( Threat from Mamata Banerjee Muslim minister ) वक्फ सुधारण कायदा मागे न घेतल्यास कोलकात्यात ५० ठिकाणी १० हजारांचा जमाव रस्त्यावर उतरविण्यात येईल, अशी धमकी ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी यांनी शुक्रवारी दिली आहे.
Read More
Mamata Banerjee यांनी पश्चिम बंगालच्या स्कूल सर्व्हिस कमिशन घोटाळ्यासंबंधित नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेशाचा अवमान केला आहे. यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने ममता बॅनर्जींना अवमाननासंदर्भात नोटीस जारी करण्यात आली आहेय ही नोटीस वकील सिद्धार्थ दत्ताकडून स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जारी करण्यात आली आहे.
‘Waqf Amendment Bill’विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी विरोधी पक्षांची होड लागली. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तरी या राजकीय स्पर्धेत कशा मागे राहतील म्हणा! “वक्फ सुधारणा कायदा’ प. बंगालमध्ये लागू होणार नाही, त्यामुळे चिंता करू नका. मी तुमच्यासोबत आहे,” असे सांगून दीदींनीही ‘वक्फ’ची वफादारी केली.
Ram Navami प. बंगाल राज्यातील कोलकातामध्ये रामनवमी (Ram Navami) शोभायात्रेत काही जिहाद्यांनी रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी दगडफेक केल्याचा दावा भाजपने केला. भाजपने दावा केला की, ते शोभायात्रेतून परतत असताना दगडफेक करण्यात आल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे. संबंधित परिस्थिती लक्षात घेऊनही पोलिसांनी दावा फेटाळला आहे.
Ram Navami प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी ४ एप्रिल २०२५ रोजी कोलकातामधील उच्च न्यायालयाने अंजनी पुत्र सेना, या हिंदू संघनेला हावड्यातील राम नवमी मिरवणूक काढण्याची काही दिवसांपासून परवनगी देण्यास पोलिसांनी नकार दिला होता. त्यानंतर हावडा पोलिसांच्या एका अहवालानुसार, हावडा पोलिसांनी सुरूवातीला प्रस्तावित मार्गावर परवानगी नाकरलेली आहे. अंजनी पुत्र सेना या हिंदू संघटनेला हावड्यातील राम नवमी मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यात आली.
Mamata Banerjee प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हिंदूद्वेषाच्या कहाण्या वर्णाव्या त्या किती! कारण, मुख्यमंत्री म्हणून आता तिसरा कार्यकाळ सुरू असलेल्या ममतादीदींनी हिंदूंना प्रारंभीपासूनच गृहीत धरले. आपण हिंदूंशी कसेही वागलो, तरी बंगाली अस्मितेच्या नावाखाली बंगाली हिंदू आपल्या पाठीशीच सदैव उभा राहील, हा दीदींचा भ्रम. म्हणूनच हिंदूंना खिसगणतीतही न मोजणार्या दीदींनी आपले सगळे लक्ष मुख्यत्वे मुस्लीम मतदारांकडे वळवले. बंगालमध्ये मुस्लीम मतपेढीची वाढलेली ताकद हेच त्यामागचे कारण. आज बंगालमध्ये तब्बल
Nitish Kumar and Mamata Banerjee वारंवार पक्षबदलाच्या भूमिका घेऊन मुख्यमंत्रिपदाची खुर्ची टिकवून ठेवणार्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना अखेरीस अशा दलबदलू राजकारणाने नुकसान आपलेच असल्याची उशिरा का होईना उपरती झाली, तर दुसरीकडे ब्रिटनच्या दौर्यावर असलेल्या ममता बॅनर्जींना तिथेही हिंसाचार, भ्रष्टाचार यांसारख्या मुद्द्यांवरुन बंगाली हिंदू समाजाच्या रोषाला सामोेरे जावे लागले. तेव्हा, दोन नेत्यांच्या या दोन वेगळ्या तर्हांचे वर्तमानातील प्रतिबिंब टिपणारा हा लेख...
Mamata Banerjee यांच्या पक्षातील काही लोकांचाही यामध्ये समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. भारत-बांगलादेश सीमेवर आता प.बंगालच्याा धरतीवर तार कंपाऊंड करण्यास विरोध केला जात आहे.
Hindus पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आला. हे मंदिर मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राम ब्लॉक २ मधील कमलापूर गावातील आहे, या हल्ल्याची माहिती भाजप नेते अमित मालवीय यांनी शुक्रवारील १४ मार्च होळीच्या दिवशी सोशल मीडियावर दिली. त्याने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात हिंदू देवी-देवतांच्या मूर्तीची विटंबना केल्याचे दिसून आले आहे.
सांगण्यासारखे काही नसेल, तेव्हा माणूस आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्त्वाच्या कथा सांगतो. राजकारणातही मतदारांच्या रोषापासून सुरक्षित राखण्यासाठी सत्ताधारी नेते प्रादेशिक अस्मिता आणि भाषेचा सोपा मुद्दा उपस्थित करतात. तामिळनाडूच नव्हे, तर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाषेचा मुद्दा राजकारणात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण, ‘दक्षिण विरुद्ध उत्तर’ वगैरे तणाव हे भारतविरोधी ‘सोरोस टूलकिट’चा भाग आहेत, हे आता जनतेला कळून चुकले आहे.
Himanta Biswa Sarma हिंदू धर्माला नष्ट करण्यासाठी औरंगजेब आला होता. मात्र नंतर तोच नष्ट झाला. त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प.बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हिंदूंना संपवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र ते शक्य नाही, शेवटी त्यांचाच नाश होईल, असे प्रतिपादन आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केले आहे. ते कोलकातामधील एका कार्यक्रमात बोलत होते.
West Bengal Education Minister Bratya Basu प.बंगाल राज्यातील कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठात एसएफआय आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांशी संबंधित असलेल्यांनी शिक्षणमंत्री ब्रात्य बसूंवर हल्ला केला. विद्यार्थी संघटनांच्या अनेक दिवसांपासून निवडणुका घेण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून होती. याबाबत आता शनिवारी १ मार्च २०२५ रोजी निदर्शने सुरू करण्यात आली होती आता त्याला हिंसक वळण प्राप्त झाले आहे.
ज्यांचे हात निरनिराळ्या हत्यांच्या रक्तांनी माखलेले आहेत, त्यांनी महाकुभांतील मृत्यूंवर बोलणे हा राजकीय व्यभिचार आहे. ही असली माणसे मृत्यूचे निमित्त बाळगून महाकुंभासारख्या पवित्र परंपरेवर टीका करतात, तेव्हा मस्तकात चीड उठल्याशिवाय राहात नाही. ‘धर्मांध मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान’ नावाच्या पोपटातच या असुरांचा जीव दडलेला आहे.
काँग्रेसचे युवराज राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यातून विस्तवही जात नाही, हे तसे सर्वश्रूत. यापूर्वीही काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये संघर्ष उफाळून आला होताच. पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष प. बंगालमध्ये राहुल गांधींच्या पदयात्रेचा घाट घालणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राहुल गांधी विरुद्ध ममता बॅनर्जी या संघर्षाची ठिणगी पडून, प. बंगालमध्ये राजकीय खेला रंगलेला दिसेल.
महाकुंभमेळ्यामुळे संघटित होत असलेले हिंदू मन लक्षात घेऊन पूर्वश्रमीचे पापक्षालन करण्याच्या हेतूने, गंगासागर मेळाव्याच्या जाहिराती देत हिंदूंसाठी पश्चिम बंगाल सरकार किती कष्ट घेते हे दाखवण्याचा उद्योग ममता बॅनर्जी ( Mamata Government ) यांनी चालवला आहे. मात्र, देशातील समस्त हिंदू संत ‘काय भुललासी वरलिया रंगा’ ही चोखोबांची शिकवण मनात दृढ धरून आहेत.
