साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आयोजित "एकविसावा साहित्य जल्लोष" ज्येष्ठ साहित्यिक यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने हा कार्यक्रम वसई - विरार शहर महानगरपालिका आणि संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय यांच्या सहकार्याने शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता वसई पश्चिम येथील संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात संपन्न झाला.
Read More
साहित्य जल्लोष प्रतिष्ठान, वसई विरार शहर महानगरपालिका आणि गोन्सालो गार्सिया महाविद्यालय,वसई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकविसाव्या साहित्य जल्लोषच्या पूर्वसंध्येला शुक्रवार दि. ६ ॲाक्टोबर २०२३ रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची स्वरचित काव्यस्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये पालघर जिल्ह्यातील बोर्डी, डहाणू , चिंचणी, बोईसर, पालघर, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, सफाळे तसेच वसई तालुक्यांतील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
"स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत आयोजित “एक तारीख एक तास" या मोहिमेत रविवारी १ ऑक्टोबर रोजी वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात एकूण ९७ ठिकाणी स्वच्छता मोहिम घेण्यात आली. या अभियान अंतर्गत जीवदानी पायथा, कातकरी पाडा, मानवेल पाडा रोड, विराट नगर/ विरार बस डेपो, विरार महानगर पालिका (विरार पूर्व), अंबाडी रोड वसई वेस्ट येथे पथनाट्य आयोजित करण्यात आले. सदर मोहिमेचे उद्घाटन मा. खासदार राजेंद्रजी गावित, मा. प्रथम महापौर राजीवजी पाटील यांच्या हस्ते झाले.
वसई-विरार शहर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. वसई-विरार शहर महानगरपालिकेने “लेखा अधिकारी/सहाय्यक लेखाधिकारी” या पदांसाठी रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज सबमिट करावयाचे आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून समेळपाडा या ठिकाणी असलेल्या वैकुंठभूमीची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.