( Government support for Vedic mathematics; Chief Minister Devendra Fadnavis ) “भारतात विकसित झालेल्या विविध शास्त्रांचा पाया गणितावर आधारित आहे. वैदिक गणिताच्या खंडाद्वारे हे ज्ञान नव्याने समाजासमोर येणार आहे. वैदिक गणिताची महती व उपयोग येणार्या पिढ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्याकरिता भारती कृष्ण विद्या विहार येथे वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र उभारले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करत यास शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. ३१ मार्च रोजी दिली.
Read More
आज गणितातील प्रमेये, सिद्धांत हे पाश्चात्त्य गणिततज्ज्ञांच्या नावे असले, तरी भारतीय गणिती परंपरा ही ज्ञानसमृद्ध आणि काळाच्या पलीकडचा विचार करणारी होती. परंतु, दुर्दैवाने वसाहतवाद आणि युरोपीय वंशश्रेष्ठत्वाच्या सिद्धांतामुळे प्राचीन भारतीय गणिती परंपरा पद्धतशीरपणे दुर्लक्षित केल्यामुळे ती काहीशी अडगळीत पडली. पण, आज सर्वच क्षेत्रांत भारतीय ज्ञानपरंपरेचे पुनर्जागरण होत असताना, गणिती परंपरेचा समृद्ध वारसाही प्रत्येक भारतीयाने जाणून घेणे, त्याचा प्रचार-प्रसार करणे, हे देखील तितकेच महत्त्वाचे. तेव्हा, भारतीय गणित
माथाडी कामगारांचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याबाबत महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे गुरुवार, ३० जानेवारी रोजी निवेदन दिले.
bulldozers उत्तर प्रदेशमधील संभलमध्ये जुबैद नावाच्या वकट्टरपंथीने सती मठाच्या अवैध जमिनीवरील दुकानांवर बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे. याठिकाणी ८० चौरस मीटर जागेवर बेकायदेशीरपणे अवैधरित्या दावा करण्यात आला होता. यामुळे मठाच्या शेजारी असलेल्या जागेवर करण्यात आलेल्या कब्जामुळे हद्दीत वाढ निर्माण झाली होती. तक्रारीवरून प्रशासनाने अवैध दुकानांवर बुलडोझर फिरवर जमिनीचा ताबा सोडण्यास भाग पाडले.
Shiva temple उत्तर प्रदेशातील मथुरा येथील स्थानिक मंदिरात काही तरूणांनी हिंदू देवी-देवतांच्या मूर्तींची विटंबना केल्याचे प्रकरण समोर आले आहे. शिवमंदिरात असलेल्या मूर्तीची तोडफोड करत त्या मूर्ती मंदिराबाहेर फोकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिरात काही देवी-देवतांचे फोटो ठेवण्यात आले होते त्यांचीही तोडफोड करण्यात आली. यावेळी काही लोकांनी मनस्मृती जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातून पोलिसांनी दोन्ही गटांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
नाशिक : ( Harshutai Thakur ) “माझा एक हात काम करत नाही. परंतु, त्याची तमा न बाळगता मी मैदानात उतरले आहे. घरात बसले नाही. देवी-देवतांची खिल्ली उडवणे, टीका करणे आता कुठेतरी थांबले पाहिजे. माझा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही. परंतु, धर्म-संस्कृती काय असते हे शिकवणे माझ काम आहे. जिहाद्यांना प्रत्युत्तर देणे माझे काम आहे. जो माझ्या देवी-देवतांच्या विरोधात बोलणार, त्याला आम्ही सोडणार नाही,” असा इशारा हिंदू रणरागिणी हर्षुताई ठाकुर यांनी दिला.
सारथीच्या माध्यमातून मराठा तरुण मोठमोठ्या पदांवर गेलेत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. बुधवारी स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचा आनंद तर सगळेच साजारा करतात, अवघा देश भगवतांच्या प्राकट्य उत्सवाच्या आनंदात रममाण होतो तो दिवस म्हणजे जन्माष्टमी होय! भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलांचे साक्षीदार असलेल्या व्रजात तर याचा आनंद काय वर्णावा. व्रजभूमीत साजर्या होणार्या श्रीकृष्णजन्म उत्सवाचा घेतलेला हा आढावा...
