छत्रपती शिवाजी महाराज हे असे राजा होते ज्यांनी भारताची सागरी शक्ती आणि क्षमता समजून घेतली होती. बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान जागतिक सागरी शिखर परिषदेच्या समारोप प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
Read More
महाराष्ट्र राज्याने नुकतेच महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र सागरी विकास धोरण-2023 जाहीर केले आहे. या धोरणामध्ये सागरी क्षेत्राचे जवळपास सर्व पैलू समाविष्ट आहेत. उद्योगासाठी अतिशय चांगले वातावरण महाराष्ट्रात आहे. राज्यात सागरी क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आवश्यक ते सर्व सहकार्य व पाठबळ देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
दि. २ मार्च रोजी आयोजित भारताच्या सागरी शिखर परिषदेत तीन लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या घोषणा झाल्या, ज्यामध्ये ४०० सामंजस्य करारांवर स्वाक्षर्या करण्यात आल्या. २ मार्च ते ४ मार्च या शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. तेव्हा, या परिषदेतील ठळक मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा.