इस्रायल-‘हमास’च्या संघर्षानंतर भारतविरोधी शक्तींनीही बेटकुळ्या फुगवण्यास सुरुवात केल्याचे दिसते. मग पाकिस्तानी असो वा खलिस्तानी, त्यांनी भारतालाही ‘हमास’सारखा खुनी हल्ला सहन करावा लागेल, अशी फुटकळ धमकी देण्याचे उद्योग केले. म्हणा, अशा धमक्यांना मोदी सरकारने यापूर्वीही कधी भीक घातली नव्हती आणि भविष्यातही हे धमकी देणारे ‘अज्ञातां’च्या हस्ते कधी यमसदनी धाडले जातील, हेही सांगणे अवघडच. पण, म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, तशीच खलिस्तानींची सध्याची गत!
Read More
खलिस्तानवादी तत्त्वांना पंजाब आणि आजूबाजूच्या राज्यात पाठबळ मिळत असल्यानेच ती तत्त्वे असे देशद्रोही कृत्य करण्यास धजावत आहेत. पण, हिमाचल प्रदेश सरकारने तसेच केंद्र सरकारने या फुटीर शक्तींना कसलीही दयामाया दाखविता कामा नये. गुन्हेगारांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना कडक शासन व्हायला हवे!
“मेरा(माझा) काका पन्नू कॅनडात वकील आहे.” तिला पन्नूचे देशद्रोही कृत्य माहिती नव्हते. पण जेव्हा ‘सीख्स फॉर जस्टीस’च्या नावाने पन्नूने केलेल्या देशद्रोही कारवाया समोर आल्या तेव्हा खानकोट ग्रामस्थांनी पन्नूला कडाडून विरोध केला. पन्नूच्या देशद्रोही जाळ्यात गावातला एकही तरूण फसणार नाही, अशी ग्वाही ग्रामस्थांनी दिली. थोडक्यात, देशद्रोही अतिरेकी पन्नू ‘ना घर का ना घाट का’ राहिला.
खलिस्तानी संघटन 'सिख फॉर जस्टीस' चा प्रमुख गुरुपवंत सिंग पन्नूने व्हिडियो केला जारी
महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाच ‘सिख्स फॉर जस्टिस’ने पत्र का लिहावे, याचे उत्तर शोधायचे ठरवले, तर महेश भटच्या मुलाशीच डेव्हिड हेडलीने दोस्ती का केली होती, या प्रश्नात ते सापडेल!
स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी कॅनडातील खलिस्तानवाद्यांनी यंदाच्या नोव्हेंबरमध्ये ‘सार्वमत-२०२०’चे आयोजन केले होते. मात्र, कॅनडा सरकारने खलिस्तानवाद्यांच्या या मोहिमेला आपला पाठिंबा नसल्याचे ठामपणे सांगितले. अर्थात, गेल्या सहा वर्षात नरेंद्र मोदी सरकारने राबवलेल्या परराष्ट्र धोरणामुळेच खलिस्तानवाद्यांना हा दणका बसल्याचे स्पष्ट होते.