मध्य रेल्वेने नेरळ ते अमन लॉज मिनीट्रेन सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. पावसाळ्यात खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान अमन लॉज ते माथेरानदरम्यान मिनीट्रेनच्या शटल फेऱ्या सुरू राहणार आहेत.
संपुर्ण देशाचे लक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणूकीच्या निकालांकडे लागले होते. आणि यंदाही अभिनेत्री-खासदार हेमा मालिनी तिसऱ्यांदा या निवडणूकीत जिंकल्या आहेत. त्यांना उत्तर प्रदेशातील मथुरा येथून भाजपाचं तिकीट मिळालं होतं. त्यांच्या या विजयानंतर लेक ईशा देओल हिने खास पोस्ट केली आहे.
देशाचं संपुर्ण लक्ष सध्या लोकसभा निवडणूकीच्या निकालाकडे लागले देशभरात सर्वच राजकीय पक्षांची एकमेकांसोबत मोठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, यंदा भाजपकडून हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या कलाकारांना तिकीट देण्यात आले होते. यात अभिनेत्री कंगना राणावत, हेमा मालिनी, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, रवी किशन यांची नावे आहेत. हेमा मालिनी या मथुरेतून निवडणूक लढत होत्या. सध्या त्या २ लाख मतांनी आघाडीवर आहेत.
भारतातील काही ऐतिहासिक पर्वतीय रेल्वेपैकी एक असलेल्या नेरळ-माथेरान रेल्वेने १९०७ मध्ये स्टीम इंजिनद्वारे चालवलेल्या पहिल्या टॉय ट्रेन सेवेने गौरवशाली ११६ वर्षे पूर्ण केली आहेत. या ट्रेनचा इतिहास पाहता डिझेलवर चालणाऱ्या इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा लूक देऊन या नॅरो गेज रेल्वेच्या गौरवशाली भूतकाळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य रेल्वे सज्ज झाली आहे.
"भाजपप्रणित एनडीएला लोकसभेत ४०० जागा पाहिजेत कारण अयोध्येनंतर आता काशी आणि मथुरेत भव्य मंदिर बांधायचे आहे." असे वक्तव्य आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केले आहे. सरमा दिल्लीतील लक्ष्मी नगरमध्ये पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हर्ष मल्होत्रा यांच्या निवडणुकीच्या रॅलीला संबोधित करत होते, तेव्हा त्यांनी भाजपप्रणित एनडीएला ४०० जागा का पाहिजेत? याचं उत्तर दिलं
मुंबई आणि पुणेमध्ये उन्हाचा तडाखा वाढत असतानाच मुंबई, पुणे आणि नजिकच्या परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. ११७ वर्षांपूर्वी सुरू झालेली नेरळ-माथेरान टॉय ट्रेन ही भारतातील ऐतिहासिक पर्वतीय रेल्वे सेवांपैकी एक आहे. मध्य रेल्वे नेरळ ते माथेरानपर्यंतच्या पर्वतरांगांना प्रदक्षिणा घालणाऱ्या अरुंद गेज मार्गावर टॉय ट्रेन सेवा चालवते त्यात अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवेचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील मतदान दि. १९ एप्रिल २०२४ रोजी सुरु झाले. या टप्प्यात एकूण १०२ जागांसाठी मतदान होत आहे. दरम्यान पश्चिम बंगालमधील माथाभंगा येथे निवडणूकदरम्यान कार्यरत असणाऱ्या सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आढावा घेतला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. या जवानाचा बाथरूममध्ये पडल्याने डोक्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
रशियामधून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने सोशल मीडियाच्या आहारी जाणे कसे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते, याचा नुकताच प्रत्यय आला. ४४ वर्षीय रशियन इन्फ्ल्युएन्सर मॅक्सिम ल्युटयी याने चक्क आपल्या लहान बाळाला उपाशी ठेवले. सूर्यप्रकाश हाच त्याचा आहार म्हणून अन्नपाण्याचा कणही त्या बाळाच्या पोटात जाऊ दिला नाही. बाळाच्या आईलाही स्तनपानापासून रोखले. अखेर त्या बाळाचा कुपोषण, डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवला आणि परिणामी बाळाचे वडील आणि आईदेखील आज गजाआड आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, सोशल मीडियावरील प्रसिद्धीची भूक आ
