BMC च्या मुंबई फायर ब्रिगेडशाखेने २६मे पासून शहरातील मॉल्सची तपासणी सुरू केली. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, या मॉल्समधील गेमिंग झोनची ही कसून तपासणी करण्यात आली. अग्निशमन विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत एकूण ५५ मॉलची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १३मॉलना अग्निसुरक्षा नियमांचे पालन न केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे.
Read More
वारंवार पाहणी करून किंवा नोटीस देऊनही अग्निरोधक प्रणाली न लावणाऱ्या किंवा त्या अद्ययावत न ठेवणाऱ्या मालमत्ता धारकांवर आणि इमारतींवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच आगीसारख्या आपत्तींसाठी जबाबदार असलेल्यांवर पोलिसांकडून यथोचित कारवाई केली जाते. त्याच धर्तीवर महानगरपालिकेकडूनही जबाबदारी निश्चित केली जावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक ९ व पोलीस चौकीजवळ असणाऱ्या जागेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाद्वारे विशेष जनजागृती प्रदर्शन नुकतेच आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाला नागरिकांचा व विशेष करून लहानग्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याच प्रदर्शनात असणारा आग विझवणारा 'फायर रोबो' हा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला, असे मुंबई अग्निशमन दलातर्फे कळविण्यात आले आहे.
मुंबई पश्चिम उपनगरातील ओशिवरा येथे हिरापन्ना मॉलला २२ सप्टेंबर, २०२३ रोजी दुपारी आग लागल्याची घटना घडली आहे. या मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेली ही आग एल टू प्रकारची असून दुपारी साधारणपणे ३ वाजताच्या सुमारास मुंबई अग्निशमन दलाला याबाबत माहिती मिळाली होती.
मुंबईतील सांताक्रूझ येथील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग लागली असून आग लागण्याची घटना दुपारी एक वाजता घडली. दरम्यान, सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या भीषण आग दुर्घटनेत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५ जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी हजर असून हॉटेल रिकामे करण्याचा प्रयत्न करत आहेत.
राज्यात सध्या अत्यावश्यक सेवेतील प्रत्येक कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून कामगिरी बजावत आहेत. मुंबईवर संकट कोसळल्यावर धावून जाणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांना तीन हजार पीईपीचे वाटप करण्यात आले आहे. भाजप खासदार पूनम महाजन यांनी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांची गरज ओळखून ही मदत केली आहे.