बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम लक्ष्यित पूर्णत्वाच्या अगदी जवळ येऊन लक्षणीय प्रगती करत आहे. हा प्रकल्प मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनद्वारे उभारण्यात येत आहे. पनवेल आणि कर्जतला आधुनिक दुहेरी मार्गाने जोडणारा हा मार्ग या दोन्ही भागांना कनेक्टिव्हिटी देण्यास सज्ज होता असल्याची माहिती एमएसआरव्हीसीने दिली आहे. या प्रकल्पाने भौतिक आणि आर्थिक अंमलबजावणीच्या दृष्टीने लक्षणीय प्रगती साधली आहे. ऑक्टोबर २०२४पर्यंत या प्रकल्पाची ६७ टक्के प्रगती
भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त, मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी समस्त मुंबईवासियांना शुभेच्छा दिल्या.
शहर व उपनगरातील ऑटोरिक्षा अथवा टॅक्सी चालकाने भाडे नाकारले, जादा भाडे आकारले, गैरवर्तन केल्यास 9152240303 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, पावसाच्या मोसमात मुंबई व मुंबई उपनगरातील बहुतांशी प्रवाशांची वाहतूक ही काळी पिवळी टॅक्सी व ऑटोरिक्षा मधून होत असते.
मुंबई, दि. २२ : भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाने मुंबईतील संभाव्य दरडी कोसळण्याच्या २४९ ठिकाणांचे शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाआधारे २४९ पैकी ७४ ठिकाणे अतिधोकादायक घोषित केली आहेत. या ७४ ठिकाणांच्या निकटच्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत संभाव्य धोका उद्भवल्यास काय करावे, काय करू नये; याचे प्रशिक्षण टप्पेनिहाय पद्धतीने देण्यात येत आहे. या अंतर्गत आतापर्यंत २५० नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण यापुढेही सुर
राज्यातील २८ पालिकांच्या कचरा-भूमीचे रुपांतर लवकरच हरित क्षेत्रात होणार आहे. त्यासाठी त्या नगरपालिकांच्या हद्दीतील कचरा भूमीत बदल घडवून ती हरित क्षेत्रे बनविण्याची योजना सरकारने हाती घेतली आहे. या कृतीतून क्षेपणभूमी जवळ राहणार्या नागरिकांना या बदलातून हरित क्षेत्राचा मोठा लाभ मिळणार आहे.
मुंबई : महानगराच्या पाणीपुरवठ्यासाठी भांडुप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे झालेली गळती दुरुस्ती करण्याचे आव्हानात्मक काम मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाने नियोजित ३० दिवसांऐवजी अवघ्या १८ दिवसात पूर्ण केले आहे. हा जलबोगदा पूर्ण क्षमतेने भरुन कार्यान्वित करण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे रविवार, दिनांक २३ एप्रिल पासून मुंबई महानगराचा पाणीपुरवठा पूर्ववत होणे अपेक्षित आहे.
मुंबई : मुंबईतील वाहतूक चौक (ट्रॅफिक जंक्शन) सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांसाठी सुरक्षित असावेत, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी (BIGRS) या जागतिक उपक्रमातील भागीदारांच्या सहकार्याने नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. या माध्यमातून मुंबई महानगरातील सर्वाधिक अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) अशा २० वाहतूक चौकांचा नवीन आराखडा तयार करुन त्यानुसार त्यांचा कायापालट येणार आहे.
राज्य सरकारने मुंबईतील एसआरए प्रकल्पांच्या धर्तीवर संपूर्ण राज्यभरातील एसआरए प्रकल्पांसाठी एफएसआय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे
मागील भागात मुंबईतील काही गृहनिर्माण प्रकल्पांचा आपण आढावा घेतला होता. आज मुंबईच्या विकासाला गतिमान करणार्या अशाच दोन प्रकल्पांची आपण सविस्तर माहिती करुन घेऊया.
मुंबई महानगरक्षेत्रात र्हास पावणार्या पाणथळ जागांचा आणि कांदळवनांचा आवाज असलेल्या नंदकुमार पवार यांच्याविषयी...
भाजप नेते किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केले आरोप
कोरोना महामारीच्या काळात भारतीय रेल्वेलाही प्रवासी उत्पन्न बुडाल्यामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसलाच. परंतु, तरीही रेल्वेची विविध स्तरावर विकासकामे सुरुच आहेत. तेव्हा, मुंबई महानगर क्षेत्रातील टाळेबंदीच्या काळात पार पडलेल्या आणि भविष्यातील काही रेल्वे प्रकल्पांचा घेतलेला हा आढावा...
रियाविरोधात आणखी एक खटला दाखल होणार
मुंबई महानगर प्रदेश, पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी सुधारित आदेश जारी,इतर भागात अधिकाऱ्यांची १०० टक्के, तर कर्मचारी ३३ टक्के आदेश
शहरातील वाहतूककोंडी कमी व्हावी यासाठी तीन नवीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
राज्य सरकारला या महामार्गाचे काम करताना पाच टप्पे करण्याचा सल्ला दिला