"मला जाहीर झालेला ज्ञानपीठ पुरस्कार, हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान आहे. हा सन्मान मला जबाबदारीची जाणीव करून देतो " असे मत हिंदी साहित्यातील ज्येष्ठ कवी विनोद कुमार शुक्ल यांनी व्यक्त केले. भारतामध्ये प्रतिष्ठेचा मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार, या वर्षी हिंदी साहित्याचे ज्येष्ठ लेखक विनोद कुमार शुक्ल यांना जाहीर झाला आहे. 'नौकर की कमीज, दिवार में एक खिडकी रहती थी' अश्या दर्जेदार साहित्यकृतीमुळे शुक्ल यांचे जगभरात कौतुक करण्यात आले. १९७१ साली 'लगभग जयहिंद' हा त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला.
Read More
ज्येष्ठ हिंदी साहित्यीक आणि कवी विनोद कुमार शुक्ल यांना साहित्यातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. गेल्या ५० वर्षांपासून साहित्यक्षेत्रात स्वताचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या विनोद कुमार शुक्ल यांना ५९वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. विनोद कुमार शुक्ल यांचा जन्म १ जानेवारी १९३७ रोजी छत्तीसगढ येथील राजनंदगाव येथे झाला. १९७१ साली त्यांचा पहिला कविता संग्रह "लगभग जिंदगी' प्रकाशित झाला.
दि. १२ सप्टेंबर २००४ रोजी ‘माओईस्ट कम्युनिस्ट सेंटर’ आणि ‘सीपीआय’ (एमएल, पिपल्स वॉर) या दोन संघटनांचे विलीनीकरण झाले आणि ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ (माओवादी)चा जन्म झाला. ‘अर्बन नक्षल’ संकल्पनेविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण, हा गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम माओवादी साहित्याचा अभ्यास गरजेचा आहे, जेणेकरून याबद्दलचे सर्व गैरसमज आणि मनातील शंका सहज दूर होतील आणि जनसुरक्षा कायद्याचे महत्त्वही अधोरेखित होईल. यात विरोधी विचारांचा आवाज दडपण्याचा हेतू नाही, तर राष्ट्रविरोधी शक्तींच्या देशविघातक कृतींपासून देशाला
भारतीय संस्कृती, ज्ञान, शास्त्र, कला आणि परंपरांचा अभ्यास व प्रचार-प्रसार करण्यासाठी नाशिकमधील काही मान्यवरांनी पुढाकार घेतला. त्यातूनच संस्था स्थापण्याचा विचार पुढे आला. ती संस्था म्हणजे ‘इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज’. या संस्थेद्वारे भारतीय संस्कृती, साहित्य, मंदिर स्थापत्य, वारसा, कला, इतिहास, प्रथा-परंपरा, मूर्तिशास्त्र, खगोलशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादींचा अभ्यास आणि प्रचार-प्रसार करण्याचे कार्य आजही अव्याहतपणे सुरू आहे. या लेखाच्या माध्यमातून संस्थेचा आणि संस्थेच्या कार्याचा घेतलेला हा सखोल आढावा..
मराठी भाषेमध्ये भारतीय सैन्याच्या पार्थपराक्रमाची कथा सांगणारी साहित्यनिर्मिती काही प्रमाणात झाली आहे. मात्र, त्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा फारच कमी आहे. निवडक अशा युद्धाच्या कथाच पुढे आलेल्या आहेत. त्यातील अनेक पुस्तके तर, प्रत्यक्ष सैनिकांनीच लिहिलेली आहेत. त्यामुळे संशोधन करून, नवसाहित्य निर्मितीसाठी या क्षेत्रात बराच वाव आहे. लष्कराच्या पराक्रमाचे वर्णन करणार्या साहित्यकृतींचा लेखाच्या उत्तरार्धात घेतलेला आढावा...
