ठाणे : शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार प्रताप सरनाईक यांची परिवहन मंत्री पदी वर्णी लागल्यानंतरना. सरनाईक पहिल्याच दिवशी ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले पाहायला मिळाले. प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील खोपट एसटी डेपोत ( ST Administration ) रविवारी (दि.२२ डिसे.) पाहणी दौरा करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान डेपोतील दुरावस्था,अस्वच्छता पाहून नाराजी व्यक्त केली, तसेच पहिल्याच दिवशी कारवाई टाळत असल्याचे स्पष्ट करून एक महिन्याचा अल्टीमेटम देताना चुकीला क्षमा नाही असा इशाराही प्रशासनाला दिला आहे.
Read More
शिंदे गटाच्या इशाऱ्यानंतर Uddhav Thackeray यांची खबरदारी..
राज्यात सध्या शिवसेना आमदार अपात्रतेचा मुद्दा चर्चेत आहे. १० जानेवारी रोजी कोणालाही अपात्र न करता खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी निकाल दिला होता. या निर्णयाविरोधात आता शिंदे गटाने न्यायालयात धाव घेतली आहे. उबाठा गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिंदे गट (शिवसेना) यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चांना राज्याच्या राजकारणात उधाण आले आहे. दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत भाष्य करताना म्हटले की, शिंदे गटासोबत युती करायची की नाही याबाबतचा निर्णय राज ठाकरे घेतील, असे देशपांडे यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या नाशिक जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शोभा मगर य़ांचे मंगळवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. प्रकृती बरी नसल्यामुळे काही दिवसांपुर्वीच त्यांना उपचारासाठी नाशिकच्या सुधर्म रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची अंत्ययात्रा हिरावाडीतील रेशीमबंध मंगल कार्यालयातून निघेल व पंचवटीतील अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी सुरु असून ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी करण्यात येत आहे. २१ जूनच्या आमदारांच्या बैठकीबाबत सुनील प्रभू यांनी जारी केलेल्या व्हीपवरून शिंदे गटाचे वकील त्यांना प्रश्न विचारत आहेत.
“मुंब्र्यात काही फुसके बार येऊन गेले. पण, ते वाजलेच नाही. नरेश मस्के आणि कार्यकर्त्यांनी एवढे फटाके वाजवले की त्यांना वापस जावं लागलं. ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे.” अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाना साधला आहे.
मुंब्र्यातील शिवसेनेच्या शाखेचा वाद आता न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. मुंब्र्यातील शाखेवरुन उबाठा गट शिवसेनेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. कागदपत्रांची तपासणी करुन उबाठा गट न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
“सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला लक्ष्मणरेषा आखून दिली आहे. त्या चौकटीतच तुम्हाला निर्णय द्यायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला प्रथमदर्शी चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण पुरावे पाहण्याची गरज नाही,” असा युक्तिवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला. अपात्रतेसंबंधी सुनावणीच्या वेळी करण्यात आलेल्या या युक्तीवादामुळे नार्वेकर संतप्त झाले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे ऐकायचे की, स्वत: निर्णय घ्यायचा, असं म्हणत त्यांनी ठाकरे गटाला चांगलेच सुनावले. ठाकर
एकीकडे शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवर सुनावणी सुरु असताना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी राज्य सरकार एका याचिकेतून आरोप केला होता. परंतु, आता हायकोर्टाने हा आरोप फेटाळल्याने शिंदे सरकारला दिलासा मिळाला आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मुंबईच्या शिवाजीपार्क येथे शिवसेनेच्या दसरा मेळव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून यंदा शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या नक्की कोणत्या गटाचा दसरा मेळावा होणार याबाबत चर्चा सुरु होती. अखेर या प्रश्नाचा निकाला लागला असून ठाकरे गटाला मुंबई महापालिकेकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी देण्यात आली आहे.
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आमदार अपात्रतेची सुनावणी लांबणीवर गेली आहे. येत्या ६ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात १६ आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीबाबत विधिमंडळाच्या वतीने दोन्ही गटांना वेळापत्रकाबाबत सूचित करण्यात आले आहे. १३ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत आमदार अपात्रता प्रकरणावर युक्तिवाद केला जाईल, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले. यातच आता शिंदे गटाकडून महिला आरक्षणाच्या वेळी अनुपस्थित राहिलेल्या ठाकरे गटाच्या चार खासदारांना नोटीस दिली असल्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिंदे गटाकडून महिला आरक्षणाच्या वेळी अनुपस्थित राहिलेल्या ठाकरे गटाच्या चार खासदारांना नोटीस देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. २०२४ मध्ये शिंदे गटाची पाटी कोरी राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी आज पार पडली. यावेळी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. याप्रकरणी एकूण ३४ याचिका असून आजच्या सुनावणीनंतर या याचिकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणार्या शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवार, दि. २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या प्रकरणी गुरुवार, दि. १४ सप्टेंबर रोजी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झाली.
राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची अखेर सुनावणी पार पडली असून झालेल्या या पहिल्या सुनावणीत दोन्ही पक्षांचे आमदार स्वतः हजर होते. यावेळी शिवसेना आमदारांनी केलेल्या मागणीनंतर आमदारांना आपली बाजू मांडण्यासाठी आणखी दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांना कागदपत्र सादर करण्यासाठी आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी अवधी मिळाला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीक घडामोडींना वेग आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे उबाठा गटाला सोडून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. नीलम गोऱ्हे या ठाकरे परिवाराच्या अतिशय विश्वासू समजल्या जातात.
राज्यात फडतूस, काडतूस अशी वक्तव्य होत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येतील असं वाटत नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार यांच्या भूमिकेचं भूजबळ यांनी देखील समर्थन केलं आहे. आपण आपल्या देशातील उद्योगपतींचे खच्चीकरण करू नये. आपली बदनामी होता कामा नये असं छगन भूजबळ यांनी म्हटलं आहे.
ऋतुजा लटके : कायदेशीर बाबींचा अभ्यास न करता लटकेंना उमेदवारी जाहीर करून त्यांना लटकवण्याचा डाव कुणी रचला ? हा सवाल विचारला जात आहे.
शिवसेना कोणाची? यावर निवडणूक आयोगाचा निर्णय प्रलंबित असताना, शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही गटांकडून 'धनुष्यबाण आम्हालाच मिळणार.' असा विश्वास व्यक्त केला जातोय. आमच्याकडे बहुमत आहे, त्यामुळे धनुष्यबाण आमचा, असं शिंदेगटाचं म्हणणं आहे. तर आम्ही मूळ शिवसेना आहोत. पक्षाच्या घटनेनुसार धनुष्यबाण आमचाच आहे, असा दावा शिवसेनेचा आहे.
शिवतीर्थ : दसरा मेळावा - 'जोपर्यंत तुम्ही आहेत. तोपर्यंत मी पक्षप्रमुख आहे. मात्र, जर कुणा एकही निष्ठावंत शिवसैनिकाने आक्षेप घेतला तर मी हे शिवसेना प्रमुख पदही मी सोडेन.
रे हट त्याने नाही मीच धक्काबुक्की केली असे म्हणत शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी महाविकास आघाडीला थेट इशारा दिला. ते फक्त ९९-१०६ आहेत आम्ही १६५ आहोत जर असा सामना जुंपला तर काय परिस्थिती येईल अशा शब्दांत भरत गोगावलेंनी सूचक इशारा दिला आहे
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी घेतली जाणार आहे. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाने केलेल्या परस्परविरोधी ५ याचिकांवर सुनावणी होणार आहे
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाहीत. नागपुरातील शिवसेनेचे संपर्क प्रमुख असलेल्या मंगेश काशीकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे
राष्ट्रवादीची धडाडती तोफ म्हणून आणि हिंदू देवी - देवतांची येथेच्छ निंदा नालस्ती करून आंबेडकरी चळवळीत नाव कमावलेल्या सुषमा अंधारेंनी शिंदे गटाला लक्ष्य करत, त्यांनी उद्धव ठाकरेंना धोका देऊन सरकार स्थापन करून काय क्रांतिकारक बदल घडवला? असा सवाल करत आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडवले
पावसात भिजले की सत्ता लोक भावनिक होतात आणि मग सत्ता आणता येते असा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी समज करून दिल्याने आदित्य ठाकरे त्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा वापर करतात
राज्यातील फडणवीस - शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. भाजपकडून आणि शिंदे गटाकडून प्रत्येकी ९ मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली
"शिवसेना हा कौटुंबिक पक्ष आहे आणि उद्धव ठाकरे हेच आमचे कुटुंबप्रमुख आहेत" असे वक्तव्य माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे
उदय सामंत यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा त्याआधी झालेल्या भडकाऊ भाषणांमुळेच झाला असा घणाघाती आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत
आदित्य ठाकरेंनी बोलताना शिवसेनेतील वाचाळवीरांचे अनुकरण करू नये त्याने परिस्थिती अजून चिघळेल असा सल्ला शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी दिला आहे
शिंदे गटातले पाटणचे आमदार शंभूराजे देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. दि ११ जुलै रोजी शंभूराजें देसाईंची कोरोनाची चाचणी केली,
"जे आम्हांला सोडून गेले ज्यांनी आमच्यावर टीका केली त्यांच्या अंगात हिम्मत असेल तर त्यांनी पुन्हा एकदा निवडणूका घ्याव्यात त्यांचा निर्णय जनताच करेल" अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला आव्हान दिले
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाने महाराष्ट्रातल्या मविआ सरकारला अखेरचा धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या गेलेल्या याचिकेत आपल्या गटाने ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचा दावा करण्यात आला आहे
शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर गुवाहाटीला जाण्यापूर्वी अनिकेत सरवणकर यांनी अनेक ट्विट शेअर केले. आपल्या ट्विटमध्ये, अनिकेत यांनी उद्धव ठाकरे गटाची बाजू घेतली. ते म्हणाले 'काही सदस्यांनी पक्ष सोडल्यास पक्ष संपणार नाही.'