T Raja Singh भाजपचे आमदार टी राजा सिंह (T Raja Singh) यांच्या घराची ४ संशयितांनी रेकी केल्याची घटना आहे. खाजा आणि इस्माईल अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. ही टी राजा सिंह यांच्या घराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल माध्यमाद्वारे पाठवत होते. ही घटना २७-२८ सप्टेंबरच्या मध्यरात्रीची आहे. आता याप्रकरणी चार पैकी दोघेजण ताब्यात आले आहेत.
Read More
तेलंगणा पोलिसांनी रविवार, दि. १६ जून २०२४ हैदराबादमधील गोशमहल येथून भाजप आमदार टी राजा सिंह यांना अटक केली. हैदराबादच्या राजीव गांधी विमानतळावरून त्यांना अटक करण्यात आली. राजा सिंह हे मेडक जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जात होते. गायींना वाचवत असताना त्यांच्यावर शनिवार, दि. १५ जून २०२४ गो तस्करांनी हल्ला केला होता.
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये रामनवमी मिरवणुकीची परवानगी रद्द करण्यात आली आहे. गोशमहलचे भाजप आमदार टी राजा सिंह यांनी हा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की मंगळवार, दि. १६ एप्रिल २०२४ रामनवमीच्या एक दिवस आधी, रात्री ८.३० वाजता, तेलंगणा पोलिसांनी त्यांना एक पत्र पाठवून कळवले आहे की यावर्षी रामनवमी मिरवणुकीची परवानगी रद्द केली आहे.
तेलंगणातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. परंतू, प्रचारादरम्यानचा एक धक्कादायक व्हिडीओ पुढे आला आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी प्रचार करत असताना एका महिलेने भाजप नेते टी राजा सिंह यांची हत्या करणार असल्याचे म्हटले आहे.