Bhajan नेते सुवेंदु अधिकारी यांनी आपल्या X ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. प. बंगाल राज्यातील मोदिनीपूर जिल्ह्यातील कांठी शहरामध्ये कट्टरपंथी जमावाने भजन करणाऱ्या वाहनावर हल्ला केला आहे. वक्फ दुरूस्ती विधेयकाला विरोध करणाऱ्या बैठकीदरम्यान ही घटना घडली आहे. सुवेंदू अधिकारी म्हणाले की, कांठी सेंट्रल बसस्थानक परिसरातून एक वाहन जात असताना त्या गाडीत भजन सुरू होते.
‘इंडी’ आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी ( Mamta Banerjee ) यांच्याकडे देण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. ममता बॅनर्जी या अत्यंत महत्त्वाकांक्षी आहेत, हे माहिती असूनही ‘इंडी’ आघाडी टिकवून ठेवायची असेल, तर विरोधकांना अन्य कोणता पर्याय सध्या दिसत नाही. राहुल गांधी यांच्यापेक्षा ममतादीदी आघाडीस बांधून ठेवतील, असे काहींना वाटत आहे.
मुंबई : पश्चिम बंगालचे नगर विकास मंत्री आणि कोलकत्त्याचे महापौर फिरहाद हकीम यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात फिरहाद हकीम यांनी म्हटले की, "अल्लाहची इच्छा असेल तर, एक दिवस मुस्लीम बहुसंख्य असतील." यावरुन ममता बॅनर्जी ( Mamta Banerjee ) सरकारने आपल्या मंत्र्यांना दिलेली सूट दिसून येते. तृणमूल कॉंग्रेस भारताची परिस्थिती बांगलादेशसारखी करु पाहत असल्याचे भाजपने सांगितले. यावर भाजपने आपला विरोध व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर अनेक प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसचा घेराव सुरू केला आहे. सपा, डावे पक्ष आणि राष्ट्रवादीनंतर आता राजदने इंडी ( INDI ) आघाडीच्या नेतृत्वासाठी बैठक घेऊन एकमताने नेता निवडण्याची मागणी केली आहे.
(Mamata Banerjee) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवार, दि. ६ डिसेंबर रोजी बांगलादेशातील अशांततेबाबत चिंता व्यक्त केली आहे. "माफियां"च्या वाढीमुळे आणि "कमकुवत" प्रशासनामुळे बांगलादेश "नेतृत्वहीन" असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बांगलादेशातील तुरुंगात अटकेत असलेल्या ६९ बंगाली मच्छिमारांच्या दुरावस्थेवर बोलताना त्यांनी भारताच्या केंद्र सरकारला हस्तक्षेप करून बांगलादेशमध्ये शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचे पुढचे मोठे लक्ष्य म्हणून प. बंगालची निवड केली आहे. आगामी 2026 सालच्या विधानसभा निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत मिळवण्याचे शाह यांचे लक्ष्य आहे. महिला सुरक्षा, घुसखोरी, भ्रष्टाचार आणि अल्पसंख्याक तुष्टीकरण या मुद्द्यांवर ममता बॅनर्जी यांच्या सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती ते बनवत आहेत.
क्फ सुधारणा विधेयकाविषयीच्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत मंगळवारी राडा झाला. जेपीसीचे सदस्य आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी अश्लील शब्दांचा वापर करून अध्यक्षांच्या दिशेने काचेची बाटली फोडून फेकल्याचे गंभीर कृत्य केले आहे.
RG Kar case रात्रपाळी करू नकोस हे तुम्ही महिलेला सांगू शकत नाही असे म्हणणाऱ्या प.बंगाल सरकारला सर्वोच्च न्यायालयाने झापले आहे. सरकारी महिला डॉक्टरांना रात्री पाळी न ठेवण्याचे निर्देश देणाऱ्या अधिसूचनेवर, त्यांना सवलतीची नव्हे तर सुरक्षेची आवश्यकता आहे. याचपार्श्वभूमीवर कोलकाता आरजी कर वैद्यकीय प्रकरणात ९ ऑगस्ट रोजी डॉक्टरवरील बलात्काराप्रकरणी बंगाल सरकारने ही अधिसूचना जारी केली आहे.
"बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात आणि आपले कर्तव्य पार पाडण्यात पश्चिम बंगाल सरकार अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे वर्तन 'लेडी मॅकबेथ'प्रमाणे असून आपण त्यांचा सार्वजनिक बहिष्कार करू," असा घणाघात प. बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी केला आहे.
कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणाविरोधात आंदोलनकर्त्यांवर ममतादीदींनी पोलिसांना हाताशी घेऊन प्रचंड दडपशाहीच केली. पण, एवढ्यावरच न थांबता, त्यांनी ‘बंगाल पेटले, तर देश पेटेल, पंतप्रधानांची खुर्ची जाईल,’ अशा धमक्याही दिल्या. पण, त्यावरुन कडाडून टीका होताच ममतादीदींचा सूर पालटला. त्यामुळे आता दीदींची अशी ही नि‘र्ममता’ ना बंगाली जनता खपवून घेईल आणि ना केंद्र सरकार!
कोलकात्याच्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार – हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बंगाल पोलिसांच्या निष्काळजीपणावर कठोर शब्दात ताशेरे ओढले. याप्रकरणी पुढील सुनावणी ५ सप्टेंबर रोजी होणार आहे.
Priyanka Hansada Murder पं. बंगालच्या बर्दवान जिल्ह्यातील एका २२ वर्षे युवतीचा गळा घोटून हत्या करण्यात आली. याघटनेमुळे प. बंगाल येथे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मात्र अद्यापही मृत्यूबाबतचा खुलासा करण्यात आलेला नाही. युवतीच्या निकटवर्तीयांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली आहे. युवतीच्या नातेवाईकांनी सांगितले की, ती बंगळुरू येथील एका शॉपिंग मॉलमध्ये काम करत होती. १२ ऑगस्ट रोजी तिने सुट्टी घेत आपल्या घरी आली होती. त्याच सायंकाळी हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
तृणमूल काँग्रेस राज्यसभा खासदार साकेत गोखले यांच्याविरोधात अहमदाबाद विशेष न्यायालयाकडून फौजदारी आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
कोलकाताच्या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर जे अमानवी अत्याचार झाले, ते मन सुन्न करणारेच. बंगालमधील पूर्णपणे ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेची ही दुर्दैवी विद्यार्थिनी बळी पडली आणि नेहमीप्रमाणेच ममता यांनी आरोपींची पाठराखण केली. यावर विरोधक आणि पुरोगामी कंपूतूनही अजिबात निषेधाचे नारे सूर उमटले नाहीत की पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी विरोधकांची रीघ लागली नाही. एकूणच काय तर आजदेश स्वतंत्र असला, तरी बंगाल अजूनही दडपशाहीच्या पारतंत्र्यातच!
बांगलादेशातील हिंसाचारग्रस्तांना आपल्या राज्यात आश्रय देण्याची घोषणा प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतीच केली. त्यावरुन बांगलादेशनेही आता आमच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये ढवळाढवळ करु नका, म्हणून खडे बोल सुनावले आहेत. त्यानिमित्ताने असाच प्रश्न उपस्थित होतो की, प. बंगाल ही ममता बॅनर्जी यांची खासगी मालमत्ता आहे का? परकीय नागरिकांना त्या कशा स्वीकारू शकतात?
गेल्या सात वर्षांत महाराष्ट्राने 24 लाख कामगारांची असंघटित उद्योगांमध्ये भर घातली, असे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने आपल्या अहवालात नमूद केले आहे, तर याच कालावधीत पश्चिम बंगालसारख्या तुष्टीकरणाचे राजकारण करणार्या राज्याने असंघटित क्षेत्रातील 30 लाख नोकर्या गमावल्या. प. बंगाल अराजकाच्या गर्तेत जात असल्याचा हा आणखीन एक ढळढळीत पुरावा!
