परिवहन मंत्री प्रताप सरनाईक गुजरात दौऱ्यावर
Read More
मध्य रेल्वे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी दि. ५ आणि ६ डिसेंबरच्या मध्यरात्री (गुरूवार-शुक्रवार मध्यरात्री) परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल स्थानकांदरम्यान १२ अतिरिक्त उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून सर्व पूर्वतयारी पूर्ण होते आहे. या मतदान प्रक्रियेत एसटी बसेस महत्त्वाची भूमिका बजावतात. यावेळी, एमएसआरटीसी, बेस्ट आणि शाळेच्या बसेस वापरात येतात. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने एसटी प्राधिकरणाकडे सुमारे ९२३२ बसेसची मागणी केली होती, जेणेकरुन या बसेस १९ नोव्हेंबर रोजी मतपेट्या मतदान केंद्रापर्यंत सुरक्षित जाऊ शकतील आणि २० नोव्हेंबर रोजी मतदान संपल्यानंतर मतमोजणी स्थळी पुन्हा सुरक्षित पोहोचू शकतील.
Mumbai Railway Stations : आपण मुंबईत दररोज प्रवास करताना रेल्वे स्थानकं पाहतो, या स्थानकांची नावं ऐकतो. पण या स्थानकांना हीच नावं का देण्यात याचा आपण कधी विचार केलाय का? मुंबईतील स्थानकांच्या नावांचा इतिहास आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या काही गोष्टी जाणून घेऊया या व्हिडिओतून.
( Kopri-Pachpakhadi )मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघात सद्यस्थितीत एकूण ३ लाख, ३८ हजार, ३२० मतदार आहेत. मागील २०१९ ची विधानसभा आणि नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक पाहता या मतदार संघात जेमतेम ५० ते ५६ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे २०२४ च्या या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
पुणे (Pune) शहरातील वाढती गुन्हेगारी, तसेच शहराचा वाढता विस्तार हे लक्षात घेता नवीन पोलीस ठाण्यांची स्थापना करण्याची घोषणा पुण्याचे पालकमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यानुसार पुण्यात ७ नवीन पोलीस ठाणी, तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ४ पोलीस ठाणी सुरु करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील आठ स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याचा ठराव मंगळवार, दि. ९ जुलै रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांची नावे ब्रिटिशकालीन आहेत.
आ. प्रसाद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस मित्र संघटनेतर्फे वडाळा, अँटॉप हिल, सायन आणि माटुंगा पोलीस स्थानकांना संगणकाचे वाटप
महाप्रित व C.E.S.L मार्फत मुंबई शहरात १३४ ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या पायाभूत सुविधा उभारण्याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशन क्लब, वांद्रे येथे आज एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते
महाराष्ट्र सरकारने ‘ई’ वाहनांना प्रोत्साहन दिले असले तरी, मुंबईसह अन्य जिल्ह्यांतही ‘चार्जिंग स्टेशन्स’ची वानवा ही महाराष्ट्राच्या ‘ईव्ही’ धोरणातील सर्वात मोठा कमकुवत दुवा आहे
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने ‘ईव्ही चार्जिंग’ पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी नुकतीच मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या अंतर्गत देशभरात लवकरच तेल विपणन कंपन्या देशातील प्रमुख शहरे आणि महामार्गांवर 22 हजार ‘चार्जिंग स्टेशन्स’ उभारले जाणार आहेत
मंत्रालयासह राज्यातील इतर शासकीय इमारतींच्या परिसरात ई. ई. एस एल कंपनी शंभर ई-चार्जिंग स्टेशन उभारणार असून यासाठी राज्यात किमान दीडशे जागा उपलब्ध करून देणार असल्याचे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सांगितले.
राज्यात एकूण ९७ हजार ६४० मतदान केंद्र असणार आहेत. राज्यात नव्याने दोन हजारांहून अधिक मतदान केंद्र वाढविण्यात आली असल्याने यंदा मतदार केंद्राची संख्या वाढली.
सध्या भारतातील काही ठिकाणी आलेल्या बेमोसमी पावसाने सामान्य जनजीवन विस्कळीत केले असून या वादळाने आज सकाळपासून दिल्ली मेट्रो आणि विमान सेवा विस्कळीत केली आहे.