पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सोमवार, २१ एप्रिल रोजी याबद्दलचा शासन निर्णय जारी करण्यात आला. याद्वारे धर्मादाय रुग्णालयांना ८ महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.
Read More
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गरीबांसाठी असलेला ३० कोटी रुपयांचा निधी वापरलाच नसल्याची धक्कादायक माहिती धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालातून पुढे आली आहे. तसेच गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ रुग्णालय दोषी असल्याचेही या अहवालात स्पष्ट झाले आहे.
गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत सर्वत्र संतापाचे वातावरण असताना आता धर्मादाय रुग्णालयांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सर्व धर्मादाय रुग्णालयांनी यापुढे 'धर्मादाय' असा उल्लेख असलेला फलक दर्शनी भागात लावावा, असे निर्देश राज्य महिला आयोगाने दिले आहेत.
कळवा रूग्णालय आणि जिल्हा रूग्णालयावरील ताण पहाता प्रशासनाने ठाण्यातील धर्मादाय रूग्णालयाची सुविधा रूग्णांसाठी खुली करणे गरजेचे आहे. मात्र तसे न होता ठाण्यातील धर्मादाय नावाखाली रूग्णालये सरकारच्या सुविधांवर डल्ला मारत असुन उपचारासाठी रूग्ण मात्र वणवण भटकत असल्याची परिस्थिती ठाण्यात दिसून येत आहे. पालिका प्रशासनाने ठाण्यातील धर्मादायमध्येही निर्धन घटकांतील रूग्णांना उपचारासाठी खाटा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी निवेदनाद