संदेशखलीचा कसाई म्हणून प्रसिद्ध असलेला टीएमसी नेता शाहजहान शेख याच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला फटकारले आहे. संदेशखली येथील महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सीबीआय चौकशी करत आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने हा आदेश दिला होता. याविरोधात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने बंदी घालण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
प. बंगालच्या संदेशखालीतील अत्याचार तर आता देशात सर्वत्र माहिती झाले आहेत. पण, धक्कादायक बाब म्हणजे, प. बंगालमधून महिला बेपत्ता होण्याचे प्रमाणही वर्षागणिक वाढते आहे. ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी’ संस्थेच्या माहितीनुसार, त्या राज्यातून लाखो महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यानिमित्ताने महिला मुख्यमंत्री असलेल्या प. बंगालमधील महिलांच्या बिकट परिस्थितीचेे भीषण वास्तव अधोरेखित करणारा हा लेख....
राज्यात असलेला घुसखोरीचा प्रश्न हा राष्ट्रीय सुरक्षेस धोका असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता बंगालमध्ये अशाप्रकारे ‘मुस्लीम राष्ट्रा’ची भाषा बोलली जात असल्यास, हा विचार बंगालमध्ये खोलवर रूजला असल्यास त्याविरोधात वेळीच उपाय होणे गरजेचे आहे. कारण, बंगालची तिसरी फाळणी होणे हे अजिबातच परवडणारे नाही.
पश्चिम बंगालमधील दलितबहुल अल्ताबेरिया गावातील भयाण वास्तव समोर आले आहे. उत्तर प्रदेशचे माजी डीजीपी ब्रिज लाल यांनी ग्राऊंड झिरो वरून व्हिडिओ बनवला असून पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या अत्याचाराबाबत सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकांनतर पश्चिम बंगालमधील हिंसाचार दिवसेंदिवस वाढत चालला आहे, असा आरोप ममता सरकारवर केला जात आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस म्हणाले की, ममता बॅनर्जी सरकारच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार घडून येत आहे.
नुकतेच शरद पवार म्हणाले की, “लोकशाहीतील मतदारांच्या ताकदीमुळे आता मोदी सरकारही राहिले नाही आणि ‘मोदींची गॅरेंटी’ही राहिली नाही.” शरद पवार असे म्हणाले आणि कोल्ह्याची ती गोष्ट आठवली. कोल्हा भुकेने व्याकूळ झाला होता. त्याने द्राक्षांची बाग पाहिली. द्राक्ष पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले.
विरोधकांचे नरेंद्र मोदी यांच्यावरील आरोप किती निवडक आणि दुटप्पी आहेत, ते पश्चिम बंगालमधील राजकीय स्थिती पाहिल्यास लगेच दिसून येईल. मोदींना हुकूमशहा म्हणणारे ममता बॅनर्जी यांच्या हडेलहप्पी आणि भ्रष्ट कारभारावर सोयीस्कर मौन बाळगून आहेत. मोदी हे लोकनियुक्त सरकारचा आदर करतात, म्हणूनच त्यांनी ममतांचे सरकार अजूनही कायम ठेवले आहे. पण, त्या राज्यातील सातत्याने बिघडणारी कायदा-सुव्यवस्थेची स्थिती पाहता, ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात आता कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे.
लोकसभा निवडणुकीकरिता मतदान संपुष्टात आले असले तरी पश्चिम बंगालमधून जवानांची फौज अद्यापही हटविण्यात आलेली नाही. जूनला मतदानाचे निकाल जाहीर होणार असून सत्तास्थापनेबाबत चित्र स्पष्ट होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदानमोजणीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडून नये म्हणून ३२ हजार सैनिकांची फौज तैनात राहणार आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, “इंडिया आघाडीच दि. ४ जून रोजी सत्तेवर येणार असून, त्यानंतर ४८ तासांच्या आत पंतप्रधान कोण होणार, याचा निर्णय घेतला जाईल. एवढेच नाही, तर आणखीन काही पक्ष दि. ४ जूननंतर ‘इंडी’ आघाडीमध्ये सामील होतील,” असे भाकीतही रमेश यांनी केले. आता यास रमेश यांचा विजयाबद्दल आत्मविश्वास म्हणायचे की पराभवाचे भय लपविण्यासाठी उगाच केलेला अतिशयोक्तीपूर्ण दावा, हाच खरा प्रश्न
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यानंतर बोलावलेल्या इंडी आघाडीच्या बैठकीस प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
पश्चिम बंगालच्या डाव्या आणि ममता सरकारने केवळ मतपेढीसाठी ७७ मुस्लिम जातींना इतर मागासवर्गीयांमध्ये (ओबीसी) समाविष्ट करून आरक्षण दिल्याचे कलकत्ता उच्च न्यायालयाने म्हटले आहे. हे सर्व निवडणुकीच्या फायद्यासाठी करण्यात आले असून आरक्षण जातीच्या आधारावर नाही तर धर्माच्या आधारावर देण्यात आल्याचे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे.
पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राममध्ये बुधवार, दि. २२ मे २०२४ तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी जोरदार निदर्शने केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हत्येच्या निषेधार्थ जागोजागी रस्तारोको करून आपला विरोध केला.
पश्चिम बंगालमध्ये २०१० नंतर देण्यात आलेली ओबीसी प्रमाणपत्रे रद्द करण्याचा आदेश देऊन कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाला जोरदार चपराक लगावली आहे. न्यायालयाचा निर्णय आपण मानणार नाही, असे जाहीर करून ममता बॅनर्जी यांनी आपला संविधान विरोधी चेहरा दाखवून दिला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवार, दि. २३ मे रोजी दिली. ओबीसी, आदिवासी, दलित समाजाचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा कट भारतीय जनता पार्टी कदापि यशस्वी होऊ द
नुकतेच कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तपब्रत चक्रवर्ती आणि न्या. राजशेखर मंथा यांनी प. बंगालमध्ये २०१० सालानंतर इतर मागासवर्गीय (ओबीसी) कोट्यातून आरक्षण मिळालेल्या जातींचे आरक्षण रद्द करण्याचा आदेश पारित केला. कोलकाता उच्च न्यायालयाने म्हटले की, “या जातींना केवळ मुस्लीम धर्मातील जाती आहेत, म्हणून आरक्षण दिले गेले.” यावर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “उच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले, तरी मी उच्च न्यायालयाचा निकाल मान्य करणार नाही.” काय म्हणावे ममता बॅनर्जींना? आणि कोलकाताच्या
कोलकाता उच्च न्यायालयाने २०१० नंतर जारी करण्यात आलेले सर्व ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ममता सरकारला मोठा झटका बसला असून अशाप्रकारे प्रमाणपत्र देणे घटनाबाह्य असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्या पोस्टरवर त्यांच्याच राष्ट्रीय अध्यक्षांच्या चेहऱ्याला शाई लावत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राज्यात काँग्रेसला आघाडीत सहभागी करून घेतले नाही. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. त्यात पक्षाच्या पोस्टरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या चेहऱ्यावर काळी शाई फेकली. याच होर्डिंगवर माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचेही फोटो लावण्यात आले आहेत. मात्र, त्य
पश्चिम बंगालमधील संदेशखालीमध्ये अद्यापही भीतीचे आणि हिंसाचाराचे वातावरण आहे. टीएमसीचा बाहुबली गुंड नेता शाहजहान शेख आणि त्याच्या गुंडांच्या अत्याचाराच्या रोज नवनवीन कथा समोर येत आहेत, ज्याने लोकांना विचार करण्यास भाग पाडले आहबे. या संपूर्ण प्रकरणात आता टीएमसीचे गुंड पुन्हा सक्रिय झाले आहेत.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि संसदेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी ( Adhir Ranjan Choudhry ) यांनी एका रॅलीमध्ये बिजेपी ला वोट करण्याची अपिल केली. पश्चिम बंगालच्या बेहरामपुर येथील एका रॅलीमध्ये टिएमसीला मत देण्याऐवजी भाजपला मत द्यावं असं म्हटलं आहे. हे बोलतानाचा त्यांचा विडीयो सोशल मिडीयावर वायरल होत आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज शुक्रवार, २६ एप्रिल २०२४ मतदान सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील मालदा येथे एका सभेला संबोधित केले. जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तुम्ही सर्वजण खूप प्रेम देत आहात, असे वाटते की जणू माझा जन्म बंगालमध्ये झाला आहे किंवा बंगालच्या आईच्या कुशीत झाला आहे. इतके प्रेम मला कधीच मिळाले नाही.”