Kerala Firm Viral Video : एका खाजगी कंपनीतील बॅासने कर्मचाऱ्यांसोबत अमानुष वागणूक केल्याचा संतापजनक प्रकार केरळमधून समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दोरीने बांधलेल्या गळ्यात पट्टा लावलेल्या कुत्र्यांप्रमाणे रांगायला लावल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असून संबंधित बॉसवर कडक कारवाईची मागणी होत आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कामगार मंत्रालयाने याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता हा कथित व्हिडिओ हा ब
Read More
Orange Festival महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ संकल्पने अंतर्गत विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थ वगळून शेतक-यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा उद्देश या महोत्सवाच्या आयोजनमागे आहे.
मुंबई : राज्यातील सोयाबीन ( Soybean ) उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास दिनांक ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली.
बिहारमधील मुझफ्फरपूर येथे तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. तब्बल २०० मुलींना नोकरीचे आमिष दाखवत अनेक महिने ओलीस ठेवल्याचेही निष्पन्न झाले आहे.
‘केस न्यू हॉलंडच्या रूरल मार्केटिंग असोसिएशन ऑफ इंडिया’ (आरएमएआय) च्या अध्यक्षपदी पुनित विद्यार्थी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘आरएमएआय’च्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली. त्यात पुनित विद्यार्थी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून ते मावळते अध्यक्ष विश्वंभर चक्रवर्ती यांच्याकडून कार्यभार स्वीकारतील.
गुगल ही तंत्रज्ञानातील सर्वात मोठी कंपनी असून मोबाईल फोन्सपासून ते अगदी लॅपटॉपपर्यंत युझर्सना काही सर्च करावयाचे असेल तर गुगल उपयुक्त ठरतं. तर याचं गुगलच काम नेमकं कशाप्रकारे चालतं, याविषयी प्रत्येकाच्या मनात नेहमीच एक कुतूहल असतं.
काही ब्रँड जगात उत्क्रांती करून जगाला हेवा वाटावा असा मार्ग सुचवत असतात.ब्रँडिग विश्व बारकाईने अभ्यासले तर एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे ' इंटिग्रेटेड अप्रोच). एका ठिकाणी प्रेक्षकांना ' लार्जर दॅन लाईफ' अनुभव व दुसरीकडे उपयुक्तता.या दोन्ही गोष्टींचा विचार करून उत्पादक आपले उत्पादन बनवतो.ब्रँड इमेज ही एक दिवसाची माया नाही.ग्राहकांच्या मनात स्थान,व चिन्ह घोळत राहणे हे कुठल्याही ब्रँडच्या यशाचे द्योतक आहे.
अल्पावधीत मार्केटिंग क्षेत्रात नाव कमावणार्या आणि अनेकविध उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणार्या लघु उद्योजिका प्रिती दूधमांडे- निवर्गी यांचा हा जीवनप्रवास...
घरगुती गॅसच्या किंमती २०० रुपये कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता व्यवसायिक ( कर्मशिअल) सिलेंडरच्या किंमतीत तब्बल १५८ रूपयांनी किंमत Oil Marketing Companies ने कमी केल्या आहेत. १९ किलोच्या सिलेंडरची किंमत १५८ ने कमी झाल्याने त्याचा फायदा अन्नपदार्थ, व इतर निगडित व्यवसायिकांना होऊ शकतो. आजपासून ही दर सवलत लागू झाली आहे.
गेली १७ वर्षे राधिका जैतपाळ नृत्यगुरु सोनिया परचुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्याचे धडे गिरवत आहेत. परचुरे यांच्या नृत्य क्लासेसमध्येच शिकवतानाच, सोनिया यांची केदार जोशी यांच्याशी ओळख झाली. केदार हे ‘डिजिटल मार्केटिंग’ कंपनीचे उद्योजक. मग काय, दोघांनी एकत्र देत घुंगरांचे उत्पादन करण्याचे ठरवले आणि ‘धा.इन’ हे स्टार्टअप सुरु केले. अशा या अनोख्या स्टार्टअपविषयी केदार जोशी आणि राधिका जैतपाळ यांच्याशी केलेली ही खास बातचित...