मराठी साहित्याला संत कवयित्रींचा, लेखिकांचा समृद्ध वारसा लाभला आहे. आपल्या काव्यप्रतिभेतून या कवयित्रींनी जीवनाच्या विविध पैलूंवर अगदी नेमकेपणाने भाष्य केले. यापैकी काही आशयगर्भ काव्यपंक्तींची गीतांतही गुंफण झाली. अशाच काही निवडक कवयित्रींचा अक्षरप्रवास रसिकांसमोर उलगडून दाखवत आहेत, लेखिका तपस्या वसंत नेवे. नुकत्याच संपन्न झालेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने आणि आगामी जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर ‘शब्दव्रती’ या अनोख्या संकल्पनेबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’ने तपस्या नेवे यांच्याशी साधलेला हा संवाद...
Marathi literature संमेलनाचे सूप अलीकडेच नवी दिल्लीमध्ये वाजले. साहित्य म्हटले की, समाजमनाचा तो आरसाच असतो. त्यामुळे समाजात घडणार्या विविध घटनांचे प्रतिबिंब आपल्याला साहित्यात पाहायला मिळते. साहित्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की, त्यात राष्ट्रीय प्रेरणेसारखे विषयही अगदीच लिलया सामवले जातात. आज मराठी साहित्यामध्ये राष्ट्ररक्षण आणि साहस यावर भाष्य करणारे साहित्य विपूल प्रमाणात आहे. या साहित्याचा वापरही देशाच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सबलीकरणात प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे होत असतो. साहित्याच्या याच परिणामांचा घेतले
Tarabai Bhawalkar ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ताराबाई भवाळकर एका मुलाखतीत बोलताना म्हणाल्या की मराठी साहित्यात सध्या चांगले लिखाण होत नाही. त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो " असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ.पृथ्वीराज तौर यांनी व्यक्त केले.
मराठी ग्रामीण साहित्याचे भीष्म पितामह अशी ओळख असणाऱ्या रा.रं. बोराडे यांचे वृद्धपकाळाने निधन!
इंगलंडचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक भारत दौऱ्यावर असून, सध्या ते सहकुटूंब विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेत आहेत. अशातच राजस्थानमधील विख्यात जयपूर साहित्य महोत्सवात त्यांनी सहकुटुंब हजेरी लावली. सुनक यांच्या पत्नी अक्षाता मूर्ती आणि त्यांच्या मतोश्री सुधा मूर्ती यांनी एका कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला.
साधारणपणे न्यायालय म्हटले की, कायद्याची एक सामान्यांना न समजणारी भाषा आलीच. त्यात न्यायमूर्ती म्हटले की, करारी आणि कायद्याला धरून सारे काही करणारी एक प्रतिमा समोर येते. मात्र,या प्रतिमांना छेद देण्याचे काम न्या. नरेंद्र चपळगांवकर ( Narendra Chapalgaonkar ) यांनी केले. कायद्याप्रमाणेच साहित्यनिर्मितीतही त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांचे शनिवार दि. २५ जानेवारी रोजी वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा हा लेख...
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा झाली. विविध क्षेत्रांत आपले अमूल्य योगदान देऊन देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणार्या अनेक दिग्गजांचा, दरवर्षी ‘पद्म’ पुरस्काराने सन्मान केला जातो. कला आणि साहित्य या क्षेत्रांत मोलाची कामगिरी करून, यावर्षी ‘पद्मविभूषण’ पुरस्काराला ( Padma Vibhushan Award ) गवसणी घालणार्या या चार दिग्गजांचा हा अल्पपरिचय..
छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल चित्र, शिल्प आणि शिलालेख यावर संशोधन करणारे आणि साहित्य निर्माण करणारे प्रसाद तारे ( Shiva Premi Prasad Tare ) यांच्याविषयी...
