मनसे नेते अमित ठाकरे यांची गाडी समृध्दी महामार्गावरील टोल नाक्यावर ३ मिनिटांसाठी थांबवण्यात आली. यामुळे मनसैनिकांनी आक्रमक होत टोलनाका फोडला. त्यावर प्रतिक्रिया देताना माध्यमांसमोर आक्रमक पवित्रा घेतना मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिसले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. तिथे माध्यामांशी बोलताना ठाकरे म्हणाले की, अमित ठाकरे सध्या महाराष्ट्र दौरा करतोय,त्यामुळे तो काही महाराष्ट्रभर टोल फोडतोय असे नाही. रस्त्यांवर खड्डे , वाहतुक कोंडी आहे मग कसली टोल वसुली केली जातेय?, असा सवाल ही ठाकरेंनी केला.
Read More
मनसे नेते अमित ठाकरे यांची गाडी समृध्दी महामार्गावरील टोल नाक्यावर ३ मिनिटांसाठी थांबवण्यात आली. यामुळे मनसैनिकांनी आक्रमक होत टोलनाका फोडला. यावर भाजपाने ट्विट करत निशाणा साधला आहे. अमीत ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा. असं म्हणत भाजपाकडुन व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे.
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अविकसित भागाच्या समतोल विकासाचा राजमार्ग असून या महामार्गावरील अपघातसत्र आता थांबणार आहे. राज्य सरकारकडून हे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. दरम्यान, जगातील उत्तमात उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून या महामार्गावर अपघात होणारच नाहीत, अशा पद्धतीच्या उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
मुंबई : राज्यात समृध्दी महामार्गावर घडणाऱ्या अपघातांच्या मालिकांमुळे आता राज्य शासनाकडून नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे समृध्दी महामार्गावर जाणाऱ्या बसगाड्यांची पडताळणी केली जात आहे. दरम्यान, "आरटीओ" अधिकाऱ्यांनी केलेल्या बसगाड्यांच्या पडताळणीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
समृद्धी महामार्गावर ३० जून च्या रात्री भीषण अपघात झाला. एक खासगी बस डिव्हायडरला धडकून पलटी झाली. त्यामुळे बसमध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली. त्यांनतर दि. १ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपघातस्थळी जाऊन माहिती घेतली. यावेळी फडणवीसांनी या घटनेची कडक चौकशीचे आदेश दिले आहेत.
बुलढाणा : समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येणार असून तज्ज्ञांच्या सूचनांनुसार उपाययोजना प्राधान्याने अंमलात आणण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील देऊळगाव राजानजीक खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात रात्री दोन वाजता झाला होता. या दुर्घटनेत २६ जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले. तसेच, अपघातस्थळी जाऊन मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.
महाविकास आघाडी सरकारचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी "कळसूत्री सरकारने मांडलं पंचसूत्री बजेट" अशी प्रतिक्रिया दिली आहे. "या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन केले आहे
कामगारांच्या सुरक्षेची काळजी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षित वावर आवश्यक आहे . त्यामुळेच ही कामे सुरू करण्यापूर्वी ग्रामस्थाना विश्वासात घेण्यात आले आहे . आसपासच्या गावातील लोकांनाच या कामावर रोजगार देण्यात आला आहे . त्यांना कामाच्या ठिकाणी घेऊन येण्यासाठी आणि पुन्हा त्यांना घरी सोडण्यासाठी विशेष वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे .
समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी मागविण्यात आलेल्या निविदेत सात कंपन्या पात्र ठरल्या आहेत, तर ९० टक्के जमीन महामंडळाला मिळाली आहे.
मुंबईत पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाच्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी नाणारप्रश्नी आपली भूमिका विशद केली.