मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणा याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर भारताने त्याचे प्रत्यार्पण व्हावे यासाठी अनेक प्रयत्न केले होते. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला, त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या प्रत्यार्पणास हिरवा कंदिल दाखवला होता. मात्र तहव्वूर राणाकडून प्रत्यार्पण टाळण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात होते. त्याने अम
Read More
Javed Munshi arrested पाकिस्तानात दहशतवादाचे प्रशिक्षण घेऊन २०११ मध्ये जम्मू-काश्मीर येथे मौलानाच्या हत्येप्रकरणी मोस्ट वाँटेड असलेल्या जावेद मुन्शी या दहशतवाद्याला पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कॅनिंग परिसरातून अटक करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर आणि प.बंगाल पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ही अटक करण्यात आली आहे.
दक्षिण भारतामध्ये विशेषत: बेंगळुरू दहशतवादाला खतपाणी घालणारा कुख्यात दहशतवादी सलमान रेहमान खान याला रवांडामध्ये अटक करण्यात भारताला यश आले आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) सहकार्याने गुरुवारी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी इंटरपोल चॅनेलद्वारे रवांडा येथून दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांसाठी लष्कर-ए-तैयबाचा कार्यकर्ता सलमान रहमान खान याचे प्रत्यार्पण करण्यात भारताला यश आले आहे.
दहशतवादावर चीनचा नवा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी साजिद मीर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्तावाला चीनने आडकाठी आणली आहे. भारत आणि अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. चीनने यापूर्वी साजिद मीरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्तावही रोखला आहे.
भारतातील २६/११ च्या हल्ल्यात सामील असलेल्या लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी साजिद मीर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात चीनने पुन्हा एकदा अडथळा आणला आहे. चीनने संयुक्त राष्ट्रात भारत आणि अमेरिकेचा प्रस्ताव रोखला असून भारताने त्यावर जोरदार टिका करून संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी लढ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
काश्मिरी अभिनेत्री अमरीना भटची हत्या करणाऱ्या एलईटीच्या दोन दहशतवाद्यांनी चकमकीत ठार मारण्यात आले आहे. आज दि. 27 रोजी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी काश्मिरी अभिनेत्री आणि गायिकेची हत्या करणाऱ्या लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या दोन दहशतवाद्यांना गोळ्या घालून ठार केले. या दाध्शात्वाद्यानी बुधवारी अम्रीना भट्ट यांची हत्या केली होती.
केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी (७ फेब्रुवारी २०२२) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर कारवाई करण्याची जबाबदारी राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) दिली. एनआयएने दाऊद इब्राहिम, डी कंपनी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध बेकायदेशीर प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) विरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.
स्वातंत्र्य दिनापूर्वी सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे, नवीन इंटेल इनपुट्समधून असे उघड झाले आहे की पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांनी सुरक्षा आस्थापना, फॉरवर्ड पोस्ट आणि देशात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पुरवण्याची विस्तृत योजना आखली आहे.
अमेरिकेने शुक्रवारी 'कंट्री रिपोर्ट ऑफ टेरारिज्म २०१८' या अहवालात नमूद केले कि, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनावर कारवाई करून त्यांच्या भरती प्रक्रियेवर मर्यादा आणण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे.
जम्मू-काश्मीर भारताशी जोडलेला आहे तो डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानामुळेच