‘ओमिक्रॉन’नंतर आता फ्रान्समध्ये आढळलेल्या ’खकण’ या विषाणूने धाकधुक आणखी वाढविली आहे. नव्या विषाणूचे उगमस्थान कॅमरुन हा आफ्रिकन देश मानला जातो. याचाच एक अर्थ असा की, या देशातून दाखल होणार्या विमानसेवेवर निर्बंध लागतील आणि पुन्हा एकदा याच देशावर कोरोना प्रसाराचा ठपका ठेवला जाऊ शकतो. पण, या सगळ्यात ज्या ठिकाणाहून कोरोनाचा उगम झाला, त्या चीनमध्ये आता नेमकी काय परिस्थिती आहे?
Read More
हैदराबादमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी मोठा गौप्यस्फोट केला
भारतात राहून भारताची-भारतीयांची इच्छाशक्ती खच्ची करण्यासाठी कामाला लागलेल्या यातल्या कोणाहीकडे मोदींनी लक्ष दिले नाही, ते आपले काम करतच राहिले. परिणामी, आज भारताने दर चारपैकी एका पात्र लाभार्थ्याचे लसीकरण करण्याची कामगिरी करून दाखवली, जी नरेंद्र मोदींच्या व भारताच्याही विरोधकांना बसलेली सणसणीत चपराकच आहे.
भारताला वेगवान लसीकरण करणे शक्यच नाही, असे तमाम मोदींविरोधकांचे म्हणणे होते. पण, मोदी सरकार किंवा आरोग्य यंत्रणेनेही त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले आणि आपले देश वाचवण्याचे काम सुरूच ठेवले. परिणामी, स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षात ७५ कोटी देशवासीयांच्या कोरोना लसीकरणाची ऐतिहासिक कामगिरी शक्य झाली.
जगात सध्या कोरोना लसीबाबत चर्चा सुरू आहे. यात लहान मुलांना कोरोना लस देण्याबाबत मंथन होत आहे. जगभरातील काही राष्ट्रांमध्ये याच्या नियोजनात संभ्रम असल्याचे दिसते. त्याचवेळी भारतात लहान मुलांच्या लसीकरणाबाबत सध्या चर्चा होत आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम जगभर राबवण्यात आली. भारताने तर या लसीकरण मोहिमेत अमेरिकेलाही मागे टाकले. तरीही युरोपियन देशांनी लसीकरणाच्या बाबतीत खोडा घातलाच. सुरुवातीला लसींचा कच्चा माल रोखून अमेरिका आडकाठी करत होती, तर आता युरोपियन देशांनी ‘व्हॅक्सिन पासपोर्ट’मधून भारतीय लसींना वगळले आहे. कारण, ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ घेतलेल्या भारतीयांना युरोपात प्रवास करण्यास तूर्त मनाई आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता प्रत्येक नागरिकाचे लसीकरण आवश्यक बनले आहे. मात्र, लसींची टंचाई लक्षात घेत मुंबई लगतच्या मोठ्या शहरांमध्ये आता लस उपलब्ध व्हावी म्हणून राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकांना सूचना दिल्या आहेत.
येत्या पंधरवड्यात म्हणजे 16 ते 31 मे या कालावधीसाठी कोविशील्ड व कोवॅक्सिनच्या 191.99 लाख मात्रा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवल्या जातील. यामध्ये 162.5 लाख कोविशील्ड आणि 29.49 लाख कोवॅक्सिनच्या मात्रा असतील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे. या मात्रांच्या वितरणाचे वेळापत्रक आगाऊ कळवले जाईल. पाठवलेल्या लसींचा योग्य प्रकारे उपयोग करावा, व लस वाया जाण्याचे प्रमाण कमीतकमी असावे यासाठी राज्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, असे आवाहनही केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
भारत बायोटेकनिर्मित भारतीय लस कोवॅक्सीन कोरोनाविरोधी लढ्यात प्रभावी असल्याचे अमेरिकेनेही मान्य केले आहे. तसेच भारताला दुसऱ्या लाटेतून वाचण्यात ही लस अधिक प्रभावी ठरेल असेही व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. ऍन्थोनी फौसी यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना केले आहे.
