( CM Eknath Shinde ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ठाण्यातील परबवाडी शिवसेना शाखा येथून आयटीआय वागळे सर्कल अशी रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आपला उमेदवारीचा अर्ज दाखल करणार असल्याने शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे.
Read More
( Kopri-Pachpakhadi )मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघात सद्यस्थितीत एकूण ३ लाख, ३८ हजार, ३२० मतदार आहेत. मागील २०१९ ची विधानसभा आणि नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक पाहता या मतदार संघात जेमतेम ५० ते ५६ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे २०२४ च्या या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
पाचपाखाडी येथील ठाणे महापालिकेसमोरील सरोवर दर्शन इमारतीमधील (पार्कींग) वाहन तळात उभ्या असलेल्या वाहनांना आग लागली. या आगीत ११ दुचाकी जळून खाक झाल्या तर, तीन कारचेही आगीत नुकसान झाले आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
ठाण्यातील पाचपखाडी भागात गुरुवारी पहाटे अज्ञात इसमांनी नऊ दुचाकी पेटवून दिल्याने खळबळ उडाली.