शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्यासमोर सुनावणी पार पडली. दरम्यान, न्यायालयाने अजित पवारांसह त्यांच्या ४१ आमदारांना नोटीस बजावली आहे. तसेच हे दोन्ही प्रकरण सारखे असल्याने यावर एकाचदिवशी पण स्वतंत्र सुनावणी होणार आहे.
Read More
माझं निर्णय घटनेला धरून आहे हे त्यांनाही माहिती आहे. पण माझा निर्णय चुकीचा आणि कुणाच्या प्रभावाखाली घेतलेला असेल तर त्यांनी दाखवून द्यावं, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेबाबत नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही गट न्यायालयात गेले आहेत. यावर आता राहूल नार्वेकरांनी आपली प्रतिक्रिया दिली.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेची वर निकाल सुनावत आहेत. अजित पवार गट हाच मुळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा निकाल त्यांनी सुनावला. विधीमंडळात अजित पवार यांच्याकडे बहुमत आहे यावरुन हा निकाल देण्यात आला आहे.
राज्यात सध्या शिवसेना आमदार अपात्रतेचा मुद्दा चर्चेत आहे. १० जानेवारी रोजी कोणालाही अपात्र न करता खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी निकाल दिला होता. या निर्णयाविरोधात आता शिंदे गटाने न्यायालयात धाव घेतली आहे. उबाठा गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नुकत्याच १० जानेवारीला लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रता निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ११ जानेवारी ला गंगापुर उपसा सिंचन योजनेच्या भूमिपुजन सोहळ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल मत मांडल आहे. काल लागलेल्या निकालावर आनंद व्यक्त करतो. आणि कोणालाही आता शंका असण्याचे कारण नाही की हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल अस ते यावेळी म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधान मंडळाचे नियम-परंपरांचे पालन करून व कायद्याचे रक्षण करून निकाल देतील असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. शिंदे-नार्वेकरांची भेट ही नियमित प्रक्रिया असून त्याचा निकालाशी संबंध नाही.
उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालापुर्वी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला गेल्या आहेत. गणरायाच्या आशिर्वादाने आज १० जानेवीराला होणाऱ्या आमदार अपात्रता निकाल त्यांच्या बाजूने सकारात्मक लागेल अशी आशा त्यांना आहे.
शिवसेनाचा धनुष्यबाण आपलाच असल्याचा पुनरुच्चार आमदार अपात्रता निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मुख्यमंत्री हिंगोली येथे बोलताना म्हणाले, मी नेहमीच कार्यकर्ता होतो आणि आताही कार्यकर्ताच आहे, असे सांगतानाच तुम्हा इतकी पोटदुखी का?, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना यावेळी केला.
शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आज १० जानेवारी २०२४ ला दुपारी चार वाजता जाहीर केला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी कायद्याला धरुन निकाल देणार असल्याच आश्वासन दिले आहे. ठाकरे गटाचे १४ आमदार किंवा शिवसेनेचे १६ आमदार यांच्यावर या निकालाअंतर्गत कारवाई होऊ शकते.
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी देण्यास सुरुवात केली आहे. १२०० पानांचा निकाल घेऊन अध्यक्ष विधानभवनात पोहोचले आहेत. शिवसेना आमदार अपात्रता निकालाप्रकरणी ठाकरे गटाची घटना दुरूस्ती नियमबाह्य असल्याचे विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटले आहे. तसेच, ठाकरे गट उलटतपासणीस अनुपस्थित राहिल्याने त्यांचे प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आले आहे,
उध्दव ठाकरेंना राष्ट्रीय कार्यकारिणीचा पाठिंबा नसल्याने पक्षप्रमुख म्हणून उध्दव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पक्षातून बाहेर करण्याचा निर्णय नियमबाह्य आहे. तसेच, पक्षप्रमुख म्हणून नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम आहे, असेही विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी निकाल देताना नमूद केले. दरम्यान, पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम असतो हा दावाही नार्वेकरांनी निकालात खोडून काढला आहे.
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिला. १२०० पानांचा निकाल घेऊन अध्यक्ष विधानभवनात पोहोचले होते. शिवसेना आमदार अपात्रता निकालाप्रकरणी ठाकरे गटाची घटना दुरूस्ती नियमबाह्य असल्याचे विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटले आहे. तसेच, ठाकरे गट उलटतपासणीस अनुपस्थित राहिल्याने त्यांचे प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आले आहे, शिवसेना पक्षाची १९९९ च्या घटनेला ग्राह्य धरुन अध्यक्षांनी हा निकाल दिला आहे.
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिला. १२०० पानांचा निकाल घेऊन अध्यक्ष विधानभवनात पोहोचले होते. शिवसेना आमदार अपात्रता निकालाप्रकरणी ठाकरे गटाची घटना दुरूस्ती नियमबाह्य असल्याचे विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटले आहे. तसेच, ठाकरे गट उलटतपासणीस अनुपस्थित राहिल्याने त्यांचे प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आले आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी थोड्या वेळापूर्वीच शिवसेना आमदार अपात्रतेबाबत निकाल जाहीर करत शिंदे गटाला अधिकृत राजकीय पक्षाची मान्यता दिली. त्यानंतर उबाठा गटासह त्याच्या मित्रपक्षाकडून यासंदर्भात भाष्य केले जात आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत या सर्व घडामोडींवर भाष्य केले आहे.
बुधवारी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागणार आहे. दरम्यान, त्याआधीच विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याने उद्धव ठाकरेंनी यावर आक्षेप घेतला. त्यानंतर आता राहूल नार्वेकरांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत ठाकरेंना सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला.
अवघ्या देशाच्या नजरा खिळलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल येत्या बुधवारी, दि. १० जानेवारीला लागणार आहे. विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात सायंकाळी चार वाजता निकालपत्राचे वाचन केले जाणार आहे.
आता विधानपरिषदेतही होणार आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणी; राष्ट्रवादीच्या ८ आमदारांना नोटीस; सात दिवसांत उत्तर सादर करण्याची सूचना
नागपुर येथे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी पार पडली असून शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणी दीपक केसरकर यांची उलटतपासणी सुरु आहे. यावेळी उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून आदरापोटी उद्धव ठाकरेंचा पक्षप्रमुख असा उल्लेख होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एखाद्या कामानिमित्त आमदारांच्या घेतलेल्या सह्या मुद्दाम दुसऱ्या ठरावाला जोडण्याची बोगसगिरी उबाठा गटाने केली असल्याचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. शनिवारी शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी पार पडल्यानंतर शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी ३० ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी सादर केलेले वेळापत्रक फेटाळले आहे. तसेच आमदार अपात्रतेप्रकरणी ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणावर अनुक्रमे ३१ डिसेंबर २०२३ आणि ३१ जानेवारी २०२४ पूर्वी निर्णय घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. आमदार अपात्रताप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडिवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
“सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला लक्ष्मणरेषा आखून दिली आहे. त्या चौकटीतच तुम्हाला निर्णय द्यायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला प्रथमदर्शी चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण पुरावे पाहण्याची गरज नाही,” असा युक्तिवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला. अपात्रतेसंबंधी सुनावणीच्या वेळी करण्यात आलेल्या या युक्तीवादामुळे नार्वेकर संतप्त झाले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे ऐकायचे की, स्वत: निर्णय घ्यायचा, असं म्हणत त्यांनी ठाकरे गटाला चांगलेच सुनावले. ठाकर
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता कार्यवाहीचे वेळापत्रक ३० ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना आमदार अपात्रता कार्यवाहीचे वेळापत्रक १७ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्याविषयी मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्षांनी सादर केलेल्या वेळापत्रक असमाधान व्यक्त केले.
आमदार अपात्रता प्रकरणात सुरू असलेल्या विधिमंडळ सुनावणीचा आणखी एक टप्पा गुरुवारी पूर्ण झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाच्यावतीने करण्यात आलेल्या तीनही अर्जांवर गुरुवारी सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल अडीच ते पावणे तीन तास चाललेल्या या सुनावणीत दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. यावेळी पुढील कारवाई शुक्रवार, दि. २० ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
आमदार अपात्रताप्रकरणी तत्काळ सुनावणीचे निर्देश देण्याची विनंती करणाऱ्या उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार गट यांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात १३ ऑक्टोबर रोजी एकत्रित सुनावणी होणार आहे.
आमदार अपात्रता तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अनुक्रमे ९ ऑक्टोबर आणि २८ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
नुकतीच राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवले आहे. आज संध्याकाळी ७ वाजता मंत्र्यांना वर्षा निवासस्थानी बोलवण्यात आले आहे. वर्षा बंगल्यावरील बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्र्यांना बोलवले असल्याचे सांगण्यात येत आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानसभा अध्यक्षांवर कुणाचा दबाव आहे का? असा सवाल केला होता. आता भाजप खासदार प्रताप चिखलीकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवेंनी वायफळ बडबड करु नये, असे ते म्हणाले आहेत. नांदेड येथे बुधवारी ते पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सोमवारी सुनावणी पार पडली. दरम्यान, ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाकडून आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार आहे. सगळ्या प्रकरणावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वक्तव्य केले आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहून उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी आज पार पडली. यावेळी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. याप्रकरणी एकूण ३४ याचिका असून आजच्या सुनावणीनंतर या याचिकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरून सुरु झालेल्या सुनावणीवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ''मी आमदार अपात्रता प्रकरणात काही कायदेतज्ञांशी चर्चा केली असून आवश्यकता पडली तर दोन्ही गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनाही सुनावणीसाठी बोलावले जाईल,'' असे नार्वेकर यांनी म्हटले आहे.
शिवसेनेच्या आमदारांबाबत सुरु असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाची काही दिवसांपूर्वी सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेनेच्या आमदारांना कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीनंतर आता पुन्हा एकदा या प्रकरणाला वेग मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे गुरुवारी दिल्लीला रवाना झाल्याने आता या प्रकरणात पुढे काय घडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.