‘रामकृष्ण मठ आणि मिशन’चे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराज यांचे मंगळवार, दि. २६ मार्च रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रामकृष्ण मिशन’ आणि स्वामी स्मरणानंद यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाकडे ‘रावण’ या भूमिकेतूनच बघितलेले दिसते आणि अतिशय सावध राहून त्या संकटांचा मुकाबला केला. यासोबतच श्रीरामांनी वालीचा वध करून, किष्किंधेचे राज्य त्याचा भाऊ सुग्रीवाला दिले, तर रावणाचे राज्य त्याचा भाऊ बिभीषणाला दिले. कंस वधानंतर भगवान श्रीकृष्णांनी मथुरेचे राज्य त्याचे वडील उग्रसेन यांना दिले. ही दुसर्या राज्याप्रति व तेथील जनसमूहाप्रति व्यक्त केलेली व स्वीकारलेली भावना यावर आज आपण सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.
अयोध्येप्रमाणे लवकरच मथुरेतही श्रीकृष्ण विराजमान होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी पुणे येथे रविवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सगळ्या गोष्टी कायदेशीररित्या होत आहेत, असेही ते म्हणाले आहेत.
कोण संजय राऊत? कोण आहेत ते? फार मोठे नेते आहेत का? असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांना चिमटा काढला आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
आगामी काळात भारताला विकसित देश बनवण्यात तीर्थक्षेत्राच्या अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा असेल. मंदिरांबद्दल असे म्हटले जाते की, ते स्थानिक रोजगार देतात; परंतु विकासाचे चाक फिरवण्याचीही क्षमता मंदिरांमध्ये असल्याचे सिद्ध होत आहे. आगामी काळात भारताला विकसित देश बनवण्यात तीर्थक्षेत्राच्या अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा असेल. मंदिरांबद्दल असे म्हटले जाते की, ते स्थानिक रोजगार देतात; परंतु विकासाचे चाक फिरवण्याचीही क्षमता मंदिरांमध्ये असल्याचे सिद्ध होत आहे.
मथुरेतील श्री कृष्णजन्मभूमीच्या जागी असलेले मंदिर उद्ध्वस्त केल्यानंतर मुघल शासक औरंगजेबाने तेथे शाही ईदगाहची इमारत बांधली होती. अशी माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) ने ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे दिली आहे. माहिती अधिकारांतर्गंत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, एएसआयने ही माहिती दिली.
इरफान हबीब आणि मंडळींनी इतिहासाचे अभ्यासक्रम, पुस्तके, अकादमिक विश्व यांमध्येही आपले विकृत विचार पेरले. परिणामी, हिंदूंच्या इतिहासाबद्दल न्यूनगंड आणि संताप मनात असलेल्या किमान दोन पिढ्या या मंडळींनी तयार केल्या. मात्र, आता ‘कालचक्र’ बदलले असून, हिंदू समाज इतिहासाच्या नावे चाललेल्या बदमाशीस उधळून टाकण्यास सज्ज झाला आहे!
अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या दिवशी रामजन्मभूमी स्थीत राममंदीरात प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्ताने आज तक या वृत्तवाहीनीशी बोलताना योगगुरू बाबा रामदेव यांनी अयोध्येत न्यायालयाचा निर्णय आला आहे, परंतु आता मुस्लिमांनी काशी विश्वनाथ आणि मथुरा जन्मभूमीचा वाद स्वेच्छेने संपवण्याचा विचार केला पाहिजे. अस म्हटल आहे.
