पर्यावरण संवर्धनाचा ध्यास प्रदूषण नियंत्रणासाठी आणि सभोवतालच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा,” असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
Read More
दादर येथील शिवाजी पार्कमधील धुळीच्या प्रश्नाबाबत तात्काळ उपाययोजना करा, असे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी मुंबई महानगरपालिकेला दिले.
'सिंगल यूज प्लास्टिक' (एकल वापर) बाळगणाऱ्यांविरोधात राज्य शासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी विशेष पथके तयार करून शहरातील बसस्थानके, रेल्वेस्थानके, बाजारपेठ, भाजी आणि फूल मंडई यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी धाडी टाकून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने मंगळवार, दि. १२ मार्च रोजी दिले आहेत.
मुंबई : मुंबईतील क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरत आहेत. या धुळीच्या प्रदूषणामुळे येथील नागरिक हैराण झाले असून ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना दमा आणि इतर श्वसनाचे आजार जडत असल्याचे येथील स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे. तसेच येथील रहिवाशांनी या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महापालिकेकडे धाव घेतली आहे.
भिवंडी तालुक्यातील कामवरी नदीत जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण झाले आहे. उल्हास नदीवर हर्बल फवारणी केल्यामुळे जलपर्णी कायमस्वरूपी नष्ट झाल्या आहेत. याच पद्धतीने जलपर्णी नष्ट करण्यासाठी कामवरी नदीसह राज्यात हर्बल फवारणी पद्धतीचा वापर करणार असल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
बाजू मांडण्यात ‘महाराष्ट्र प्रदूषण मंडळा’ला अपयश;‘लघु उद्योग भारती’चा आरोप
अंबरनाथ एमआयडीसीत असलेल्या रासायनिक कंपन्यांच्या पाण्याने वालधुनी नदीच्या पात्रात निर्माण झालेल्या 'नारंगी तवंगाने' खळबळ पसरवली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोणती कारवाई करते याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी असली तरी प्लास्टिकमुक्ती मात्र झालेली नाही. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी प्लास्टिकमुक्तीचा विडा उचलणार्या मुलुंडच्या अस्मिता गोखले यांच्या कार्याविषयी जाणून घेऊया...
पर्यावरण क्षेत्रात विविध अंगाने व सेवाभावी वृत्तीने कार्यरत असणा-या लघुचित्रपट निर्मात्यांकरिता ही स्पर्धा असणार आहे. पर्यावरण क्षेत्रातील कोणत्याही विषयाबाबत लघुपट बनवून तुम्ही या स्पर्धेत भाग घेऊ शकता.