भारतभूमीला संतांची ( Saint kabir ) मोठी परंपरा लाभली आहे. प्रत्येक संतांनी साहित्यामध्येही मोठे योगदान दिले. कोणाचे अभंग, तर कोणाची गवळण, तर कोणी श्लोक अशा विविध काव्यपद्धतींचा वापर करत, या देशात भक्तीचा मळा फुलवत, समाजाला उपदेशही केला. त्यापैकीच ‘दोहा’ हा काव्यप्रकार म्हटले की, आपल्या चटकन लक्षात येतात ते संत कबीर महाराज. सामान्यांना सहज उमजेल अशी लहान लहान दोह्यांची रचना हे कबीर महाराजांच्या काव्याचे वैशिष्ट्य. कबीर महाराजांनी लाभलेल्या दीर्घायुष्यात निर्गुणाची उपासना केली. तरीही त्यांचे रामरंगातच न्हाऊन
साहित्य हे समाजप्रबोधनाचे माध्यम आहे, असे मानून साहित्य निर्मिती करणार्या प्रतिथयश साहित्यिक कवी शुभांगी पासेबंद यांच्या विचारांचा मागोवा घेणारा लेख...
दिल्ली : राजधानी दिल्लीमधील ( Delhi ) तालकटोरा स्टेडियम येथे दि. २१ फेब्रुवारी ते दि. २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणार्या ‘98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ परिसरास ‘छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी’ नाव देण्याचे ‘अखिल भारतीय साहित्य महामंडळा’ने, तसेच ‘सरहद’ या आयोजक संस्थेने ठरविले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि मराठी विश्वकोश ( Marathi Encyclopedia ) मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्याशी साधलेला हा संवाद
१० नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. विज्ञानाने आपल्या जीवनाचे प्रत्येक अंग व्यापले आहे. सुरुवातीच्या काळात विज्ञान हे फक्त या क्षेत्रात काम करणारे वैज्ञानिक, शास्त्रज्ञ आणि विज्ञानाचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्या पुरतेच मर्यादित होते, सामान्यांपर्यंत ते पोहोचत नव्हते. विज्ञानाला सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले ते ‘विज्ञान साहित्याने.’ मराठी साहित्याच्या क्षेत्रात सुद्धा विज्ञान साहित्याचे खूप मोठे योगदान आहे. जागतिक विज्ञान दिवसाच्या निमित्ताने मराठी विज्ञान साहित्या
दिल्ली येथे नियोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दि. २१ दि. २२ आणि दि. २३फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्लीत हे संमेलन होणार आहे.
कुठलीच चांगली साहित्यकृती कधीही भाषेच्या बंधनात अडकून राहत नाही. एखाद्या भाषेत जरी ती निर्माण झाली असली, तरी त्या भाषेचा बंध तोडून, ती अन्य भाषिकांपर्यंत पोहोचतेच. भाषेला हा बंध तोडायला आणि इतर भाषिकांपर्यंत पोहोचायला मदत करते ते ‘भाषांतर.’ उद्याच्या ‘जागतिक भाषांतर दिना’च्या निमित्ताने ‘भाषांतरक्षेत्राची गरज आणि व्यापकता’ या विषयाचा घेतलेला संक्षिप्त आढावा.
इंग्रजी साहित्य क्षेत्रातील एक मानाचा आणि महत्त्वाचा पुरस्कार म्हणून, ‘बुकर’ पुरस्कार म्हणून ओळखला जातो. या पुरस्कारासाठी 2024 मधील नामांकने काही दिवसांपूर्वीच जाहीर झाली. यावर्षी या पुरस्कारासाठी जाहीर झालेल्या नामांकनांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे, कारण जाहीर झालेल्या एकूण सहा नावांपैकी पाच नावे ही स्त्रियांची आहेत.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या बहुमोल स्मृती चिरंतन जपण्याचे काम ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’मध्ये ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासना’च्या माध्यमातून सुरू आहे. विद्यापीठात ‘ललित कला केंद्रा’ला लागूनच असलेल्या इमारतीत हे अध्यासन कार्यरत असून दै. ‘मुंबई तरुण भारत’ने या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन अध्यासन प्रमुख डॉ. सुनिल भंडगे यांच्याशी संवाद साधला. तेव्हा हे अध्यासन शाहिरांच्या साहित्याचा ज्वलंत उद्गार जनमानसांत पोहोचवणारे लोकासन झाले आहे, याची प्रचिती आली. उद्याच्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमि
गेल्या काही दिवसांपासून इयत्ता पहिलीच्या ‘बालभारती’च्या मराठी पुस्तकातील ‘जंगलात ठरली मैफल’ ही कविता समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाली. त्याचे कारण म्हणजे, या कवितेतील अमराठी शब्दप्रयोग, ओढूनताणून जुळवलेले यमक आणि एकूणच या कवितेचा दर्जा. यामुळे या कवितेच्या कवयित्री आणि ‘बालभारती’वरही सर्व स्तरातून टीकेची झोड उठली. तसेच मराठी भाषा, बालसाहित्य, ‘बालभारती’ची पुस्तके, कवितानिवडीचे निकष अशा अनेक मुद्द्यांनाही या ‘व्हायरल’ कवितेने ऐरणीवर आणले. त्यानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ने या कवितेविषयी शिक्षक, बालसाहि
‘आषाढ शुद्ध प्रथमा’ अर्थात ‘आषाढस्य प्रथमः दिवसः’ असे म्हणताच आपसूक महाकवी कालिदासाचे नाव ओठी येते आणि प्रथम आठवते ते त्याने केलेले पावसाचे रम्य वर्णन. ‘ऋतुसंहार’ या खंडकाव्यात कालिदासाने सर्व ऋतूंचे रसिकवाचकाला खिळवून ठेवणारे असे वर्णन केले आहेे. कालच प्रारंभ झालेल्या आषाढ मासाच्या निमित्ताने ‘ऋतुसंहार’ खंडकाव्यातील वर्षा ऋतूची कालिदासाने वर्णिलेली ही महती...
विद्यार्थीदशेत शाळेच्या मासिकात लिखाणाचा श्रीगणेशा करून उतारवयातही साहित्यात मुशाफिरी करणार्या चतुरस्र लेखिका माधुरी वैद्य यांच्याविषयी...
नुकताच बारावीचा निकाल लागला असून, पुढील काही दिवसांत दहावीचा निकालही जाहीर होईल. अशावेळी विद्यार्थी आणि पालकांसमोरही करिअरच्या अनुषंगाने ‘पुढे काय?’ असा प्रश्न निर्माण होतो. अशावेळी पाल्याच्या आवडीनिवडी, शैक्षणिक क्षमता, कुटुंबाची आर्थिक स्थिती यांसारख्या विविध निकषांच्या आधारे करिअर मार्गदर्शनाचा निर्णय फायदेशीर ठरु शकतो. त्यानिमित्ताने करिअर व्यवस्थापनासंबंधी मार्गदर्शन करणारा हा लेख...
मुले कुतूहल घेऊनच जन्माला येतात. ही जन्मजात जिज्ञासू मुले ज्ञानार्जनासाठी सतत माध्यम शोधत असतात. आजच्या डिजिटल काळात, मोबाईल-लॅपटॉपपासून पारंपरिक वाचनालये आणि प्रश्नचिन्ह टाकताक्षणी उत्तर देणारे गुगल, हे सगळे त्यांच्या हातात आहे. या सर्वांत वाचनसंस्कृती मागे पडली यात नवल नाही. परंतु, पुस्तक वाचनाचे केवळ ज्ञानार्जनाव्यतिरिक्त इतरही फायदे आहेत. नुकताच ‘बाल पुस्तक दिन’ साजरा झाला. या पार्श्वभूमीवर मुले का वाचत नाही? याबद्दल बालसाहित्यकार आणि संबंधित क्षेत्रातील काही मान्यवरांच्या घेतलेल्या या विचारगर्भ प्रतिक्
संन्यासविधी संपन्न झाल्यानंतर उपस्थित ज्ञानीजन त्या परिव्राजकाला शुभेच्छा देत, त्याच्याकडून ही अपेक्षा व्यक्त करीत आहेत. याप्रसंगी संन्यासाला परमेश्वराची उपमा दिली आहे. जसा परमपिता परमेश्वर संपूर्ण ब्रह्मांडातील चंद्र, सूर्य इत्यादींना प्रकाशित करून त्यांना धारण करतो, त्याचप्रमाणे संन्यासानेदेखील आपल्या आत्म्यामध्ये चांगल्या गोष्टी धारण कराव्यात आणि सदोदित आनंदी राहावे. त्याबरोबरच त्याने या संपूर्ण जगातील ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ या आश्रमातील सर्व वर्णांच्या प्रजाजनांना सत्यविद्येचा उपदेश करावा आणि सन्
कथा किंवा गोष्ट या विषयाचा माणसाच्या मनावर चटकन पडणारा प्रभाव लक्षात घेऊन, लोकनेत्यांनी वेळोवेळी सामाजिक उत्थानासाठी योग्य वापर करून घेतलेला आहे.