‘ज्ञानवापी’साठी रस्त्यावर उतरून लढा देण्याचा इशारा नुकताच धर्मांधांनी दिला. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येत चुकीचा निर्णय दिला, असे म्हणत देशातील न्यायव्यवस्थेवरही यांचा विश्वास नाही, हेच या धर्मांधांनी पुनश्च सिद्ध केले आहे.
वादग्रस्त विधानांसाठी कुप्रसिद्ध मौलाना तौकीर रजा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. तौकीर रजा यांनी ज्ञानवापीसाठी रस्त्यावर उतरून लढण्याची घोषणा केली आहे. मथुरा आणि काशीच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, कोणी कितीही सर्वेक्षण केले तरी मी आता कोणतीही मशीद देण्यास तयार नाही. राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अप्रामाणिक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तौकीर यांनी दि.१८ डिसेंबर २०२३ रोजी दिल्लीत हे विधान केले.
मथुरेतील वादग्रस्त शाही ईदगाह मशिदीच्या परिसराचे न्यायालयीन सर्वेक्षण करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला आहे.
मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमीवर औरंग्याने जी मशीद उभारली होती, तिचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचा मार्ग मोकळा झाला. काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा अहवाल येण्यापूर्वीच, श्रीकृष्ण जन्मभूमीच्या सर्वेक्षणाला न्यायालयाने परवानगी दिली. पुढील महिन्यात श्रीराम जन्मभूमीवरील भव्यदिव्य श्रीराम मंदिराचे लोकार्पण होत असतानाच, न्यायालयाने दिलेला हा निकाल निव्वळ योगायोग नाहीच!
मथुरेच्या शाही इदगाह मशिदीच्या मुद्द्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आला आहे. मथुरेच्या शाही इदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाला न्यायालयाने मंजुरी दिली आहे. एएसआय सर्वेक्षणाची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमीला लागून असलेल्या मशिदीचे वकिलाकडून सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये 18 वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. अलाहाबाद उच्च न्यायालयात गुरुवारी (१४ डिसेंबर) या प्रकरणाची एकत्रित सुनावणी झाली.
गणितज्ज्ञ, सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकी जपणार्या त्याचबरोबर देश-विदेशात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणार्या डॉ. निता पाटील यांनी संघर्षावर मात करीत यशोशिखर गाठले त्यांच्याविषयी...
"सनातन कधी संपणार नाही, तो सर्वत्र राहतो. तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. सनातनच्या आधारे जग चालते. सनातनचा नाश करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे."; असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी हरियाणा येथे केले. गुरुवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी रोहतकमधील बाबा मस्तनाथ मठात ब्रह्मलिन महंत चाँदनाथ योगी यांच्या स्मरणार्थ शंखढाल आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान मंचावर उत्तर प्रदेशचे मुख्यमं
"महिलांनी स्वतःचे संरक्षण करण्याकरिता समर्थ असले पाहिजे आणि त्यांनी स्व:संरक्षणासाठी काहीतरी केले पाहिजे" हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी १०० वर्षा पुर्वी मांडलेले विचार आजही किती लागु होत आहे ह्याची प्रचीती आपल्याला रोज वृत्तपत्रातून येणाऱ्या बातम्यांमधून येईलच. सावरकरांच्या याच विचारावर स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेने महिलांसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षण वर्ग चालू केला आहे. महिलांना स्वतःचे संरक्षण स्वतः करता यावे या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात दि. ३० सप्टेंबर रोजी डोंबिवली शहरात झाली.
गेल्या काही दिवसापासून देशात सनातन विरोधी वक्तव्य केली जात आहे. अशातच आता सीपीआय राज्य सचिव मथुरासन यांनी पॅरी कॉर्नर चेन्नई येथील कॅडर बैठकीत गणपतीबद्दल वादग्रस्त विधान केलं.
