युरोपीय महासंघाच्या दूध उत्पादनात यंदा घट होईल, अशी शक्यता एका अहवालात वर्तविण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दूध उत्पादन कमी होणार असल्याने, उपलब्ध दुधाचा वापर कोणत्या उत्पादनासाठी करायचा, याची निवड काळजीपूर्वक करावी लागणार आहे. त्यामुळे भारतातील दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी ही एक नामी संधी ठरु शकते. त्याविषयी सविस्तर...
Read More
राज्यात गायींच्या अवैध वाहतूकीचे प्रमाण वाढले आहे. अशातच नाशिक जिल्ह्यात गायींना घेऊन जाणारा ट्रक ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पूर्वीपासूनच गोमातेला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. अनेक ग्रंथ व पुराणांमध्येही गोमातेचे महत्त्व सांगण्यात आले आहे. मात्र मुंबईतील शिवडी परिसरातील गायवाडी येथे मात्र गाईंना म्हणजेच गोमातेला राहण्यासही नीटनेटका गोठा मिळत नसल्याची धक्कादायक बाब येथीलच स्थानिकांनी "दै. मुंबई तरुण भारत"सोबत संवाद साधताना उघड केली.
राज्यातील गायींना वेळेवर वैद्यकीय सेवा देण्यासाठी पोलिसांची आपत्कालीन हेल्पलाइन सेवा 'डायल ११२' च्या धर्तीवर उत्तर प्रदेशचे योगी सरकार एक अभिनव रुग्णवाहिका सेवा सुरू करणार आहे. यूपीचे दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी रविवारी (१४ नोव्हेंबर २०२१) मथुरा येथे सांगितले की राज्यव्यापी स्तरावर ही सेवा सुरू करण्यासाठी ५१५ रुग्णवाहिका तयार करण्यात आल्या आहेत.
कृषिसमृद्धीसाठी गोहत्याबंदीविरोधातील आघाडी वेळीच रोखणे आवश्यक
“आम्हाला बोकड खायला परवडत नाही. नरेंद्र मोदींना गायीवर इतके प्रेम का आहे?” असा प्रश्न लक्ष्मण माने यांनी विचारत पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. यापूर्वीही त्यांनी मराठा समाजातील महिलांबद्दल वादग्रस्त विधान केले होते.
समर्थ रामदासस्वामींनी पुष्कळ वाङ्मयनिर्मिती केली. त्याची थोडक्यात माहिती घ्यायची, तर सोळा स्फुट काव्ये त्यांच्या नावावर आहेत. त्यातील ओवीसंख्या सुमारे तीन हजार २०० इतकी भरेल. त्याशिवाय वीस दशकी ‘दासबोधा’च्या सात हजार ७५१ ओव्या आहेत. मनाचे श्लोक २०५ आहेत. ‘आत्माराम’ ग्रंथाच्या १८३ ओव्या आहेत.