“आधुनिक काळात मराठीचा वापर विविध माध्यमातून, विविध आघाड्यांवर कसा होतोय हे पाहताना त्यांच्या पुढील काळातील विकासाच्या दिशा कोणत्या असतील, यांचा वेध घेणे महत्त्वाचे ठरते,” असे प्रतिपादन ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’चे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले. आज मराठी भाषा गौरव दिन. यानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मराठीचे भवितव्य, मराठीची राजकीय संस्कृती, साहित्य संस्कृती आणि तिचे बदलते प्रवाह यांसारख्या विविध मुद्द्यांवर मोरे यांनी दिलखुलास चर्चा केली. मराठी आणि साहित्याच्
लेखिका, कवयित्री, संपादिका अशा क्षेत्रात मुसाफिरी करत, आपलं अस्तित्व ‘अधोरेखित’ करणार्या डॉ. पल्लवी परुळेकर-बनसोडे यांचा जीवनप्रवास...
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांवर आजवर अनेक विद्वानांनी, तसेच तरूण अभ्यासकांनी सुद्धा प्रदीर्घ लेखन केले आणि अजूनही ही आशयनिर्मितीची प्रक्रिया अव्याहतपणे सुरु आहे. याचाच मूर्त आणि सबळ पुरावा म्हणजे ’बखर सावरकरांची.’ कायद्याचे शिक्षण घेऊन, त्यातच पूर्णवेळ काम करणारे, अॅड. आदित्य रुईकर यांनी या ग्रंथाचे लेखन केले आहे. सुरुवातीला एकाच भागात ग्रंथरुपाने प्रकाशित करावयाचा हा ग्रंथ पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन भागांत प्रकाशित करावयाचे ठरले होते, त्यानंतर त्याचे तब्बल तीन भाग झाले. हा त्याचाच पहिला भाग.
अखिल भारतीय साहित्य संमेलनातून संपूर्ण तीन दिवस चालणारा गझल कट्टा यावर्षीपासून केवळ तीन तास असेल, असा निर्णय नुकताच साहित्य महामंडळाने घेतला. त्यानंतर गझलकारांनी गझल सादरीकरणासाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करायचे ठरवले. याच धर्तीवर ‘पहिले एल्गार गझल संमेलन’ अमळनेर येथे दि. २७ आणि २८ जानेवारी रोजी आता आयोजित करण्यात आले आहे. संमेलनादरम्यान गझल कट्टा स्वतंत्र सभागृहात साजरा होतो. तेव्हा तिथे रसिकांची गर्दी होते. मात्र, मुख्य मंडपात रसिकांची उपस्थिती अत्यल्प असते. तसेच गझल म्हणजे मराठीवर झालेले आक्रमण आहे, असे
ज्येष्ठ लेखिका, चरित्रकार, संशोधिका, लघुपट निर्मात्या, दिग्दर्शक अशी कलाक्षेत्रात मुक्तछंद मुशाफिरी करणार्या अंजलीताई कीर्तने यांचे नुकतेच निधन झाले. एक वाचक आणि एक लेखक म्हणूनही स्त्रीजीवनाचा खोलवर विचार करणार्या अंजली कीर्तने यांच्या साहित्यातील स्त्रीत्वाचे पदर उलगडणारा हा लेख...
पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे या लोकसाहित्याचा वटवृक्ष असलेल्या समाजशास्त्रज्ञाचे निधन झाल्याने अतिव दुःख झाले. ‘लोकसाहित्य’ या अभ्यासशाखेला विद्यापीठीय आणि अभ्यासकांच्या पातळीवर मांडे यांनी अधिकाधिक ’जाणतं’ केले. त्यामुळे संशोधकांच्या परंपरेत त्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागते.
छत्रपती संभाजीनगरात एक संस्था मोठ्या उमेदीने, क्रांतिकारक कार्यासाठी, लोकसाहित्याच्या अभ्यास क्षेत्रात १९७७ मध्ये अस्तित्वात येत होती. डॉ. प्रभाकर मांडे यांच्या तळमळीने, जिद्दीने आणि संशोधन दृष्टीने ही संस्था साकारत होती. ‘लोकसाहित्य संशोधन मंडळ’ असे या संस्थेचे नाव निश्चित झाले होते.
अगदी अलीकडेच २०२२-२३ मध्ये मांडे सरांना राष्ट्रीय पातळीवरचे सन्मान प्राप्त झाले होते. आधी ‘चतुरंग’ संस्थेचा पुरस्कार, पुणे येथे त्यांना भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला. त्यानंतर भारत सरकारच्या ’संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार मिळाला आणि लागोपाठ भारत सरकारचा ‘पद्मश्री’ हा मानाचा नागरी सन्मानही आदरणीय मांडे सरांना प्राप्त झाला.
लोकसाहित्य आणि लोककलेचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रभाकर मांडे (८९) ह्यांचे नगर येथे दि.२१ डिसेंबर रोजी सांयकाळी निधन झाले. मागील काही दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयातून डॉ प्रभाकर मांडे यांनी पदवी प्राप्त केली. त्याच दरम्यान त्यांना डॉ आंबेडकरांचा सहवास लाभला होता.
महाराष्ट्राला लाभलेली समृद्ध साहित्य परंपरा साहित्य आणि संगीताची देण यांचा आपल्याला नेहमीच अभिमान वाटतो. यात मोलाचं योगदान दिले-ते भक्तिपरंपरेने. संपूर्ण हिंदुस्थानात अनेक संत होऊन गेले, महाराष्ट्रात त्यांचे प्रमाण तुलनेने अधिक होते. यातील काही निवडक संतांच्या जीवनातील ठरावीक पैलूंवर भाष्य करणारी, पुस्तकांची मालिका लेखक सुभाष देशपांडे यांनी लिहिली आहे. त्यांच्या या सहा पुस्तकांविषयी त्यांच्याशी केलेली ही पुस्तकचर्चा...
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनानिमीत्त दरवर्षी सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे कला अकादमीकडून कलोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षीचा उदघाटन सोहळा दि. ८ नोव्हेम्बर रोजी संध्याकाळी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथील कलांगणात संपन्न झाला. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खर्गे, जेष्ठ कवी अरुण म्हात्रे, पु ल देशपांडे कला अकादमीच्या प्रकल्प समन्वयक मीनल जोगळेकर आणि अकादमीच्या सल्लागार समितीचे सदस्य शैलेश चव्हाण सुद्धा उपस्थित होते.
गुरूने अतींद्रिय ज्ञान साध्य करून घेतलेले असते, तोच शिष्याला अतींद्रिय ज्ञानाची अनुभूती देऊ शकतो. नुसत्या पुस्तकी पांडित्यात नम्रता, अतींद्रिय अनुभूती त्यांचा अभाव असतो. शब्दज्ञान, अहंकार उत्पन्न करणारे असल्याने परमार्थात शब्दज्ञानाला, पुस्तकी ज्ञानाला काही किंमत नसते.
स्वरोदय शास्त्राच्या साधनेने स्वरांचा पंचगुणात्मक अनुभव येतो व साधक रागरागिण्यांची स्वरुपे, सहवास आणि तत्सम पंचगुण अनुभवू शकतो. श्रीकृष्णाच्या रासक्रीडेतील अनुभव असल्याच स्वरज्ञानींना येऊ शकतात. जड उपकरणातून हे अनुभव येत नाहीत.