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या भरतीचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वखार महामंडळातील ३०२ पदांची भरतीप्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. या भरतीप्रक्रियेतून नवे ३०० हून अधिक कर्मचारी भरण्यात येणार आहेत. दरम्यान, राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. ते महामंडळाच्या ६६व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
डोंबिवली : डोंबिवली ब्राह्मण उद्योजक व पुणे येथील व्यावसायिकांसाठी काम करणारी सुप्रसिद्ध संस्था 'दे आसरा' यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली मध्ये प्रथमच उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा दिनांक 21 एप्रिल 2023, माधवाश्रम हॉल, रोटरी शाळेजवळ, मानपाडा रोड, डोंबिवली पुर्व येथे घेण्यात येणार आहे.
बांगलादेशच्या निर्मितीत भारताची महत्त्वाची भूमिका होती. एवढेच नाही, तर बांगलादेशला मान्यता देणारा पहिला देशही भारतच होता. डिसेंबर १९७१ साली स्वतंत्र झाल्यानंतर बांगलादेशने भारतासोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कोणताही देश असो तो भावनेपेक्षा स्वहिताला अधिक प्राधान्य देत असतो. बांगलादेश आपल्या फायद्यासाठी भारतासोबत चीनसोबतही जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर बांगलादेश आणि भारताचे संबंध बिघडले, अशा बातम्या पेरूनही त्याचा काहीही परिणाम होत नाही. दरम्यान
नुकतीच केंद्र सरकारने सोशल मीडियावर उत्पादन अथवा सेवांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जाहिरातबाजी करणार्या ‘इन्फ्ल्युएन्सर्स’, सेलिब्रिटींसाठी नवीन नियमावली जारी केली. तेव्हा, नेमक्या या नियमावलीची गरज काय होती आणि अशा लपवाछपवीतून होणार्या ऑनलाईन कमवाकमवीला कसा चाप बसेल, त्याचे आकलन...
देशात न्यायाची सुलभता महत्वाची – पंतप्रधान नरेंद्र मोदी
आपल्या सर्वांनाच शेतीची एक सुप्त आवड असते. पण, बरेचदा ती पूर्ण होत नाही. पण, बरेचदा आपल्या शहरी जीवनशैलीमुळे आपल्याला या आवडीनिवडींना मुरड घालावी लागते. परंतु, आपल्या वेळेनुसार, आपल्या आवडीनुसार, परवडेल अशा दरात आपल्याला ही आपली आवड जोपासण्याची संधी मिळाली तर आपल्या सर्वांनाच नक्की आवडेल. अशीच संधी ‘स्टार्टअप’च्या माध्यमातून उपलब्ध करून देणार्या सूर्या पुजारी यांचा हा उद्यमप्रवास...
आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात कुठलाही व्यवसाय हा तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यातच व्यवसाय यशस्वी करायचा असेल, तर स्वबळावर काम करणे तसे क्रमप्राप्तच.
शहाबुद्दीन याकुब कुरेशी या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माजी आयुक्तांनी “मुस्लीम महिलांनी ‘हिजाब’ परिधान करायचा की नाही, हे मौलवी ठरवतील, न्यायाधीश नव्हे,” असे एका मुलाखतीदरम्यान केलेले विधान या समाजातील सुशिक्षितांचेही विचार धर्मांधतेने किती बरबटलेले आहेत, हेच अधोरेखित करतात. पण, कुरेशीसारख्यांनी ध्यानात घ्यावे की, या देशात कायदा संविधानाचाच चालतो, मौलवींचा नाही!
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या केशव सृष्टी, भाईंदर येथील प्रशिक्षण व संशोधन संस्थेसाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. यात प्रशासन प्रमुख, कार्यक्रम अधिकारी, मार्केटींग ऑफिसर, संशोधन प्रमुख आदी पदांसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत.
सध्या वा सद्यस्थितीत सर्वच लघु उद्योग माहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करू शकणार नसले, तरी त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.
एका बहुराष्ट्रीय कंपनीमधील अधिकारी पदाची नोकरी सोडली आणि व्यवसायाकडे वळला. पुढे काय होईल माहीत नव्हतं. मात्र, त्याने उडी घेतली. आज एक विपणन सल्लागार म्हणून ते नावारुपास आले आहेत. ययाती विंचुरकर हे त्यांचं नाव.
भारत-चीन सीमेवर जवानांशी झालेल्या झटापटीत २० जवान हुतात्मा झाले. ऐन कोरोना संकट असताना शेजारील विस्तारवादी चीनविरोधात एक संतापाची भावना प्रत्येक भारतीयांच्या मनात आली. परिणामी २०२० या वर्षात चीनी अॅप्सची भारतीय बाजारपेठेतील हिस्सेदारी घटल्याचे निरिक्षण नोंदवण्यात आले आहे. तर नव्या अॅप इन्स्टॉलेशनचा विचार केला तर भारतीय बनावटीच्या अॅप्सचा वापर वाढल्याची आकडेवारी आहे.
व्यवसाय-ग्राहकांच्या गरजांनुरूप जाहिरात संकल्पनांची कल्पक मांडणी करण्यासाठी, जाहिरात कंपन्या परंपरागतरीत्या इतरांवर प्रामुख्याने अवलंबून असत. आता मात्र बदलत्या गरजा, स्पर्धात्मक काळानुरूप आपल्याच कर्मचार्यांच्या कल्पनाशक्ती आणि आकलनशक्तीला कसे प्रोत्साहन देत आहेत, त्याचाच हा कानोसा...
मराठी माणूस आज उद्योगक्षेत्रात तसुभरही मागे नाही. तोही इतरांप्रमाणे आपल्या अंगभूत कलागुणांच्या माध्यमातून, जिद्दीतून शून्यातून विश्व निर्माण करु शकतो. याचा हमखास प्रत्यय ‘मॅस्कॉट क्रिएशन्स’ या महाराष्ट्रातील आघाडीच्या डिजिटल मार्केटिंग कंपनीचे संस्थापक अतुल गुरव यांच्या कारकिर्दीवर नजर टाकला असता येतो.
आवडत्या कलाकाराचा फोन आल्याने प्रेक्षकही होतायत खुश; मार्केटिंगची भन्नाट आयडिया!
कोरोनानंतरचं औद्योगिक जग वेगळं असणार आहे. याची जाणीव झाल्यानेच दरपेल यांनी डिजिटल मीडियाकडे आपलं लक्ष वळवलेलं आहे. मार्केटिंग क्षेत्रातील सर्व सेवा एकाच छत्राखाली देणारी संस्था म्हणून ‘माईंड डिझाईन’ची आज स्वतंत्र ओळख आहे.
बाईक रायडिंग, बाईक स्टंट हे सगळे पुरुषी खेळ, ते महिलांच्या कुवतीबाहेरचेच, हा पूर्वग्रह मोडीत काढत वार्याच्या वेगावर बाईकसवारी करणार्या साहसी विशाखा फुलसुंगे हिच्याविषयी...
डॉ. संतोष कामेरकर हे उद्योजकीय प्रशिक्षण क्षेत्रात गेली ३१ वर्षे कार्यरत आहेत. प्रशिक्षण देताना अनेकजण तुमचे पुस्तक आहे का, अशी विचारणा करायचे. यातूनच तीन पुस्तके साकारली. मला मोठ्ठे व्हायचे आहे- सात आवृत्त्यांचा खप, मला श्रीमंत व्हायचे आहे- तब्बल १ लाख, २० हजार प्रतींची विक्री, यशाची गुरुकिल्ली- ८० हजार प्रतींची विक्री, उद्योजक व्हा, श्रीमंत व्हा- २ हजार पुस्तकांची विक्री अशा विक्रमी पुस्तकांसह १४ पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत.
आज संदीप मोरे यांच्या क्लासेसच्या परिवारात २४ शिक्षक कार्यरत आहेत. शेकडो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरू आहे. आजही मुले इंजिनिअर, डॉक्टर, वकील, उद्योजक, इंटिरिअर डिझाईनर म्हणून आपापल्या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत.
ब्लॉगिंग म्हणजे नेमके काय? आणि ब्लॉगिंग कसे सुरू करावे? याबाबत आपण गेल्या आठवड्यात माहिती करुन घेतली. आज ब्लॉगिंगच्या माध्यमातून आपण पैसे कसे कमवू शकतो, याबद्दल थोडेसे जाणून घेऊया.
डिजिटल मार्केटिंगच्या विश्वात देखील कालानुरूप अनेक बदल घडत आहेत. डिजिटल विश्वात वावरणाऱ्या सर्वांनी याबद्दल जाणून घेतले पाहिजे, तसेच त्यानुसार क्रम ठरवून या बदलांची दखल घेतली पाहिजे.