(Congress MLA Laxman Savadi) काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदी यांनी बेळगावात सुरू असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उत्तर कर्नाटकावर चर्चा होत असताना अचानक बेळगावसह मुंबईलाही केंद्रशासित करण्याची मागणी केली. अधिवेशनाच्या उत्तरार्धात उत्तर कर्नाटकातील समस्या आणि विकासावर चर्चा सुरू असताना आमदार सवदींनी ही मागणी केली आहे.
Read More
विधानसभा निवडणूकीचा निकाल हा काँग्रेससाठी अतिशय लाजीरवाणा असून काँग्रेसच्या आमदारांनी भाजपममध्ये विलीन व्हावे, असे वक्तव्य भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली.
(Devendra Fadnavis) "देशामध्ये ॲक्सिडेंटल पीएम सिनेमा आला तसंच कसब्यात ॲक्सिडेंटल आमदार तयार झाला ज्याची कामं कमी आणि दंगे जास्त", असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका केली.
देशभरात लोकसभा निवडणुक २०२४ चे वारे वाहु लागले आहेत. सर्वंच पक्ष लोकसभेच्या जागेसाठी उमेदवार घोषित करत आहेत. अशामध्ये काँग्रेसला पुन्हा सुरुंग INC MLA resign लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे पाच आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. यात तीन विधानसभेतील आमदार आहेत, दोन विधान परिषदेतील आमदार आहेत.
हिंदूंमध्ये द्वेष पसरवणारे काँग्रेस आमदार आफताबुद्दीन मोल्ला यांना आसाम पोलिसांनी अटक केली आहे. हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी हिंदू संत, पुजारी आणि नामघरिया यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते.
मार्च १९९३ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा एक सूत्रधार याकूब मेमनच्या फाशीला पत्र लिहून विरोध दर्शविणारा आमदार अस्लम शेख याने आज उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली.