म्हाडाच्या मुंबई विभागाच्या यंदाच्या सोडतीत विविध कारणांमुळे ४४२ घरे विजेत्यांनी आपली घरे सरेंडर केली आहेत. यापैकी प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या ४०६ अर्जदारांना म्हाडाने सोमवारी स्वीकृती पत्रे पाठवली आहेत. या अर्जदारांना घर स्वीकारण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
Read More
नवी मुंबईतील सिडकोच्या २६ हजार घरांची लॉटरी निघणार आहे. विशेष म्हणजे या सोडतीला उस्फुर्त प्रतिसाद असून पहिल्या चोवीस तासात या घरांसाठी तब्ब्ल १२ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. सिडकोची ही घरं तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, करंजाडेसह मानसरोवर, खारघर आणि वाशी या ठिकाणी आहेत.
(MHADA)‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत प्रक्रियेला अर्जदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून १ लाख, ३४ हजार, ३५० अर्ज संगणकीय सोडत प्रणालीमध्ये प्राप्त झाले आहेत. यापैकी १ लाख, १३ हजार, ८११ अर्जदारांनी अद्यापपर्यंत अनामत रकमेचा भरणा करून सोडत प्रक्रियेतील सहभाग निश्चित केला आहे. दरम्यान, शुक्रवार, दि. २७ रोजी म्हाडाची प्राप्त अर्जांची प्रारूप यादी ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. रविवार, दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत प्रारूपयादी प्रसिद्ध झाल्यापासून
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सिडकोच्या सिडकोच्या ४० हजार घरांसाठी होणाऱ्या सोडतीविषयी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून
म्हाडाच्या मुंबई मंडळाने विविध गृहनिर्माण प्रकल्पातील २,०३० घरांच्या विक्रीसाठी काढलेल्या लॉटरीला मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले आहेत.
म्हाडा (Mhada) मुंबई मंडळाच्या सोडतीत सहभागी होण्यासाठी आता केवळ ५ दिवस बाकी आहेत. या सोडतीत २०३० घरांसाठी आत्तापर्यंत ७५,५७१ अर्ज प्राप्त झाले असून सुमारे ५५,००० अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. या संगणकीय सोडतीकरिता दि. १९ सप्टेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. तर दि. १९ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा अर्जदारांना भरणा करता येणार आहे. दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे संगणकीय सोडत काढली जाणार आहे
Mhada Lottery 2024 Mumbai महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळाशी नामसाधर्म्य असणारे बनावट अनधिकृत संकेतस्थळ तयार करण्यात आले असून या माध्यमातून काही नागरिकांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले असल्याने म्हाडा प्रशासनातर्फे सदर बनावट संकेतस्थळ निर्माण करणार्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Mhada Lottery 2024 Mumbai म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतील गोरेगाव पश्चिम, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड, दादर, लोअर परळ यांसह विविध भागातील गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटातील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या शुभहस्ते आज 'गो लाईव्ह' समारंभाद्वारे प्रारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील २०३० घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. उद्या शुक्रवार, दि.९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
ऑनलाईन लॉटरीचे हफ्ते सरकारला जात आहेत की, संजय राऊतांना मातोश्रीसाठी हफ्ते जमा करायचे आहेत याबद्दलचे पुरावे माझ्याकडे येत आहेत, अशी माहिती भाजप आमदार नितेश राणेंनी दिली आहे. उबाठा गटाचे नेते संजय राऊतांनी गृहमंत्र्यांना ऑनलाईन लॉटरी आणि जुगारासंदर्भात पत्र लिहीले. याबद्दल पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणेंनी हे वक्तव्य केले.
म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर,रायगड, येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५३११ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त २५०७८ पात्र अर्जांची संगणकीय सोडत दि. २४ फेब्रुवारी, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत काढण्यात येणाऱ्या आगामी लॉटरीमध्ये अत्यल्प - अल्प गटातील २ हजार ६८३ घरांचा समावेश होणार आहे. पहाडी गोरेगाव येथे १ बीएचके आकाराची ही घरे सर्वसामान्य चाकरमान्यांना अंदाजे ३५ लाखात तर अल्प गटातील घरे ४५ लाखात उपलब्ध होणार आहेत. मुंबईत घराचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असताना म्हाडा अत्यल्प किमतीत घरे उपलब्ध करून देणार असल्याने मुंबईत हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तसेच कन्नमवार नगर,वडाळा आणि मुंबईतील विखुरलेल्या एकूण ४ हजार घरांची सोडत मार्च महिन्य
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या पुणे मंडळातर्फे पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यातल्या विविध गृहनिर्माण प्रकल्पाअंतर्गत उभारलेल्या ४ हजार २२२ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करणे, ऑनलाइन अर्ज भरणे व अर्ज स्वीकृतीचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज 'गो-लाईव्ह' कार्यक्रमांतर्गत करण्यात आला. नवीन वर्षात नागरिकांच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्तीकरीता प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत म्हाडा पुणे मंडळा
म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास विकासकांनी रखडविल्याने अखेर म्हाडा प्राधिकरणाने तब्बल ५६ वसाहतींच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतला आहे.
राशी कांबळे पहिल्या तर दीनानाथ नवगिरे दुसरे मानकरी
म्हाडाच्या सोडतीची वाट पाहणाऱ्यांना अजन काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकांमुळे म्हाडा प्राधिकरणाने घरांची सोडत पुढे ढकलली आहे.
हज यात्रेकरिता जाणाऱ्यांसाठी लॉटरीची (कुरी) सोडत अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झाली. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसलगत असलेल्या हज हाऊस येथे हा कार्यक्रम पार पडला
गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांची माहीती, १३८४ घरांच्या सोडतीचे प्रकाशन.
म्हाडाचा घटक मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबई उपनगारातील पहाडी, गोरेगाव येथे विविध उत्पन्न गटांसाठी सुमारे पाच हजार सदनिकांचा गृहप्रकल्प उभारला जाणार आहे.
'म्हाडा'च्या १,३८४ घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून आजपासून घरांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
दिवाळीपूर्वी मुंबई मंडळ म्हाडाच्या १ हजार १९४ घरांसाठी लॉटरी निघणार आहेत.