पहा ही बँक देतेय खास ऑफर कोरोनाच्या लाटेने देशात डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यावेळी आपल्याकडे लसीकरण हे एक शस्त्र आहे.
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सुरू असलेली वाढ पाहता एक दिलासादायक बाब उघडकीस आली आहे. देशात ऑक्टोबर पर्यंत पाच कंपन्यांच्या लसी उपलब्ध होऊ शकतील, अशी शक्यता आहे. विविध फार्मा कंपन्या लस तयार करत आहेत. सध्या या लसी चाचणीच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत. वृत्तसंस्थांना मिळालेल्या माहितीनुसार, पुढील दहा दिवसांत केंद्र सरकार रशियाच्या 'स्पुतनिक-वी' या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देऊ शकते. देशाला कोवॅक्सिन, कोव्हीशिल्डनंतर तिसरी लस उपलब्ध होईल. राज्यांमध्ये सुरू असलेल्या कोरोना लसीच्या तुटवड्याची टंचाईसुद्ध
आपला भारत देश संपूर्ण 'जगाची फार्मसी' म्हणून ओळखला जातो. जागतिक महामारीच्या विरोधातल्या एकत्रित आणि निर्धारपूर्वक लढ्यात भारताने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. देशव्यापी ‘कोविड-१९’ लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत साडेदहा लाख लाभार्थ्यांनी लस घेतली.
‘सीरम इन्स्टिट्यूट’ आणि ‘भारत बायोटेक’ या दोन भारतीय कंपन्यांच्या कोरोनारोधी लसींना केंद्र सरकारने मंजुरी दिली आणि एकच गहजब माजवला गेला. भारताच्या यशोगाथेला विरोध करण्यालाच आपले यश मानणार्या तथाकथित उदारमतवाद्यांनी ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’चा वापर करण्यावर आक्षेप घेतला. समाजवादी पक्ष, काँग्रेस यांसारख्या राजकीय पक्षांनीदेखील स्वदेशात विकसित केलेल्या भारतीय लसीचा विरोध करता करता अकलेचे तारे तोडले. मात्र, भारतीय कोरोनारोधी लस आणि जगातील अन्य देशांची नेमकी भूमिका काय, हे समजल्यास इथे ‘सीरम इन्स्टिट्यूट’ व
वैश्विक महामारी असलेल्या कोरोनाला प्रतिबंध करणारी लस आगामी काही आठवड्यात येणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. त्यामुळे भारतीयांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. कोरोनावर लस यावी यासाठी जागतिक व्यासपीठावरदेखील यापूर्वी अहोरात्र प्रयत्न करण्यात आले होते. जागतिक आरोग्य संघटनाही अधूनमधून कोरोनावाढीचे संकेत देत असते. २०२० या वर्षातील साधारण आठ ते नऊ महिने कोरोनाच्या सावटाखाली गेले. कोरोनाचा प्रभाव नियंत्रित आणण्यासाठी लस हा एक महत्त्वाचा पर्याय आहे.
कशी होतेय लसीकरणाची तयारी वाचा सविस्तर
विविध वयोगटातील लोकांवर याचे परीक्षण केले जाणार आहे. याद्वारे मानवाच्या विविध आयुर्मानाच्या टप्प्यात ही लस काय परीणाम करते याचा शोध घेतला जाणार आहे. प्रत्येक वयोगटासाठी ही लस योग्य असल्यास याचा वापर कोरोनावरील लस म्हणून केला जाईल. तसेच या लसीमुळे होणारे साईड इफेक्टसही तपासले जातील. या लसीचा तिसरा टप्पा डिसेंबरपर्यंत सुरू केला जाईल. यात हजारो लोकांवर याची चाचणी केली जाण्याची शक्यता आहे.