तेजस देऊस्कर दिग्दर्शित देवमाणूस या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या एक से एक कलाकारांच्या टीम मध्ये आता अभिनेते सुबोध भावे सामील झाले आहेत. अभिनेता सुबोध भावे, महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे या दिग्गज कलाकारांसोबत यंदा स्क्रीन शेअर करणार आहेत, त्यामुळे हा चित्रपट एक मल्टिस्टारर चित्रपट असणार आहे.
Read More
गेले अनेक वर्ष मराठी आमि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे दोन दिग्गज कलाकार पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. चित्रपटसृष्टीतील दोन सर्वात प्रतिष्ठित कलाकार आपल्या सर्वांचे आवडते म्हणजेच महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे, त्यांच्या तीन दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत प्रथमच एका आगामी मराठी चित्रपट ‘देवमाणूस’ साठी एकत्र येत आहेत.
देश सध्या मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेमुळे हादरला आहे. मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. तसंच नंतर त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची अमानुष घटना देखील घडली. इतकेच नाही तर त्यांना घेऊन जातानाचा व्हिडिओही समाज माध्यमावर व्हायरल केला गेला. यावर देशभरातून पडसाद उमटत असताना आता चित्रपटसृष्टीतील कलाकारही राग व्यक्त करत आहेत. अभिनेत्री रेणुका शहाणे,अभिनेते आशुतोष राणा, अभिनेता अक्षय कुमार यांनीही आपली संतापाची भावना व्यक्त केली आहे.
शहाणेंना सामाजिक कार्यकर्त्या प्रिया कुलकर्णींचा सवाल हीच गोष्ट आमिर खान, नासीरुद्दीन शाह यांनी देशाबद्दल म्हटली होती. तेव्हा तुम्ही चिडीचुप का होत्या, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तेव्हा भारतीय म्हणून तुमच्या भावनांना ठेच पोहचली नाही का ? काँग्रेसने हिंदू दहशतवाद, अशी थिअरी मांडली होती, तेव्हाही तुम्ही शांत होता. शशी थरूर यांच्या हिंदू तालिबान आणि हिंदू पाकिस्तान या संकल्पनांवरही तुम्ही गप्प होता, असा प्रश्न कुलकर्णी यांनी शहाणे यांना विचारला आहे.
बॉलीवूड अभिनेत्री रेणूका शहाणे यांना शनिवारी आलेल्या विजबिलातील रक्कम वाचून मोठा धक्का बसला. विजेचे बिल ५,५१० रुपयांवरून थेट १८,०८० रुपये इतके आल्याचे ट्विट करत त्यांनी अदानी इलेक्ट्रीसिटीकडे जाब विचारला आहे. बिलाच्या रक्कमेत एवढी मोठी तफावत कशी होऊ शकते, असेही त्यांनी विचारले. सध्या महावितरण, रिलायन्स आणि अदानी सर्वच विजबिलात भरमसाठ विजबिल दरवाढ दिसून येत आहे.
‘हंटर’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’, ‘मणिकर्णिका’ यांसारख्या चित्रपटांतून हिंदी चित्रपटसृष्टीत झळकलेला मराठी चेहरा म्हणजे अभिनेता वैभव तत्ववादी. वैभव लवकरच एका नवीन चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.