टेक्सासमधील पशुपालन, शेती आणि कापूस उत्पादन यांसारख्या पारंपारिक उद्योगांबरोबरच ऊर्जाक्षेत्रांनेही भरारी घेतली आहे. यासोबतच विमान कंपन्या, प्रवास, मनोरंजन आणि तंत्रज्ञान (संगणक, अंतराळ आणि दूरसंचार) यांसारख्या अन्य उद्योगांना आज लक्षणीय महत्त्व प्राप्त झाले आहे. काही प्रमाणात या उद्योगांना देशातील सरकारकडून विशेषतः ‘एरोस्पेस’ उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन आणि निधीही मिळाला. उदाहरणार्थ, ‘टेक्सास ए अॅण्ड एम विद्यापीठा’चे २०० दशलक्ष डॉलर्सचे नवीन अंतराळकेंद्र ह्यूस्टनमधील ‘नासा’च्या ‘जॉन्सन स्पेस सें
Read More
Sunita Williams Return : ८ दिवसांच्या मोहिमेसाठी अंतराळात गेलेल्या नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि अंतराळवीर बुच विल्मोर तब्बल ९ महिन्यांपासून अंतराळात अडकले होते. बोईंग स्टारलायनरमध्ये झालेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा जेमतेम आठवड्याभराचा मुक्काम पाहता पाहता वाढत गेला आणि नऊ महिने उलटून गेले. आता अखेर त्यांच्या परतीचा मुहूर्त ठरला असून ते दोघेही भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवार दि. १९ मार्च रोजी पहाटे पृथ्वीवर परतणार आहेत. नासासह स्पेसएक्स आणि अमेरिकी सरकारच्या प्रयत्नांतून आता
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. १४ जानेवारी रोजी डॉ. व्ही. नारायणन (Dr. V. Narayanan) इस्रोच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. मंगळवार, दि. ७ जानेवारी रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी करत माहिती देण्यात आली आहे. डॉ. व्ही. नारायणन यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत इस्रोमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. डॉ. नारायणन यांचे वैशिष्ट्य रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शनमध्ये आहे.
नवी दिल्ली : भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम असलेल्या ’गगनयान’साठीची ( Gaganyan ) जय्यत तयारी सुरू आहे. या मोहिमेचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिला टप्पा नुकताच पार पडल्याची माहिती ‘भारतीय अवकाश संशोधन संस्थे’ने (इस्त्रो) शुक्रवार, दि. २९ ‘एक्स’ अकाऊंटवरून दिली आहे.
Elon Musk यांच्या SpaceX या कंपनीने हाती घेतलेल्या Starship मोहीमेला यश आले असून,अंतराळ संशोधनामध्ये नवा विक्रम रचला गेला आहे. मोहीमेचा हा प्रवास जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून.
भारत अंतराळ अर्थव्यवस्थेत निर्णायक भूमिका बजावणार असून 2033 सालापर्यंत जागतिक बाजारपेठेचा सुमारे आठ टक्के हिस्सा भारताने काबीज केला असेल. या क्षेत्रात भारताची उलाढाल 2033 सालापर्यंत 44 अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल, असे मानले जाते. केंद्र सरकारने या उद्योगाला दिलेले बळ त्याला चालना देत आहे, असे म्हणता येते.
(Elon musk) स्पेस एक्सचे पोलारिस डॉन क्रू रविवार, दि. १५ सप्टेंबर रोजी पृथ्वीवर परतले. ड्रॅगन स्पेसक्राफ्ट फ्लोरिडाच्या ड्राय टॉर्टुगास कोस्टवर दुपारी १.०६ वाजता उतरले. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना अंतराळयानाचा वेग ताशी २७ हजार किमी होता. हवेशी संपर्क झाल्याने घर्षण निर्माण झाले आणि तापमान १ हजार, ९०० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.
स्टार कॉलिनियर स्पेसक्राफ्टचे प्रक्षेपण तीनदा रद्द करण्यात आले होते. त्यानंतर दि. ०५ जून रोजी स्टारलाईनर या स्पेसक्राफ्टमधून भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी पुन्हा एकदा अवकाश भरारी घेतली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरून यान परत पृथ्वीच्या दिशेने परतताना तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. यानात फक्त २७ दिवसांचे इंधन उपलब्ध असल्याची प्राथमिक माहिती आहे.