काशी आणि अयोध्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकार मथुरेला नवसंजीवनी देण्यात व्यस्त आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची मथुरामध्ये ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून भव्य कॉरिडॉर बांधण्याची योजना आहे. ब्रज तीर्थ विकास परिषदेच्या बैठकीत आता मथुरेतही भव्य कॉरिडॉर बनवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासंबंधीचा अहवाल मुख्यमंत्री योगी यांच्यासमोर मांडण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसमोर सादर केलेल्या अहवालात मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पात काही सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या असून, सुधारणा झाल्यानंतर ही संपूर्
मल्याळम अभिनेते आणि दिग्दर्शक जॉय मॅथ्यू यांचा सोमवारी भीषण अपघात झाला. केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात त्यांच्या कारचा अपघात झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंडलमकुन्नू येथील चावक्कड-पोन्नानी महामार्गावर जॉय मॅथ्यू यांच्या कारची एका व्हॅनला धडक बसल्याने अपघात झाला असून यात मॅथ्यू आणि व्हॅनच्या चालक जखमी झाले आहेत.
बांके बिहारी जी महाराज मंदिराची जमीन कब्रस्तानच्या नावावर करण्याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने तहसीलदारांना जाब विचारला आहे. मथुरा जिल्ह्यातील छटा तहसीलच्या तहसीलदारांनाही प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ ऑगस्ट रोजी होणार आहे.
मुंबईसह राज्यातील पाच जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर, नाशिक, यवतमाळ आणि चंद्रपूर या पाच जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यामुळे मुंबईसह पाच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दुपारनंतर मुंबईत पावसाचा जोर वाढेल असाही अंदाज आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच याकाळात मच्छिमारांनी
नाशिकमध्ये देव, धर्म, देश आणि समाजाच्या उन्नतीसाठी अखंड सेवा आणि जागृती करणारे स्वामी श्रीकंठानंद म्हणजेच कर्मयोगी संन्याशी. त्यांच्या विचारकार्याचा थोडक्यात घेतलेला मागोवा...
पावसाळ्यात धरणात व नदीत बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडत असतानाच आता धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाला सर्पाने दंश केल्याने त्याचा मृत्यू होण्याची घटना घडली आहे. चिपळूण येथे मित्रांसोबत आपल्या गावाकडे सहलीसाठी आलेल्या मुंबई-घाटकोपर येथील एका व्यक्तीला कळवंडे धरणात आंघोळ करताना पाण्यातच तीनवेळा सर्पदंश झाला.
आग्रा : मथुरेच्या केशवदेव मंदिरातील मूर्ती आग्राच्या शाही जामा मशिदीच्या पायर्यात गाडल्या गेल्या असल्याचा दावा ‘श्री कृष्णजन्मभूमी संरक्षित सेवा ट्रस्ट’चे संरक्षक कथावाचक देवकीनंदन महाराज यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने स्वीकारल्याने येत्या काळात येथील परिस्थिती स्पष्ट होऊन सत्य उलगडेल, असे म्हटले जात आहे.
नेपाळचे माजी सरन्यायाधीश गोपाल परांजली यांनी भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, भारत हिंदू राष्ट्र झाल्याचा संपूर्ण जगावर सकारात्मक परिणाम होईल. ही माहिती परांजली यांनी १ मे रोजी मथूरा येथे दिली.वास्तविक, नेपाळचे माजी सरन्यायाधीश गोपाल हे शिष्टमंडळासोबत मथुरा येथील गोवर्धन येथील मंदिरांना भेट देण्यासाठी पोहोचले होते. या शिष्टमंडळात त्यांच्यासोबत पशुपतीनाथ विकास कोष काठमांडूचे प्रमुख सदस्य आणि संहिता लेखक अर्जुन प्रसाद वास्तोला आणि इतर १० लोक होते.
थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांची आज पुण्यतिथी. रामानुजन आणि त्यांचे गणिताचे वेड, त्यांनी मांडलेले गणितीय सिद्धांत हे अगदी सुविख्यात. पण, रामानुजन यांच्यासारखेच गणितशास्त्र, खगोलविज्ञान, ज्योतिषशास्त्र यांसारख्या भारतीय शास्त्रांमध्ये महनीय व्यक्तींनी दिलेले योगदान हे कायमच जागतिक पातळीवर मात्र उपेक्षित राहिले. तेव्हा,आज रामानुजन यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्राचीन भारतीय ज्योतिर्गणित-ज्योतिषशास्त्राच्या परंपरेचा आढावा घेणारा हा लेख...
