महाकुंभ परिसरातील जुन्या जीटी रोडवर असलेल्या स्वामी हरिहरानंद आणि सुखदेवानंद यांच्या शिबिरीत शुक्रवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी अचानक आग लागली. मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या डझनभर गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. Fire Broke Out in Mahakumbh
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताडदेव येथे इमारतीला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानी बद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत मृतांच्या कुटुबियांचे सांत्वन केले असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. या आगीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाख रुपये मदत तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये देण्यास पंतप्रधानांनी मंजुरी दिली आहे.
ताडदेव परिसरातील आगीत ६ बळींसह २३ जण जखमी ; मुंबईतील अग्निसुरक्षेची लक्तरे पुन्हा वेशीवर
भायखळ्यातील अग्नितांडवावर प्रवीण दरेकरांची संतप्त प्रतिक्रिया
भांडुप पश्चिम एलबीएस मार्ग येथील सनराईस हॉस्पिटलमध्ये गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता लागलेल्या आगीमध्ये दहा जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. कोविडमुळे आधिच मृत्यू पावलेल्या रुग्णांचे मृतदेह आगीत पूर्णपणे खाक झाले. ही घटना अत्यंत दुर्दैवी तसेच गंभीर असून याला महापालिका प्रशासन जबाबदार आहे. याप्रकरणी अनधिकृत सनराईस हॉस्पिटलला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली.
अग्निशमनदलाच्या ४० गाड्या घटनास्थळी रवाना