Awfis Space Solutions या कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होणार आहे. २२ मे ते २७ मे २०२४ या काळात हा आयपीओ उपलब्ध असणार आहे. कंपनीतर्फे सांगण्यात आल्याप्रमाणे या कंपनीचा आयपीओ (Initial Public Offer) २८ मे पर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे. दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत १.२३ कोटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
ऑफिस स्पेस (Office Space) मागणीत मोठी वाढ झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहेत.सहा शहरांमध्ये मुख्यतः ही वाढ झाली असुन जानेवारी मार्च तिमाहीत ही वाढ झाल्याचे कॉलियर्स (Colliers) सर्व्हेत म्हटले गेले आहे.रियल इस्टेट कन्सल्टंट कॉलियर्स इंडियाने तिमाही संपण्याच्या आधी नऊ दिवस आधी आणला आहे.
अखेरच्या सत्रात आज बाजारात मोठे चढ उतार होताना पहायला मिळाली. आज बाजारातील समभागात मोठी हालचाल पहायला मिळाली. सकाळच्या सत्रात कालच्या अखेरच्या सत्राप्रमाणे शेअर बाजाराची मंद सुरूवात होऊन सकाळी १०.५५ दरम्यान निफ्टी, सेन्सेक्स कोसळले मात्र आज भारताने अंतराळ क्षेत्रातील परदेशी गुंतवणूकीला १०० टक्के परवानगी दिल्यानंतर अंतराळ कंपन्यांच्या समभागात ( शेअर) मध्ये भरघोस वाढत होत समभागाची किंमत ४ ते ७ टक्क्यांने मूल्य वाढले. विशेषतः एमटीआर टेक्नॉलॉजी, अपोलो मायक्रो सिस्टिम, पारस डिफेन्स, स्पेस टेक्नॉलॉजी अशा विविध स
आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाला गतिमान करताना, मोदी सरकारने अंतराळ तंत्रज्ञानावर सदैव भर दिला. आर्थिक सर्वेक्षणात, अर्थसंकल्पातही त्याचे प्रतिबिंब दिसून आले. आता नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अंतराळ क्षेत्रातील १०० टक्के परदेशी गुंतवणुकीला मंजुरी देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. त्यानिमित्ताने हा निर्णय अंतराळ क्षेत्राला कसा अधिक प्रकाशमान करणारा ठरेल, त्याचा आढावा घेणारा हा लेख...
शेअर बाजारात ज्यांना थेट गुंतवणूक करावयाची नसते, अशांसाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे हा एक पर्याय असतो. फिजिकल सोन्यात ज्यांना गुंतवणूक करावयाची नसते, अशांसाठी देखील हल्ली अन्य बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, ज्यांना रिअल इस्टेटमध्ये थेट गुंतवणूक करावयाची नाही, अशांसाठीचा गुंतवणूक पर्याय म्हणजे ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’ अर्थात ‘रिट्स.’ आजच्या लेखात त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो आणखी एक नवा इतिहास रचणार आहे. भारताचे पहिले सौर मिशन लवकरच यशस्वीरित्या एल १ पॉइंटवर पोहोचणार आहे. गतवर्षी २ सप्टेंबरला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य एल १ प्रक्षेपित करण्यात आले होते. आता ते ध्येय गाठण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.
मुंबई महापालिकेतर्फे सप्टेंबर महिन्यात 'ओपन स्पेस अडॉप्शन पॉलिसी'चा मसुदा प्रसारित करण्यात आला होता. या धोरणाअंतर्गत महानगरपालिकेची मालकी असलेल्या जागा, देखभाल करण्यासाठी खाजगी तत्वावर दत्तक देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाबाबत पुन्हा एकदा नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याद्वारे शुक्रवार दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात बैठकीचे आयोजन केले. धोरणात्मक चर्चेसाठी नागरिक, प्रशासन आणि सरकार यांना एकत
भारताने २०४० पर्यंत अवकाशवीरांना चंद्रावर उतरवण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इस्रो’ला केली. तसेच २१ ऑक्टोबर रोजी ‘गगनयान’चे पहिले चाचणी उड्डाण पार पडणार आहे. भारतही गगनभरारी घेऊ शकतो, या पंतप्रधानांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे आणि शास्त्रज्ञांच्या अविरत मेहनतीचेच हे यश म्हणावे लागेल.
भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग करुन इतिहास घडवला आहे. तसेच दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. या सगळ्या यशानंतर आता हा आनंद साजरा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.
आपल्या सोयीप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आता या प्रकरणी निशाण्यावर आले आहेत. टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी सोमवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर टीका केली. ट्रुडो यांच्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत मस्क यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
इस्रो आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या भारताचे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करणार नाही. ISRO चे अहमदाबाद स्थित स्पेस ऍप्लिकेशन सेंटर (SAC) संचालक नीलेश देसाई म्हणाले की, संपर्क प्रस्थापिक करण्याचं काम उद्या म्हणजेच २३ सप्टेंबर रोजी केले जाईल.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’च्या सौर मोहिमेला अपेक्षित यश मिळत असून, ‘आदित्य एल-१’नेशुक्रवारी पृथ्वी प्रदक्षिणेचे चार टप्पे अर्थात ’अर्थ बाऊंड मॅन्युव्हर’ यशस्वीपणे पूर्ण केल्याची माहिती ‘इस्रो’ने ट्विटद्वारे दिली आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य एल-१’ ही भारताची पहिली अंतराळ मोहीम आहे. शनिवार, दि. २ सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘आदित्य एल-१’चे प्रक्षेपण झाले होते. या उपग्रहाला लॅग्रेंज पॉईंटपर्यंत पोहोचण्याकरिता चार महिन्यांचा कालावधी लागणार असून, मोहिमेच्या १४व्
मुंबईतील मोकळ्या जागांच्या वापराबाबत आणि त्या जागा दत्तक देण्याच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने एक संकल्पना तयार केली असून त्यासंदर्भात शुक्रवारी महापालिका मुख्यालयात एक संयुक्त बैठक झाली. त्यात उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शहरातील भूखंड आणि त्याबाबत केल्या जाणार्या उपाययोजनांबाबत प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
मुंबई महापालिकेतर्फे ९ सप्टेंबर २०२३ रोजी 'ओपन स्पेस अडॉप्शन पॉलिसी'चा मसुदा प्रसारित करण्यात आला आहे. या धोरणा अंतर्गत महानगरपालिकेची मालकी असलेल्या जागा, देखभाल करण्यासाठी खासगी तत्वावर दत्तक देण्याचा प्रस्ताव आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ उतरवून इस्रोने इतिहास रचला. आता आपला देश लवकरच अंतराळ महासत्ता म्हणून ओळखला जाईल. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आणि चीनच्या तियांगॉंग अंतराळ स्थानकानंतर भारत जगातील तिसरे अंतराळ स्थानक ( स्पेस स्टेशन) तयार करणार आहे. आयएसएस आणि चीनच्या स्पेस स्टेशनच्या तुलनेत ते अनेक अर्थांनी खास असेल.
चंद्रयानच्या ३ पार्श्वभूमीवर इस्त्रो ( Indian Space Research Organisation) ने आदित्य एल १ चे उड्डाण यशस्वीपणे केले आहे. यावेळी आदित्य मिशन सूर्यावर प्रयाण करणार आहे. ISRO च्या माहितीनुसार सूर्यावर पोहोचण्यासाठी ४ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रीसच्या दौऱ्यावरून परतताना थेट बंगळुरू आणि तेथून इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये पोहोचले. येथे पंतप्रधान मोदींनी चांद्रयान ३ मोहीम यशस्वी करणाऱ्या वैज्ञानिकांची भेट घेतली आणि इस्रोचे कमांड सेंटर पाहिले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महिला शास्त्रज्ञांना अभिवादन केले. पंतप्रधान मोदींनी चांद्रयान २ च्या क्रॅश लँडिंगचीही आठवण केली. त्यांनी चांद्रयान २ आणि चांद्रयान ३ च्या लँडिंग पॉइंट्सनाही नाव दिले. तसेच तरुणांना प्रेरणा देत राहण्यासाठी आणखी एक निर्णय पंतप्रधानांनी घेतला. त
चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) नेही आपल्या नवीन मोहिमेची तयारी पूर्ण केली आहे. चंद्र मोहिमेच्या यशानंतर भारत हा सूर्याचा अभ्यास करणारा चौथा देश ठरणार आहे. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि युरोपियन स्पेस एजन्सीने सूर्यावर संशोधन केले आहे. पुढील महिन्यात २ सप्टेंबर रोजी हे मिशन सुरू होण्याची शक्यता आहे.