मुंबई : विविध रेल्वे यार्डमध्ये माथाडी बोर्डात नोंदणी असलेले कामगार मालाची चढ-उतार करतात, या कामगारांना पाणी, शेड, शौचालय, सुसज्ज विश्रांतीगृह, वीज आदी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. विविध रेल्वे यार्डामध्ये या सुविधा देण्यासंदर्भात तातडीने क्रियाशील आराखडा सादर करावा. माथाडी कामगारांचे प्रलंबित वेतन तातडीने वितरीत करण्याच्या सूचना कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केल्या.
रामकृष्ण मठ आणि मिशनचे उपाध्यक्ष स्वामी प्रभानंद यांचं दि.१ एप्रिल रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास सेवा प्रतिष्ठान, कोलकाता येथे निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते आजारी होते.स्वामी प्रभानंदांचे पार्थिवावर दि. २ एप्रिलला रात्री ८ वाजेपर्यत बेलूर मठात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. स्वामी प्रभानंद यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया रात्री ९ वाजता सुरू होणार ,असे मिशनने म्हटले आहे.स्वामी प्रभानंद यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९३१ रोजी अखौरा येथे झाला.
नाटकाचा उपयोग मुलांना-मोठ्यांना रोजच्या आयुष्यातही होतो. नाटक एक ‘थेरपी’ म्हणून वापरता येते आणि हाच उद्देश घेऊन १२ वर्षांपूर्वी नाट्यशास्त्रात मुंबई विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतलेल्या संकेत ओक यांनी सहकलाकारांच्या साहाय्याने ‘वेध अॅक्टिंग अकॅडमी’ची सुरुवात केली. वयवर्ष पाचपासून ५० पर्यंतच्या शिकण्याची आवड असणार्यांना नाटकाच्या तालमीत तयार केले जाते. मुलांना अभिनयाचे धडे देणार्या ‘वेध अॅक्टिंग अकॅडमी’ने यंदा १२ वर्षे म्हणजेच एक तप पूर्ण केले आहे. यानिमित्ताने संस्थेच्या कार्याचा घेतलेला आढावा.
मथुरेतील कृष्णजन्मभूमी - शाही इदगाह मशीद वादाशी संबंधित खटला सत्र कोर्टाकडून उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने सहमती दर्शविली आहे.
नवी दिल्ली : भगवान श्रीकृष्णांचे जन्मस्थान आणि शाही मशिद इदगाह प्रकरणी दखल आठ याचिकांवर मथुरा दिवाणी न्यायालयामध्ये (वरिष्ठ स्तर) ५ आणि १५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात दारू आणि गांजा विक्री करणारी तब्बल ३७ दुकाने बंद केली आहेत.
प्रश्न काशी, मथुरा, ताजमहाल, कुतूबमिनार एवढ्यापुरताच मर्यादित नाही, प्रश्न कोट्यवधींचे जे मनुष्यधन अरबी संस्कृतीत आणि इराणी संस्कृतीत गेले आहे, त्यांना भारतीय संस्कृतीत आणण्याचा आहे. अयोध्या हे त्याचे पहिले पाऊल होते.
‘बाबा मिल गए’ या तीन अक्षरी मंत्रामुळे देशभरातील हिंदू समाज आज नव्या ऊर्जेने आपला हक्क मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा उन्माद नसून आपला हक्क प्राप्त करण्याची ऊर्मी आहे. सनातन हिंदू धर्मास नष्ट करण्याचे कितीही प्रयत्न झाले, तरीही हा समाज हार मानत नाही. योग्य वेळेची वाट पाहतो आणि ती वेळ येताच आपला हक्क मिळविण्यासाठी तो जीवापाड प्रयत्न करतो आणि यश मिळवतो. त्यामुळे काशीचा हा लढा हिंदू समाजासाठी पुढील अनेक लढ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी ठरणार आहे, यात कोणतीही शंका नाही.