अनेक महान माणसांच्या स्वाक्षर्या टिपणारा, सामाजिक कार्यात रुची असणारा आणि आपल्या आजोबांच्या कार्याचा वारसा पुढे चालवणार्या कौस्तुभ साठे याच्याविषयी...
चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, काही वेळेस ते समाजप्रबोधन, मूल्यशिक्षण तर काही वेळेस ते कलेचे अविष्कार असतात. चित्रपट हे एका अर्थाने नव्या काळातील साहित्यच! परंतु, ते कसे पाहावे, हे सांगणारा समीक्षक इथे महत्त्वाची भूमिका बजावतो आणि म्हणूनच ही एक प्रकारची मनस्वी आणि परखडपणे तसेच अभ्यासपूर्ण केलेली पत्रकारिता. असेच एक पेशाने स्थापत्यविशारद असले तरी ख्यातनाम चित्रपट समीक्षक म्हणजे गणेश मतकरी. त्यांच्या ‘चित्रपट प्रवाहांचा इतिहास : जागतिक आणि भारतीय’ या पुस्तकाच्या निमित्ताने गणेश मतकरी यांना ‘वसंत शंकर उ
२०२३चा साहित्य क्षेत्रातील ‘नोबेल पुरस्कार’ जॉन फॉसे या नॉर्वेजियन लेखकाला नुकताच जाहीर झाला. त्यानिमित्ताने लेखक जॉन फॉसे आणि त्यांच्या साहित्य कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख...
आज सर्वत्र स्वागत होत असलेले डॉ. अरुणा ढेरे यांचे ‘भारतीय विरागिनी’ हे चिंतनगर्भ पुस्तक विरागी संत कवयित्रींच्या कथा-व्यथा मांडते. या पुस्तकावर दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे कालच पुणे येथे आयोजित मुक्त संवादाचा साहित्यपूर्ण कार्यक्रमही अगदी उत्साहात संपन्न झाला. असे हे ‘भारतीय विरागिनी’ पुस्तक अरुणाताईंच्या साहित्याचा, संप्रदायांचा पापुद्रा उलगडून त्याचे अचूक विश्लेषण मांडते. या आशयघन पुस्तकाच्या आगमनासोबतच अरुणाताईंनी २५ वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘विस्मृतिचित्रे’ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. दोन्ही पुस्तकांच्य
नोबेल समितीने गुरुवारी साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्याच्या नावाची घोषणा केली . नॉर्वेजियन लेखक जॉन फॉस यांना यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण नाटकांसाठी आणि कथांसाठी फॉसे यांना सन्मानित करण्यात आले.
‘अवघा देहची वृक्ष जाहला’ या वीणा गवाणकर यांच्या पुस्तकाला ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थे’चे नुकतेच पारितोषिक मिळाले. १८९४ साली या संस्थेची स्थापना झाली आणि तिच्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम पुस्तकांशी परिचय झाला. हे पुस्तक केवळ रिचर्ड बेकरचे चरित्र नाही, तर एका सशक्त वृक्ष चळवळी मागच्या तरुणाची गोष्ट आहे. या पुस्तकाविषयी...
दरवर्षी अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘स्नेहांजली पुरस्कार’ मराठी साहित्यविश्वातील एका लेखक व लेखिकेस दिला जातो. यंदाचे हे पुरस्काराचे २१वे वर्ष आहे. यावर्षीचा पुरस्कार, सुप्रसिद्ध लेखक सुमेध वडावाला (रिसबुड) यांना देण्यात येणार आहे. मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली व शुभहस्ते, आज रविवार, दि. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता एस. एम. जोशी सभागृह, पुणे येथे हा सन्मान सोहळा संपन्न होईल. यानिमित्ताने सुप्रसिद्ध कथा व विज्ञान कथालेखक डी. व्ही. कुलकर्णी यां
परिस्थितीचा बाऊ न करता गेली १७ वर्षं कला क्षेत्रात काम करणारे हरहुन्नरी कलाकार भारत शिरसाट यांच्याविषयी...