'चांद्रयान-३' मोहिमेतील चांद्रयानाचे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग होऊन तीन दिवस झाले आहेत. या आश्चर्यकारक आनंदाच्या बातमीनंतर, तिथून आनंदाच्या बातम्या येणं सुरूच आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने दि.२६ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान बद्दल नवीन माहिती दिली. इस्रोच्या अध्यक्षांनी सांगितले की, दि. २६ ऑगस्ट रोजी रोव्हरने १२ मीटरचे अंतर कापले.
दि. २३ ऑगस्ट रोजी भारताची ‘चांद्रयान-३’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम यशस्वी ठरली आणि जगभरातून कौतुकवर्षाव झाला. त्यानिमित्ताने या अंतराळ संशोधन मोहिमेचे फलित, आगामी दिशा आणि जागतिक महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख...
चांद्रयान मोहिमेमुळे जगभरातील सगळ्यांनी कौतुक केलेच परंतु अगदी अमेरिकेपासून पाकिस्तान पर्यंत देखील या कार्यकर्तृत्वाची दखल घ्यावी लागली. पहिल्यांदाच दक्षिण ध्रुवावरील चंद्रावर स्पर्श करून चंद्रयानाने सगळ्यांना चकित केलेच पण अभिमानाने सगळ्या भारतीयांचे डोळे पाणावले. या विकासात्मक आघाडीत संशोधन महत्वाची भूमिका बजावते.यात देशाचे आर्थिक धोरण देखील महत्वाचे ठरते. याच आर्थिक आधारावर आपण बघितले असता भारताने सततच्या प्रयत्नांमुळे एक विकासाची उंची गाठली आहे. पण हे सगळ एका दिवसात झालेले आहे का तर त्याचे उत्तर नाही अस
अंतराळ मोहिमा आणि आत्मनिर्भर भारत (आत्मनिर्भर भारत) उपक्रम यांच्यातील समन्वय भविष्याला आकार देत आहे जिथे अंतराळ तंत्रज्ञान आणि संशोधनात स्वयंपूर्णता ही केवळ एक शक्यता नाही तर एक धोरणात्मक अत्यावश्यक आहे. आजच्या भागात आपण सरकारी समर्थन, योजना आणि स्वदेशी कंपन्यांना चालना देण्यासाठी, संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी आणि अंतराळ क्षेत्रातील नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाच्या भूमिकेबद्दल जाणून घेऊ. तसेच एमएसएमई, रोबोटिक्स, चिप्स आणि सेन्सर उत्पादन यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये हे उपक
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात (इस्त्रो) नवा इतिहास घडविणार असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविण्याचा विक्रम भारत आपल्या नावावर करणार आहे. हा क्षण देशातील १३० कोटी जनतेसाठी अभिमानाचा असणार आहे. यशस्वी लँडिंगसाठी देशभरातून प्रार्थना आणि इस्त्रोला पाठबळ देण्यात समस्त भारत देश गुंतला आहे.
'चांद्रयान ३' आपल्या कक्षेत बसवण्यात इस्रोला यश आले आहे. एवढेच नाही तर भारताच्या स्पेस एजन्सीने दि. ६ ऑगस्ट रोजी एक व्हिडिओही प्रदर्शित केला. ज्यामध्ये 'चांद्रयान ३' मधून चंद्र कसा दिसतो हे पाहिले जाऊ शकते. चंद्राचा हा व्हिडिओ 'लुनर ऑर्बिट इन्सर्शन (LOI)' दरम्यान अवकाशयानाने घेतला आहे. हा व्हिडिओ दि. ५ ऑगस्ट रोजी काढण्यात आला होता. दरम्यान दि. ६ ऑगस्ट रोजी 'चांद्रयान ३' ला मोठ्या प्रक्रियेतून जावे लागले.
