राष्ट्रनिर्माणासाठी उद्योजकांना बळ देणे सर्वस्वी आवश्यक. ही बाब लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिला कारकिर्दीच्या दुसर्याच वर्षी म्हणजे २०१५ साली ‘मुद्रा योजने’ची मुहूर्तमेढ रोवली. या योजनेअंतर्गत ‘एमएसएमई’ प्रकारातील उद्योजकांना दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. ही योजना अल्पावधीतच यशस्वी ठरली असून, त्यांच्या लाभार्थ्यांची संख्या ४० कोटींपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, कर्जदारांपैकी ६८ टक्के प्रमाण हे एकट्या महिलावर्गाचे आहे. तेव्हा, अशा या उद्योगक्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडव
Read More