चांद्र मोहीम किंवा इतर अवकाश संशोधनांबद्दल जगभरातील अनेक संस्थांकडून विविध संशोधन समोर आले आहे. मागील दोन लेखातही आपण अशाच दोन घटकांबद्दल जाणून घेतले. अपोलो ११ आणि यामाध्यमातून चंद्रावर पहिले पाऊल टाकणारा निल आर्मस्ट्राँग. परंतु या दोन्ही मधील एक मुख्य दुवा म्हणजे अमेरिकेची स्पेस एजन्सी अर्थात नासा. अवकाशातील कोणत्याही मोहिमेबद्दल चर्चा करत असताना नासा बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हा आजच्या लेखातून आपण नासाबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणाची उलटी गिनती सुरू झाली आहे. शुक्रवार, १४ जुलै रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था चांद्रयान-३ चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात येणार आहे. चंद्रावर भारताच्या तिसऱ्या मोहिमेपूर्वी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी गुरुवारी तिरुपती मंदिरात जाऊन तिरुपतीचे आशिर्वाद घेतले.
आज दि. १४ जुलै रोजी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील ‘सतीश धवन स्पेस सेंटर’च्या तळावरून ‘चांद्रयान-३’ हे चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. त्यानिमित्ताने भारताच्या या महत्त्वाकांक्षा मोहिमेचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक ६० आणि क्रमांक ११२ मध्ये ठाणे महापालिका, अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस इनकम्युनिटीज), लर्निंग लिंक्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने थिंक बिग स्पेस हा उपक्रम सुरू करण्यात आला असून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते आणि एडब्ल्यूएसचे साजी पीके तसेच माजी नगरसेवक देवराम भोईर, संजय भोईर यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाचा फायदा वंचित समूहातील तसेच सहा ते १५ वर्षे वयोगटातील २२० हून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. विज्ञान, तंत्रज्
पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक मजबूत होताना दिसत आहेत. अमेरिका आणि भारत यांच्यातील भागीदारी दोन्ही देशांसाठीच नव्हे तर जगासाठीही फायदेशीर ठरू शकते. अमेरिका आणि भारत जागतिक पुरवठा साखळीला पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात ‘इस्रो’ने आपल्या स्थापनेपासूनच नवनवीन विक्रम रचले आहेत. एकेकाळी अंतराळ क्षेत्रातील प्रगत देशांकडून तंत्रज्ञान नाकारल्या गेलेल्या भारताने स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून बड्या राष्ट्रांचे उपग्रह अतिशय कमी किमतीत प्रक्षेपित करण्यास प्रारंभ केला आहे. ‘चांद्रयान’ असो की ‘मंगळयान’, प्रत्येकवेळी ‘इस्रो’ने जगाला चकीत करणारी कामगिरी केली आहे. त्याचे आकलन...
श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) रविवारी सकाळी म्हणजे २ एप्रिल रोजी मोठे यश मिळवले. इस्त्रोने री-युजेबल लॉन्च व्हेईकल ऑटोनॉमस लँडिंग मिशन यशस्वीपणे लाँच केले. इस्त्रोसाठी ही एक फार मोठी यशस्वी मोहीम ठरली आहे. या मोहिमेत आरएलव्ही एलईएक्स रॉकेटच्या सेल्फ लँडिंगची चाचणी घेण्यात आली. उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर हे रॉकेट हवाई पट्टीवर सेल्फ लँडिंग करेल. त्याच्या मदतीने उपग्रह प्रक्षेपण मोहिमा अत्यंत कमी खर्चात केल्या जातील.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इस्रो) विकसित ‘एलव्हीएम ३’ या रॉकेटने रविवारी श्रीहरीकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रातून ‘वनवेब’ या युनायटेड किंग्डममधील कंपनीच्या ३६ उपग्रहांना पृथ्वीभोवती ४५० किमीच्या कक्षेत प्रस्थापित केले. भारताच्या सर्वात मोठ्या रॉकेटचे सलग सहावे यशस्वी प्रक्षेपण होते.
अमेरिकी अंतराळ संस्था ‘नासा’ने नुकतेच प्रकाशित केलेल्या हवामान बदला संबंधित एका वैज्ञानिक अभ्यासचा आपण आढावा घेणार आहोत. मानवी क्रियाकलपांमुळे, तीव्र हवामानाच्या घटना कशा वाढल्या आहेत आणि त्यांची ताकद कशी वाढली आहे तसेच या घटना व त्यांचा जागतिक तापमानवाढीशी कसा संबंध आहे, याचा पुरावा मांडला आहे.
जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक एलॉन मस्क यांची अंतराळ संशोधन संस्था स्पेसएक्स नव्या मोहिमेसाठी सज्ज झालं आहे. स्पेसएक्स आज नवीन रॉकेट लाँच करणार असून त्यामधून चार वैज्ञानिकांना स्पेस स्टेशनमध्ये घेऊन जाणार आहे. स्पेसएक्स फॅलकॉन 9 रॉकेट लाँच करण्यात येणार आहे. हे रॉकेट अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाचे दोन अंतराळवीर, एक रशियन अंतराळवीर आणि संयुक्त अरब अमिरातीच्या एका अंतराळवीराला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणार आहे.
दरवर्षी दि. 4 ते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान जगभर ‘जागतिक अंतराळ सप्ताह’ साजरा केला जातो. हा जागतिक स्तरावर साजरा होणारा सगळ्यात मोठा खगोलीय कार्यक्रम आहे, असे म्हणता येईल. यानिमित्ताने अंतराळ, अंतराळ मोहीम आणि या सप्ताहाविषयी माहिती देणारा लेख...
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) चे क्रू मेंबर्स लवकरच बदलणार आहेत.
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राबरोबरच भारताने अंतराळ क्षेत्रातही आपल्या अभूतपूर्व कामगिरीने विशेष ठसा उमटविला. त्यामुळे कोणेएकेकाळी अंतराळ प्रगतीच्या बाबतीत विकसित देशांकडून हेटाळणी सहन करावा लागणारा भारत, आज त्याच देशांच्या उपग्रहांचेही यशस्वी प्रक्षेपण करतो. तेव्हा, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताच्या अंतराळ भरारीचा मागोवा घेणारा हा लेख...
‘आत्मनिर्भरते’च्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात ‘इस्रो’ने ‘आयएस-४-ओएम’ या नावाचे स्वत:चे अत्याधुनिक केंद्र स्थापन केले आहे.
ट्विटरच्या सरकारी आणि व्यावसायिक वापरकर्त्यांकडून मासिक शुल्क घेण्याचा मानस आहे. प्रसारित केलेल्या ट्विटचा मजकूर बदलणे, ट्विटरवर मुक्तचर्चेला चालना देताना कंपनीचे ‘अल्गोरिदम’ उघड करून त्यात पारदर्शकता आणणे, अशा अनेक सुधारणा एलॉन मस्कच्या अजेंड्यावर आहेत.
ईशान्य भारतात कार्यान्वित होणार इस्रोची ‘नेत्रा'
‘टेस्ला’, ‘स्पेस एक्स’ या कंपनीचा संस्थापक एलॉन मस्क आता ‘ट्विटर’वर आपले एकहाती वर्चस्व प्रस्थापित करणार, हे निश्चित! हा करार जरी भविष्यात आकाराला येणार असला तरी या व्यावसायिक समीकरणामुळे ‘ट्विटर’वरील विचारस्वातंत्र्याची गणिते बदलतील का? ‘ट्विटर’च्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पक्षी आता समाजमाध्यमांच्या डिजिटल विश्वास मुक्त विहार करेल का? यांसारख्या प्रश्नांचा उहापोह करणारा हा लेख...
रशिया-युक्रेन युद्धात रशियाने युक्रेनवर चारही बाजूंनी चढाई केली आहे. रशियाच्या हल्ल्यांमध्ये युक्रेनची संपर्क यंत्रणा बेचिराख झाली होती. याच वेळी युक्रेनच्या डिजिटल टान्सफॉर्मशन मंत्र्यांनी स्वतः ट्विट करून एलोन मस्क यांना मदतीची विनंती केली होती